ETV Bharat / state

चिमुकल्यांनी राख्या तयार करून बाजारात आणल्या विकायला; पळसखेड येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा उपक्रम - Raksha Bandhan 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 17, 2024, 9:27 PM IST

Self Made Rakhi Sold By Students : पळसखेड येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान मिळावं यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वत: राख्या तयार केल्या आणि नंतर त्यांनीच आपल्या राख्या बाजारात विकल्या.

Amravati News self made rakhi sold by Zilla Parishad School students
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी केली राख्यांची विक्री (ETV Bharat Reporter)

अमरावती Self Made Rakhi Sold By Students : दिवसभर विविध राख्या तयार करुन या राख्या विकण्यासाठी विद्यार्थ्यांनी थेट गावातील चौकात भरणाऱ्या बाजारात दुकान थाटलं. या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुंदर अशा राख्या पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी ग्रामस्थांनी देखील गर्दी केल्याचं बघायला मिळालं. राखी पौर्णिमेनिमित्त अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यात येणाऱ्या पळसखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं राबवला जाणारा आगळावेगळा उपक्रम चांदुर रेल्वे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात कौतुकास्पद ठरतोय. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या राख्या आणि त्यांच्या विक्री संदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.

146 विद्यार्थ्यांचा सहभाग : राखीपौर्णिमा सणाच्या निमित्तानं शाळेतील विद्यार्थ्यांना राखी तयार करण्याचा उपक्रम राबवण्याची कल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका कुमुदिनी मेश्राम यांच्यासह शाळेतील शिक्षक तुळशीराम चव्हाण आणि प्रीती सपकाळ यांनी पुढं आणली. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व 143 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. प्रीती सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना राखी नेमकी कशी तयार करायची यासंदर्भात प्रशिक्षण दिलं. ज्या विद्यार्थ्यांना उत्कृष्टरित्या राखी बनवण्याची कला प्रशिक्षणादरम्यान गवसली त्या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 20 ते 25 उत्कृष्ट दर्जाच्या सुंदर राख्या तयार केल्या. ज्या विद्यार्थ्यांना राखी तयार करणं जमत नव्हतं त्यांना तुम्ही छान देवराख्या तयार करू शकता अशा शब्दात प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून विविध रंगाच्या देवराख्या तयार करून घेण्यात आल्या. एकूणच शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग या उपक्रमात होता.

चार हजार रुपयांचा आणला कच्चामाल : राख्या तयार करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी कापड, मणी, वेलवेटचं कापड, लोकर असा कच्चा माल 4000 रुपयात आणला. नेमकं कोणते विद्यार्थी कुठल्या दर्जाच्या राख्या तयार करू शकतात, हे लक्षात आल्यावर प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या कुवतीनुसार राखी तयार करण्याचं साहित्य वितरित करण्यात आलं. 15 ऑगस्टला देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेत ध्वजारोहण सोहळा आटोपल्यानंतर प्रीती सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना राखी कशी तयार करायची या संदर्भात थोडक्यात माहिती दिली. 16 ऑगस्टला शाळेत दिवसभर चिमुकल्यांनी राख्या तयार केल्या. विशेष म्हणजे तयार करण्यात आलेल्या राख्यांचं पॅकिंग देखील विद्यार्थ्यांनीच केलं.

चिमुकल्यांच्या राख्यांना ग्रामस्थांचा प्रतिसाद : आपल्या गावातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांचं दुकान पाहून ग्रामस्थांनी चिमुकल्यांनी तयार केलेल्या राख्या खरेदी करण्यास छान प्रतिसाद दिला. गावातील बँकेचे व्यवस्थापक, गावातील डॉक्टर, खासगी शाळेतील शिक्षक, गावातील मान्यवर व्यक्तींसह गावातील महिलांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या खरेदी करण्यासाठी स्टॉलवर गर्दी केली. दहा रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यंत किंमत असणारी राखी चिमुकल्यांच्या या दुकानात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचा धडा : सुंदर अशा राख्या तयार करण्याची कला शाळेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमांतर्गत अवगत केली. राखी बनवण्यासह त्यांची पॅकिंग करणं, त्या दुकानात सजवणं हे काम देखील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनात केलं. तयार केलेल्या राख्या भरचौकात दुकान लावून विक्री करण्याचा अनुभव देखील या शाळकरी विद्यार्थ्यांनी घेतला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान देखील अवगत होण्यास मदत झाली. आपली कला नेमकी कशी विकावी याचं कौशल्य देखील विद्यार्थ्यांना गवसण्यास शाळेचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला, असं शाळेतील शिक्षक तुळशीराम चव्हाण 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. 4 हजार रुपयांच्या कच्च्या मालातून तयार करण्यात आलेल्या या राख्यांच्या विक्रीतून आठ हजार रुपये निश्चितपणे मिळतील, असा विश्वास देखील चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा -

  1. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर भद्राचं सावट: कोणत्या वेळेत बांधावी राखी? जाणून घ्या, शुभ मुहूर्त - Raksha Bandhan 2024
  2. बहिणींनो राखी बांधायला जायचं! मग बघा मुंबई लोकलचं वेळापत्रक, 'या' मार्गावर आहे मेगॉब्लॉक - Mumbai Mega Block
  3. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फोटोची राखी मिळवा फुकट, फक्त 'ही' आहे अट! - Eknath Shinde Special Rakhi

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.