ETV Bharat / state

भिवंडीत काँग्रेसच्या माजी नगरसेवकाविरोधात अपसंपदा प्रकरणी गुन्हा दाखल - ACB Action In Bhiwandi

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 10:55 PM IST

ACB Action In Bhiwandi : भिवंडीत काँग्रेसचे माजी नगरसेवक सिद्धेश्वर कामुर्ती (Siddheshwar Kamurti) आणि त्यांच्या कुटुंबियांवर अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे श्रीकांत कामुर्ती हे कोकण पदवीधर निवडणूक लढवत असल्यानं ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे.

ACB Action In Bhiwandi
माजी नगरसेवकाविरोधात अपसंपदा प्रकरणी गुन्हा दाखल (Etv Bharat)

ठाणे ACB Action In Bhiwandi: भिवंडी निजामपूरा शहर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या माजी नरसेवकासह त्याच्या कुटुंबियांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अपसंपदेची कोट्यवधींचा गैरव्यवहार प्रकरणी कारवाई केली आहे. तपासा अंती पाच जणांवर भिवंडी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मतदारांमध्ये चर्चेचा विषय : सिध्देश्वर मोगलप्पा कामुर्ती (वय, ६४), पत्नी कावेरी कामुर्ती (वय,६२), श्रीकांत कामुर्ती (वय ३६), संकेत कामुर्ती (वय,३५), निशिकांत कामुर्ती (वय, ३२) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून श्रीकांत कामुर्ती हे कोकण पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवती आहे. विशेष म्हणजे उद्याच २६ जून रोजी या कोकण मतदार संघात मतदान होत असल्यानं मतदारांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला आहे.

एकत्रित उत्पन्न किती : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वर कामुर्ती हे भिवंडी शहरातील तेलीपाडा परिसरात कुटूंबासह राहत असून त्यांच्या बेकायदा अपसंपदेच्या चौकशीची कारवाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सुरू केली होती. या चौकशी दरम्यान या निरीक्षणामध्ये त्यांचे एकत्रित उत्पन्न ७ कोटी ४४ लाख २० हजार १६४ रूपये असून त्यांचा एकत्रित खर्च ४ कोटी ३७ लाख ८६ हजार ८५६ रूपये व एकत्रित मालमत्ता ५ कोटी २० लाख ६७ हजार ४२ रूपये असल्याचं तपासात निष्पन्न झाले होते.

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल : सिद्धेश्वर कामुर्ती यांची एकत्रित मालमत्ता आणि खर्च यांची बेरीज केली असता ती ९ कोटी ५८ लाख ५३ हजार ८९८ रूपये असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळं कामुर्ती यांचं उत्पन्न ७ कोटी ४४ लाख २० हजार १६४ मधून एकत्रित मालमत्ता व खर्च ९ कोटी ५८ लाख ५३ हजार ८९८ रूपये वजा केले असता, त्यांनी १ जानेवारी १९८५ ते १४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत २ कोटी १४ लाख ३३ हजार ७३४ रूपये म्हणजेच २९ टक्के एवढी अपसंपदा गैरमार्गाने संपादित केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक स्वप्निल तुळशीदास जुईकर यांच्या फिर्यादीवरून सिद्धेश्वर कामुर्ती यांच्यासह ५ जणांवर भ्रष्टाचार प्रति अधिनियमाच्या १९८८ अन्वये विविध कलमानुसार भिवंडी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक विलास जाधव करत आहेत.

श्रीकांत कामुर्ती यांच्या अडचणीत वाढ : विशेष म्हणजे यातील आरोपी श्रीकांत कामुर्ती हे कोकण पदवीधर निवडणूक लढवत असल्यानं ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. तर दुसरीकडं मुख्य आरोपी असलेले सिद्धेश्वर कामुर्ती यापूर्वी भाजपाचे भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष होते. मात्र पक्षात कुरबुरी वाढल्यानं त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. एकंदरीतच कामुर्ती कुटूंबावर कोट्यवधींचा गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा -

Direct Pipeline : थेट पाईपलाईनवरून भाजपा खासदार धनंजय महाडिक अन् काँग्रेस आमदार सतेज पाटलांमध्ये वार-पलटवार

मुंबईच्या रस्ते बांधकामात 600 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप, उच्च न्यायालयात खटला दाखल

ऑक्सिजन प्लांट घोटाळा प्रकरण; रोमिन छेडाला उच्च न्यायालयाचा दणका, याचिका फेटाळली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.