ETV Bharat / state

'अँटिलिया'साठी मुकेश अंबानींनी वक्फ बोर्डाची जमीन बळकावली; विरोधकांचा आरोप, काय आहे नेमकी भानगड? - Ambani Grabbed Waqf Board Land - AMBANI GRABBED WAQF BOARD LAND

Antilia Land Deal Illegal : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुंबईतील 'अँटिलिया' इमारत वक्फ बोर्डाच्या जागेवर असल्याचा वाद आता पुन्हा चर्चेत आला आहे. ही जमीन वक्फ बोर्डाची असल्याचा अहवाल 2017 मध्ये सरकारनं न्यायालयात दाखल केला होता. मात्र, आता अहवालात ही जमीन सरकारी नसल्याची माहिती देण्यात आली आहे, असा आरोप विरोधकांनी केला. यावर सरकारनं मौन बाळगलं आहे.

Antilia Land Deal Illegal
मुकेश अंबानी आणि अँटिलिया इमारत (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 6, 2024, 5:58 PM IST

Updated : Jul 6, 2024, 6:17 PM IST

मुंबई Antilia Land Deal Illegal : राज्यात वक्फ बोर्डाच्या मालकीच्या शेकडो एकर जमिनी आहेत. मुस्लिम समाजातील लोकांच्या कल्याणासाठी, विकासासाठी या जमीनीचा वापर करावा, असे निर्देश आहेत. वक्फ बोर्डाच्या जमिनी विकता येत, नाहीत किंवा त्या हस्तांतरित करता येत नाहीत. एकदा ही जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची असल्याचं जाहीर झाल्यानंतर त्यावर अन्य कोणत्याही उपक्रम करता येत नाहीत. मात्र, असं असतानाही मुंबईतील अत्यंत मोक्याची वक्फ बोर्डाच्या मालकीची जागा अनाथ मुलांसाठी राखीव होती. ही जागा प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना अँटिलिया इमारत बांधण्यासाठी देण्यात आल्याचा आरोप माजी अल्पसंख्याक मंत्री अनिस अहमद यांनी केला. सुमारे 500 कोटी रुपयांची ही जमीन केवळ 21 कोटी रुपयांना तत्कालीन वक्फ बोर्डाचे अध्यक्ष दिवंगत एम. ए. अजिज यांच्या मुलानं ही जमीन मुकेश अंबानी यांना विकल्याचं सांगितलं जात आहे.

विरोधकांसह सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter)

2017 मध्ये न्यायालयात सादर केला अहवाल : वक्फ बोर्डाच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी मोईन ताशिलदार यांनी 2017 मध्ये याबाबत अहवाल सरकारला सादर केला होता. ज्यामध्ये ही जमीन बोर्डाच्या मालकीची असल्याचं म्हटलं होतं. याबाबतच्या अहवालाची प्रत मुंबई उच्च न्यायालयातही दाखल करण्यात आली होती. या संदर्भात आपण अंबानी यांना नोटीस बजावल्याचंही अनिस अहमद यांनी म्हटलं आहे .

अहवाल बदलल्याचा आरोप : 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अँटिलिया इमारतीची जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची असल्याचं अहवालात नमूद केलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा नवा अहवाल तयार करण्यात आला. त्यातून ही जमीन वगळण्यात आली. त्यामुळं अंबानी यांना मोठा दिलासा शिंदे सरकार देत असल्याचा आरोपही अनिस अहमद यांनी केला आहे. मात्र, हा अहवाल सरकार का सार्वजनिक करत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

जमीन वक्फ बोर्डाचीच : अंबानी यांच्या अँटेलिया इमारतीची जमीन वक्फ बोर्डाची असल्याचं आम्ही आधीच सांगितलं असल्याचं महायुती सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांनी कबुल केलं आहे. मात्र, आता त्या प्रकऱणात काय झालं आहे, ते मला माहित नाही, असंही मुश्रीफ म्हणाले.

हे भांडवलदारांचं सरकार : "कोणतीही जमीन एकदा वक्फ बोर्डाची झाली ती त्यांचीच असते. त्यात कधीच बदल होऊ शकत नाही. मात्र, हे सरकार भांडवलदारांचं, उद्योगपतींचं असल्यामुळं ते काहीही करू शकतात," असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

अहवालाबाबत बोलण्यास सरकारची टाळाटाळ : या संदर्भात विद्यमान अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांना विचारलं असता, त्यांनी सांगितलं की, "यासंदर्भात सध्या आपल्याला कोणतीही माहिती नाही. नेमकं अहवालात काय आहे हे माहिती नाही. विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्यामुळं आपण याबाबत आता बोलू शकत नाही. अधिवेशन संपल्यानंतर आपण याबाबतची पूर्ण माहिती घेऊ," असं सांगून त्यांनी हात वर करण्याचा प्रयत्न केला.

फडणवीसांनी झटकले हात : याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हात झटकले. राज्यातील लहान सहान गोष्टींची माहिती सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाच्या प्रकरणाविषयी उत्तर देताना, "कोणताही प्रश्न केव्हाही विचाराल तर त्याची माहिती आमच्याकडं उपलब्ध असते का? असं उत्तर दिलं." यावरून महायुतीचं सरकार या प्रकरणात अंबानींना पाठीशी घालतं आहे, हे स्पष्ट दिसतं आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीची जागा ही वक्फ बोर्डाची आहे की नाही, हे आता नवीन अहवाल उघड झाल्यानंतरच स्पष्ट होईल. मात्र, या संदर्भात वक्फ बोर्डाचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

'हे' वाचलंत का :

  1. "दाऊद इब्राहिमलाच क्लीन चीट द्यायची बाकी", रवींद्र वायकर भूखंड घोटाळा प्रकरणावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut
  2. खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांची क्लीन चिट; जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यातून वायकर मुक्त - Ravindra Waikar Clean Chit
  3. लोकसभेत मोदी-शाहांना दिलेलं आव्हान पूर्ण करण्यासाठी राहुल गांधी आज गुजरात दौऱ्यावर - Rahul Gandhi To Visit Gujarat

Last Updated : Jul 6, 2024, 6:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.