छत्रपती संभाजीनगर Bharat Mata Temple : देशात एकमेव असलेल्या मंदिरात आता भारत मातेची पूजा करता येणार नाही. भारतीय पुरातत्व विभागानं काढलेल्या परिपत्रकानुसार, यापुढं तिथं असलेले सर्व पूजा विधी बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळं स्थानिकांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे. भारत स्वतंत्र झाला त्या काळापासून दरवर्षी विशेष सोहळा त्या ठिकाणी साजरा केला जातो. त्याचबरोबर स्थानिक नेमून दिलेले पूजारी रोज विधिवत भारत मातेचं पूजन देखील करतात. मात्र, आता हे विधी बंद करण्याचे निर्देश दिल्यावर मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला जातोय.
पुरातत्व विभागानं काढलं परिपत्रक : देशात भारतमातेचं मंदिर अतिशय दुर्मिळच पाहायला मिळतं. ऐतिहासिक असलेल्या दौलताबादच्या देवगिरी किल्ल्यावर भारत मातेचं मंदिर देखील तितकंच प्रसिद्ध आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून या मंदिरात भारत मातेचं देवासारखं पूजन केलं जातं. मात्र, अचानक पुरातत्व विभागानं या ठिकाणी पूजन बंद करण्याचे निर्देश जारी केले आहे. यापुढं तिथं कार्यरत असलेले पुजारी राजू कांजूने यांना पूजा करु देऊ नये, अथवा त्यांना त्या भागात प्रवेश देऊ नये. ऐतिहासिक वास्तु मधे प्रवेश निषिद्ध असलेली ही वास्तु असल्यानं प्रतिबंध घालण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच या आदेशाचं उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळं या आदेशामुळं देशभक्त बांधवांनी संताप व्यक्त केला आहे.
धार्मिक कार्यक्रम सुरु मग भारत मातेला विरोध का? : देशात असलेल्या अनेक ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये धार्मिक स्थळं आहेत. कुठं मंदिर तर कुठं मस्जिद देखील आहेत, असं असताना भारत माता मंदिरातच निर्बंध का लावले असा जाब मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे. भारत माता मंदिर देशाच्या अस्मितेचा विषय आहे. दरवर्षी अनेक देशभक्त 15 ऑगस्ट रोजी परिसरातील देशभक्त या मंदिरात येऊन दर्शन घेतात. इतकंच नाही तर मागील वर्षी पर्यटन मंत्री मंगलप्रभाद लोढा यांनी स्वतः याठिकाणी स्वतंत्रता दिवस साजरा केला होता. असं असताना या मंदिरात पूजनाला विरोध कशाला, काढलेलं पत्रक रद्द करावं अशी मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा :
- गृहिणींचं बजेट कोलमडलं; चिकनपेक्षा शेवगा महाग, इतर भाज्यांचे दरही शंभरी पार - Vegetable Rates Hike
- ठाण्यातील 103 स्कूल बसेसवर परिवहन विभागाची कारवाई; 'एम परिवहन ॲप' वापरण्याचं केलं आवाहन - Action Against School Bus
- महायुती सरकारचे आज शेवटचे पावसाळी अधिवेशन, पहिल्या दिवशी कोणते विषय गाजणार? - Maharashtra Assembly Session