ETV Bharat / state

दारुड्याचा पोलीस ठाण्यात धुडगूस; महिला पोलीस अधिकाऱ्यावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न - Pune Crime News - PUNE CRIME NEWS

Fire by pouring petrol : पुण्यामधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिला पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Pune Crime News
Pune Crime News (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 6, 2024, 2:12 PM IST

पुणे Fire by pouring petrol : कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर दररोज पुणे शहर पोलिसांकडून रात्रीच्या वेळेस ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई केली जात आहे. असं असताना पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करताना एका दारुड्यानं भर रस्त्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला आणि कर्मचाऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी त्यानं त्याच्याकडं असलेला लायटर उलटा पकडल्यानं अनर्थ टळला. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजल्याच्या सुमारास विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याबाबत संजय फकिरा साळवे (वय 32 रा जालना) या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न (Source - ETV Bharat Reporter)

पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न : याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात होती. त्यावेळी एक दारुडा त्याच्या गाडीवरून जात होता. त्याला पोलिसांनी अडवून त्याची तपासणी करण्यास सुरुवात केली. त्याला विश्रामबाग वाहतूक विभाग इथं आणल्यावर पोलीस स्टेशनमध्येच पोलिसांमध्ये आणि त्याच्यामध्ये वाद झाला. त्या रागातून या वाहन चालकानं चक्क पोलीस स्टेशनमध्येच पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानं त्याच्याकडील लाइटर काढून तो पेटवून त्यांच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या हातातील लायटर उलटा पकडला गेल्यानं पेट घेऊ शकला नाही. त्यामुळं मोठा अनर्थ टळला. दरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल : याबाबत विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ म्हणाल्या, "पुणे पोलिसांकडून दररोज वाहतुकीच्या शहरभर कारवाई केली जात आहे. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास बुधवार चौक इथं कारवाई सुरू असताना आरोपी संजय फकिरा साळवे हा वेडीवाकडी दुचाकी चालवत आला. तेव्हा वाहतूक पोलिसांनी चौकशीसाठी त्याला बाजूला घेतलं आणि विश्रामबाग वाहतूक पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणण्यात आलं. त्यानंतर आरोपी संजय फकिरा साळवे हा पाणी प्यायचं असल्याचं सांगून वाहतूक विभागाच्या कार्यालयात येऊन तुमच्या अंगावर आता पेट्रोल टाकून मारून टाकणार, असं म्हणत आरोपीनं बाटलीतील पेट्रोल महिला पोलीस आणि इतर कर्मचार्‍याच्या अंगावर टाकलं. तर दुसर्‍या हातातील लायटरनं पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बाजुला असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीचा हात पकडला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला." या प्रकरणातील आरोपी संजय साळवे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा

  1. ज्ञानेश्वर खांडे मारहाण प्रकरणातील आरोपी कुंडलिक खांडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावर आज होणार सुनावणी - Judicial Custody To Kundlik Khande
  2. पूर्ववैमनस्यातून कोयत्यानं वार करुन खून, 7 आरोपींना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून अटक - Khalumbre Murder
  3. कसारा स्थानकाजवळ पंचवटी एक्स्प्रेसचं कपलिंग तुटलं, इंजिन डबे सोडून गेलं पुढं - Panchavati Express
  4. दूषित पाण्यामुळे दोन चिमुकल्यांचा गेला जीव; दोन बालकांवर उपचार सुरू - Two Little Girls Died

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.