अमरावती Amravati Crime News : मेळघाटात गांजाची तस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दोन तस्करांना धारणी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 4 किलो 55 ग्रॅम गांजा आणि दुचाकी असा एकूण 1 लाख 42 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संजय गोपाळ इंगळे (वय- 52), आणि शेख सलमान शेख हिसा (वय- 32) असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. हे दोघंही अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील रहिवासी आहेत.
अशी झाली कारवाई : अमरावती अकोला जिल्ह्याच्या सीमेवर मेळघाटला लागून असणाऱ्या हिवरखेड येथील दोघेजण मेळघाटात गांजाची तस्करी करत असल्याची माहिती धारणी पोलिसांना मिळाली होती. यामुळं गेल्या दोन दिवसांपासून धारणीचे ठाणेदार अशोक जाधव यांच्या नेतृत्वात धारणी शहरालगत विविध मार्गांवर नाकेबंदी करून वाहनांची तपासणी केली जात होती. दरम्यान, धारणी ते कुसुमकोट मार्गावर नाकाबंदी दरम्यान एमएच 30 बीटी 2943 क्रमांकाच्या दुचाकीवर असणारे संजय आणि शेख सलमान यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ गांजाचा साठा आढळून आला.
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल : अकोला जिल्ह्यातून मेळघाटात धारणी तालुक्यात गांजाची तस्करी करणाऱ्या संजय इंगळे आणि शेख सलमान या दोघांनाही धारणी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळ 1 लाख 42 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे दोघंही मेळघाटात कोणत्या भागात गांजाची तस्करी करायचे, याचा तपास आता चौकशी दरम्यान केला जाईल, असं धारणीचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी सांगितलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जांभेकर, वसंत चव्हाण, नितीन बैरसिया, जगत तेलगोटे, मोहित आकाशे, रितेश देशमुख, सुहास डाके, कृष्णा जामूनकर या पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.
हेही वाचा -
- मुंबई विमानतळावर खेळण्यांमधून आणलेला १.९५ कोटींचा गांजा केला जप्त - Cannabis Seized
- गांजा तस्करी प्रकरण : शिंदे गटाच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठेंना तेलंगाणा पोलिसांकडून अटक - Lakshmi Tathe arrested
- स्विफ्ट कारमधून अंमली पदार्थांची तस्करी, गुप्त माहितीच्या आधारे एनसीबीने रचला सापळा, चौघांना अटक - Drug Smugglers Arrested