ETV Bharat / state

घनदाट जंगलातून उंच गडावर चढाई, इतिहासातील आठवणींना उजाळा देत गाविलगड महोत्सवाला प्रारंभ - GAVILGAD FORT NEWS

अमरावतीत गाविलगड महोत्सव राबविला जात आहे. या महोत्सवाचे वैशिष्ट्य आणि गाविलगडाचे इतिहासातील महत्त्व यावर विशेष रिपोर्ट जाणून घ्या.

Amravati tourism special story
गाविलगड महोत्सवाला प्रारंभ (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Updated : 2 hours ago

अमरावती- मेळघाटच्या पायथ्याशी बागलिंगा या गावात असणाऱ्या सातपुडा पर्वतावर जवळपास दीड हजार फूट उंच घनदाट जंगलातून चढाई करत चिमुकले, तरुण आणि काही वयस्क अशा 280 जणांनी शनिवारी गाविलगड किल्ला सर केला. चांदूरबाजार येथील स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं मेळघाटातील ऐतिहासिक गाविलगड किल्ल्याच्या दोन दिवसीय महोत्सवाला प्रारंभ झाला. या महोत्सवात जवळपास दहा किलोमीटरचा खडतर प्रवास करून इतिहासातील गाविलाड चढाई, इतिहास आणि महोत्सवाबाबत "ईटव्ही भारत" चा हा स्पेशल रिपोर्ट.

आठ वर्षांपासून गडाची चढाई- बाराव्या शतकात मेळघाटातील गवळी राजानं आजच्या चिखलदरा येथे भव्य किल्ला बांधून आपलं राज्य निर्माण केलं. गवळी राजाचा किल्ला म्हणून या किल्ल्याची ओळख 'गवळीगड' अशी होती. गवळीगडचा अपभ्रंश होऊन आज हा किल्ला 'गाविलगड' नावानं ओळखला जातो. सुरुवातीला फतेल्ला इमादशहानं या किल्ल्यावर आक्रमण केलं. 85 वर्षानंतर मुघलांनी हा किल्ला जिंकला. त्यानंतर मराठ्यांनी या किल्ल्यावर 1803 पर्यंत राज्य केलं. संपूर्ण देशात सत्ता स्थापन करणाऱ्या इंग्रजांनी किल्ल्यावर आपला झेंडा फडकवला . इमादशही, मुघलशाही पुढे मराठे आणि इंग्रजांनी या किल्ल्यावर आक्रमण करण्यासाठी एका मार्गाचा वापर केला होता. त्याच मार्गावरून गत आठ वर्षांपासून स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे प्रमुख शिवा काळे यांच्या नेतृत्वात गड चढण्याची मोहीम 14 डिसेंबरला राबविली जाते.

गाविलगड आहे इतिहासाचा साक्षीदार (Source- ETV Bharat Reporter)

गडावर मोठे युद्ध आणि राणीसह महिलांचा जोहर- मुघलांचा पराभव करून नागपूरचे रघुजीराजे भोसले यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. या किल्ल्याचा किल्लेदार म्हणून बेनीसिंह राजपूत याची नेमणूक करण्यात आली. या किल्ल्याचा राजा अशीच बेनीसिंहाची ओळख होती. 19 नोव्हेंबर 1803 ला मराठ्यांविरुद्ध शिरसोली अडगाव येथील युद्ध जिंकल्यावर इंग्रजांनी 13, 14 आणि 15 डिसेंबरला गाविलगडवर हल्ला चढवला. तीन दिवस बेनीसिंहाच्या नेतृत्वात गाविलगडावरील सैन्यानं इंग्रज सैन्याशी युद्ध केलं. या दरम्यान नागपूरवरून गाविलगडावर कुठलीही मदत पोहोचू शकली नाही. इंग्रजांशी लढताना शेकडो सैन्यासह बेनीसिंह राजपूत मारला गेला. इंग्रज सैन्याच्या हाती लागायचं नाही म्हणून बेनीसिंहाची राणी रूपवतीच्यासह गडावरील महिलांनी खोलदरीत उड्या मारून 'जोहर' केला, अशी माहिती इतिहासाचे अभ्यासक विवेक चांदुरे यांनी या मोहिमे दरम्यान 'ईटीव्ही भारत'ला दिली.

गाविलगडच्या अनुभवातूनच नेपोलियन बोनापार्टचा पराभव- गाविलगडवर हल्ला करणाऱ्या इंग्रज सैन्याचं नेतृत्व करणाऱ्या ऑर्थर व्हेलेन्सली याच्यावर इंग्रज सरकार नेपोलियन बोनापार्टचा फ्रान्समध्ये जाऊन पाडाव करण्याची जबाबदारी टाकली होती. भारतातदेखील ऑर्थर व्हेलेन्सली याचं जाणं येणं होतं. विशेष म्हणजे गाविलगड किल्ल्यावर इंग्रज सैन्याचं नेतृत्व ऑर्थर व्हॅलेन्सली यानंच केलं. पुढे 18 जून 1815 ला वॉटरलूच्या लढाईत इंग्रजांनी नेपोलियन बोनापार्टचा पराभव हा ऑर्थर व्हेलन्सली याच्या नेतृत्वातच केला. गाविलगडवर विजय मिळवण्यासाठी काही फंदफितुरी आणि इतर अनुभव ऑर्थरला मिळाले होते. त्याच अनुभवाचा फायदा नेपोलियन बोनापार्टचा पराभव करण्यासाठी झाल्याचं स्वतः ऑर्थर व्हॅलेंसली यानं लिहून ठेवलं असल्याची माहिती इतिहासाचे अभ्यासक प्राध्यापक संतोष झांबरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

इतिहासाला उजाळा देणारी मोहीम- 14 आणि 15 डिसेंबर 1803 ला गाविलगड किल्ल्यावर काही ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. या घटनेचा उजाळा देण्यासाठी गाविलगड महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवाचा मुख्य भाग म्हणून नव्या पिढीला गड चढायच्या माध्यमातून या संपूर्ण गडाची माहिती दिली जाते. किल्ल्याची भौगोलिक परिस्थिती, त्याची रचना, बांधकामाची पद्धत या सगळ्या इतिहासाचा उलगडा गडभ्रमंती द्वारे केला जातो, अशी माहिती शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे प्रमुख शिवा काळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. शिवस्वराज प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते या मोहिमेदरम्यान गाविलगडावरील सर्व कचरा साफ करतात. पडक्या महालामध्ये उगवलेले गवत कापतात असंदेखील शिवा काळे यांनी सांगितलं.

अभिनेते भारत गणेशपुरे यांनी केलं गड चढणाऱ्यांचं स्वागत- अभिनेता भारत गणेशपुरे यांनी संपूर्ण दहा किलोमीटर प्रवास करणाऱ्या मोहिमेतील सर्वांचे स्वागत गाविलगडाच्या मुख्य प्रवेशद्वारावर केलं. गाविलगडासह चिखलदरा आणि मेघाटातील अनेक पर्यटन केंद्र हे स्वच्छ राहावे. तसे झाले तर पुणे-मुंबईतील लोक हे ज्याप्रमाणे सुंदर स्वच्छ असणाऱ्या शेगावला जातात, त्याप्रमाणेच चिखलदरालादेखील येतील, असा विश्वास भारत गणेशपुरे यांनी व्यक्त केला. शौर्य दिनानिमित्त स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे मावळे या किल्ल्याच्या संरक्षणासाठी काही उपक्रम करत आहे. हे उपक्रम खरंच अभिनंदनीय आणि महत्त्वाचे आहेत, असं भारत गणेशपुरे "ईटीव्ही भारत"शी बोलताना म्हणाले. यावेळी या महोत्सवाचे मुख्य मार्गदर्शन प्राचार्य डॉ. पृथ्वीसिंह राजपूत आणि प्राचार्य डॉ. एकनाथ तट्टे प्रामुख्यानं उपस्थित होते.

हेही वाचा-

Last Updated : 2 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.