ETV Bharat / state

'सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवणीत राणा लोकसभा निवडणुकीत दिसणार नाहीत' - नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र

Navneet Rana Fack caste certificate : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला आहे. त्यावर माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी राणा दाम्पत्यांवर टीका केलीय.

Navneet Rana
Navneet Rana
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 2, 2024, 10:34 PM IST

Updated : Mar 2, 2024, 10:46 PM IST

अभिजित अडसूळ

अमरावती Navneet Rana Fack caste certificate : भारतीय जनता पक्षात सामील झाल्यास त्यांचं जात प्रमाणपत्र खोटं निघेल, असं नवणीत राणा यांना वाटत असेल. पण उच्च न्यायालयानं दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास असल्याचं शिवसेनेचे माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी म्हटलं आहे. ते आज अमरावतीत बोलत होते. नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र बनावट आहे. त्यामुळं नवनीत राणा आगामी लोकसभा निवडणुकीतही दिसणार नाहीत, असा टोला अभिजित अडसूळ यांनी राणा दाम्पत्याला लगावला आहे.

राणा म्हणजे सत्य मागे धावणारी माणसं : राणा दाम्पत्याला दाम्पत्य ज्यांची सत्ता असेल त्या दिशेनं धावतात. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस या सर्व मुख्यमंत्र्यांच्या मागे रवी राणा फिरत होते. त्यामुळं सत्ता दिसेल तिकडे राणा दिसतात असा टोला अडसूळ यांनी आमदार रवी राणा यांना लगावला आहे. भविष्यात ज्याची सत्ता येईल त्या सत्तेच्या मागे धावणारी ही लोक आहेत. त्यामुळं आज आपल्या जातीचं प्रमाणपत्र वाचविण्यासाठी राणा भाजपामध्ये जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचं देखील अभिजीत अडसूळ म्हणाले.

दोन आठवड्यात नवनीत राणांचा निकाल : सर्वोच्च न्यायालयात जवळजवळ सहा दिवस खासदार नवनीत राणा यांच्या खोट्या जातीच्या प्रमाणपत्रावर काम केलं. आता सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण क्लोज फॉर ऑर्डरसाठी ठेवलं आहे. आता दोन आठवड्यानंतर खासदार नवनीत राणा यांचा निकाल लागणार असून त्यांच्याजवळ मागासवर्गीय असल्याचा पुरावाच राहणार नाही. त्यामुळं त्या मागासवर्गीयांसाठी राखीव असणाऱ्या अमरावती मतदारसंघात उमेदवार देखील नसणार, असं, देखील अभिजीत अडसूळ यांनी स्पष्ट केलं.

अडसूळ हेच उमेदवार : अमरावतीत उमेदवार म्हणून नवनीत राणा कोणालाही चालत नाही : अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारासंदर्भात भाजपा शिवसेना मित्र पक्षांच्या नेत्यांची बैठक काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आली होती. राणांना असणाऱ्या विरोधामुळं प्रहारचे आमदार बच्चू कडू, राजकुमार पटेल हे या बैठकीला अनुपस्थित होते. अमरावतीतील भाजपाच्या स्थानिक नेत्यांचा देखील राणांना विरोध आहे. माझ्यासह आनंदराव अडसूळ, आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आम्हाला राणा उमेदवार चालत नाही, असं स्पष्ट सांगितलं आहे. भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व निश्चितच या संपूर्ण परिस्थितीचा विचार करेल. या निवडणुकीत प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळं हरणाऱ्या लोकांवर डाव लावला जाणार नाही. अडसूळ हेच अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवार असतील, असं अभिजीत अडसूळ म्हणाले.

हे वाचलंत का :

  1. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; महाराष्ट्राला स्थान नाही
  2. भाजपानं विश्वासघात केला, संजय राऊतांची देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांच्यावर टीका
  3. "आपके साथ रहेंगे अब इधर-उधर नहीं जाएंगे"; नितीश कुमारांच्या विधानावर पंतप्रधानांना हसू आवरेना

Last Updated : Mar 2, 2024, 10:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.