ETV Bharat / state

अमरावतीत 37 उमेदवार रिंगणात, 19 फेऱ्यानंतर स्पष्ट होणार निकाल - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 10:42 AM IST

Updated : Jun 4, 2024, 12:29 PM IST

Lok Sabha Election 2024 : अमरावतीत 37 उमेदवार रिंगणात असून विधानसभा मतदारसंघ निहाय एकूण 18 टेबलवर मतमोजणी प्रक्रिया राबविली जाणार आहे. निवडणुकीचा निकाल हा मतमोजणीच्या एकूण 112 फेऱ्यानंतर स्पष्ट होणार आहे.

Lok Sabha Election 2024
अमरावतीत 37 उमेदवार रिंगणात (Etv Bharat)

अमरावती - अमरावती लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल ला मतदान झाल्यावर आता चाळीस दिवसानंतर निवडणुकीचा निकाल आज समोर येणार आहे. अमरावतीचा नवा खासदार कोण असणार याचा निकाल आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवन या ठिकाणी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून मतमोजणी केंद्राच्या परिसरात सकाळपासूनच उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण आहे.

37 उमेदवार रिंगणात- अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदारसंघात एकूण 37 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण तीन ईव्हीएम मशीनद्वारे मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. आता मतमोजणीसाठी या तीनही एव्हीएम मशीनमध्ये सर्व सदतीस उमेदवारांना किती मत पडतील याची मोजणी होणार असल्यामुळे मतमोजणी प्रक्रियेला कदाचित विदर्भातील इतर मतदार संघापेक्षा थोडा उशीर लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

112 फेऱ्यानंतर स्पष्ट होणार निकाल- अमरावती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा निकाल हा मतमोजणीच्या एकूण 19 फेऱ्यानंतर स्पष्ट होणार आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या बडनेरा विधानसभा मतदारसंघातील 337 मतदान केंद्रावरील मतमोजणीच्या एकूण 19 फेऱ्या होणार आहेत. अमरावती विधानसभा मतदारसंघात 322 मतदान केंद्रावरील मतमोजणीच्या 18 फेऱ्या होतील. तिवसा मतदार संघातील 319 मतदान केंद्रावरील मतमोजणीच्या एकूण 18 फेऱ्या होणार आहेत. दर्यापूर मतदार संघातील 342 मतदान केंद्रावरील मतमोजणीच्या 19 फेऱ्या होतील. बडनेरा विधानसभा मतदारसंघातील 309 मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाच्या एकूण 18 फेऱ्या होणार आहेत. मेळघाट विधानसभा मतदारसंघातील 309 मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानाच्या एकूण मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहेत तर अचलपूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 354 मतदान केंद्रावरील मतमोजणीसाठी 19 फेऱ्या होणार आहेत.

18 टेबलवर मतमोजणी- लोकशाही भवन येथील तळमजल्यावर विधानसभा मतदारसंघ निहाय एकूण 18 टेबलवर मतमोजणी प्रक्रिया राबविली जाणार आहे. या 18 ही टेबलवर 18 मतमोजणी पर्यवेक्षक आणि 18 मतमोजणी सहाय्यक तसेच 18 सूक्ष्मनिरीक्षक, 18 शिपाई याप्रमाणे एकूण सहा मतदारसंघाकरिता 108 मतमोजणी पर्यवेक्षक आणि 108 मतमोजणी सहाय्यक 108 सूक्ष्म निरीक्षक 108 शिपाई याप्रमाणे 422 कर्मचारी आहेत. तसेच इतर कामाकरिता 500, कर्मचारी आणि 500 पोलीस कर्मचारी असे एकूण 1500 कर्मचारी मतदान केंद्रावर नेमण्यात आले आहेत.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त- मतमोजणी केंद्रावर कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलासह अमरावती पोलीस मतदान केंद्र परिसरात तैनात आहेत. मतमोजणी दरम्यान बियाणी चौक ते तपोवन मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मतमोजणी प्रक्रिया दरम्यान कुठेही गोंधळ होऊ नये यासाठी पोलीस दल मतमोजणी केंद्र परिसरासह संपूर्ण शहरात तैनात आहे.

हेही वाचा -

  1. राज्यात पहिल्या कलांमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष, सुप्रिया सुळे आघाडीवर - Maharashtra lok Sabha election
  2. कमळ की तुतारी? राजकीय वर्तुळाचं लक्ष साताऱ्याच्या निकालाकडं - Lok Sabha Election Results 2024
  3. बारामतीत नणंद विरुद्ध भावजय लढतीत कोण मारणार बाजी? लवकरच होणार निकाल स्पष्ट - Lok Sabha Election Result 2024

Last Updated : Jun 4, 2024, 12:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.