ETV Bharat / state

“अमित शाह अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज”, उद्धव ठाकरेंचा प्रहार - Uddhav Thackeray on Amit Shah - UDDHAV THACKERAY ON AMIT SHAH

Uddhav Thackeray on Amit Shah : उद्धव ठाकरे यांनी पुण्यात गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तिखट शब्दात टीका केली. अमित शाह अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज आहेत. आजपासून मी त्यांना अब्दालीच म्हणेन, असा प्रहार त्यांनी केला.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 4:28 PM IST

पुणे : Uddhav Thackeray on Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काही दिवसांपूर्वी पुण्यातील बालेवाडी येथे बैठक झाली होती. या सभेत अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानं हिंदुत्व सोडल्याचा आरोप अमित शाह यांनी त्यावेळी केला होता. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर निशाना साधला आहे. आज शिवसेना ठाकरे पक्षाची पुण्यात बैठक झाली. या सभेत उद्धव ठाकरेंनी अमित शाहांवर जोरदार टीका केली. “अहमद शाह अब्दालीचे अमित शाह राजकीय वंशज”, असल्याचा प्रहार यावेळी उद्धव ठाकरेंनी केला.

"आम्हाला हिंदूत्व शिकवू नये" : "काही दिवसांपूर्वी पुण्यात भाजपाचा कार्यक्रम झाला. इतिहासात डोकावलं, तर शाहिस्तेखान थोडा हुशार होता, असं म्हणावं लागेल. तीन बोटं कापल्यानंतर तो महाराष्ट्रात परत आला नाही. असंच अमित शाह यांनी थोडं शहाणपण घेतलं असतं, तर ते महाराष्ट्रात परत आले नसते. ज्यांनी आमचा विश्वासघात केला, त्यांनी आम्हाला हिंदूत्व शिकवू नये", असा टोला त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना लगावला.

"अहमदशाहची राजकीय ताकद हादरली" : “पण ते परत का आले? महाराष्ट्रातील जनतेनं दिलेला फटका त्यांच्या पचनी पडला नाही. हे पाहण्यासाठी ते आले होते का? अहमदशाह अब्दालीचे एक राजकीय वंशज पुण्यात आले. ते अहमद शाह होते आणि हे अमित शाह आहेत. अहमद शाहची राजकीय ताकद इथे हादरली. नवाझ शरीफ यांचा केक खाणाऱ्यांकडून हिंदू धर्म आम्ही का शिकायचा? शिवसेनेनं हिंदू धर्म सोडला, असा ते वारंवार आरोप करतात. आम्ही कधीही हिंदू धर्म सोडलेला नाही, सोडणार नाही. शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे देशद्रोही हिंदू असू शकत नाही. तुम्ही आमचा विश्वासघात केला आहे," असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंनी लगावाला.

"आम्ही हिंदुद्रोही कसे" : काँग्रेसशी युती केली, तर हिंदुद्रोही आम्ही ठरतो का? मग तुमचे राजकीय बाप श्यामा प्रसाद मुखर्जी मुस्लिम लीगच्या मांडीला मांडी लावून का बसले होते? जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तीसोबत सरकार स्थापन का केलं? आजही त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्याशी युती केली. नायडू कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत? नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? त्यांच्याकडं डोळेझाक करून तुम्ही आमच्यावर टीका करता" असे टीकेचे बाण त्यांनी अमित शाह यांच्यावर सोडले.

यापुढं मी अहमद शाह अब्दाली म्हणणार : आम्ही आतापासूनच अमित शाह यांना अहमद शाह अब्दालीच म्हणणार आहोत. जेव्हा तुम्ही मला बाळासाहेब ठाकरेंचं नकली मूल म्हटलं, तेव्हा तुम्हाला लाज वाटली नाही? मला औरंगजेबाचे फॅन क्लब म्हणाताना तुमची जीभ कशी अडखळत नाही? त्यामुळं तुम्ही अहमदशाह अब्दाली आहे, असं म्हणायला मी का घाबरायला हवं? तुम्हाला अहमदशाह अब्दाली हवे आहेत की, भगवा घेतलेले शिवसैनिक हवे आहेत, हे जनतेनं ठरवावं, असं अवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

हे वाचलंत का :

  1. विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा डॅमेज केली जातंय का? सत्ताधारी-विरोधी पक्षांचे 'हे' आहेत दावे - Maharashtra Politics
  2. का रे दुरावा? गंभीर आरोपांच्या फैरीनंतर फडणवीस-देशमुख एकाच मंचावर,पण... - Devendra Fadnavis vs Anil Deshmukh
  3. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी संघाच्या स्मृती मंदिराला दिली भेट; राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची रंगली चर्चा - Devendra Fadnavis

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.