ETV Bharat / state

अंबादास दानवे अन् चंद्रकांत खैरे यांचं मनोमिलन! खैरेंना शुभेच्छा देत दानवेंची प्रचाराला सुरुवात करण्याची घोषणा - Sambhajinagar Lok Sabha Election - SAMBHAJINAGAR LOK SABHA ELECTION

Sambhajinagar Lok Sabha Election : गेल्या अनेक दिवसांपासून संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे असा वाद सुरू होता. आता हा वाद संपुष्टात आला असून चंद्रकांत खैरे आणि दानवे यांचं मनोमिलन झालं आहे.

अंबादास दानवे अन् चंद्रकांत खैरे
अंबादास दानवे अन् चंद्रकांत खैरे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 31, 2024, 6:35 PM IST

पत्रकार परिषद

छत्रपती संभाजीनगर Sambhajinagar Lok Sabha Election : विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आणि संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद आता पूर्णतः मिटल्याचं चित्र आहे. रविवार (दि. 31 मार्च) रोजी सकाळी दानवे यांनी खैरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं. "यावेळी आम्ही दोघेही इच्छुक होतो, आता चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळाली असून, पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून मी त्यांचं काम करणार आहे," असं दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, "संभाजीनगर लोकसभा मतदार संघात महायुतीकडे उमेदवार नाही, त्यांना बाहेरच्या लोकांना विचारावं लागत असून, या मतदार संघात आमचं संघटन मजबूत आहे. (Sambhajinagar Lok Sabha Election) एका आठवड्यात आम्ही आमचा प्रचार संपवू शकतो," असं देखील दानवे म्हणाले आहेत.

दानवे यांनी खैरे यांना दिल्या शुभेच्छा : संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात उमेदवारी मिळवण्यावरुन काही दिवस कलगीतुरा रंगला होता. अंबादास दानवे भाजपात किंवा शिंदे गटात प्रवेश करणार अशा चर्चाही सुरू होत्या. मात्र, त्यावर असं होणार नाही, याबाबत दानवे यांनी अनेकवेळा स्पष्टीकरण दिलं. रविवारी सकाळी अंबादास दानवे यांनी (Chandrakant Khaire) चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली, इतकेच नाही तर त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. (Ambadas Danve Congratulated Khaire) यावेळी बोलताना "आमच्यात कुठलंही भांडण नाही. चंद्रकांत खैरे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि आमचे मार्गदर्शक आहेत. मी राज्याचा विरोधी पक्षनेता त्याचबरोबर संभाजीनगर जिल्ह्याचा जिल्हाप्रमुख देखील आहे. त्यामुळे सर्व गोष्टी मला हाताळाव्या लागतात. आमच्या पक्षात आम्ही दोघेच इच्छुक होतो. आमच्यात तिसरा कोणीही येणार नाही. आधी पण सांगितलं आहे की, पक्ष जो उमेदवार देईल त्याचा प्रचार करू. त्यामुळे आता चंद्रकांत खैरे उमेदवार आहेत तर त्यांचा प्रचार करणार," असं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजपचे दुर्दैव : "छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघात भाजपा किंवा एकनाथ शिंदे हे अद्याप ठरलं नाही. कारण त्यांना अजून उमेदवारच मिळत नाही. आबकी बार 400 पार जाऊ असं म्हणणाऱ्यांना उमेदवार मिळत नाही, हे दुर्दैव आहे," अशी टीका दानवे यांनी यावेळी केली. त्याचबरोबर "संभाजीनगर जिल्हा हा छोटा आहे. या जिल्ह्यात आम्ही ठरवलं तर दोन्ही बाजूने आमचा प्रचार करू आणि एक आठवड्यातच आमचा प्रचार संपेल अशी यंत्रणा आमची सज्ज आहे," असंही दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्या भेटीनंतर खैरे यांनी आनंद व्यक्त केला. "याआधी आम्ही ग्रामपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद, महानगरपालिका या सगळ्या निवडणुका सोबत नियोजन करुन लढल्या आहेत. या निवडणुकीतही आम्ही सोबत काम करू, आमच्यात कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत." असं चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा :

1 'पंतप्रधान मोदींकडून लोकसभा निवडणुकीसाठी 'मॅच फिक्सिंग'चा प्रयत्न', रामलीला मैदानातून राहुल गांधींचा घणाघात - INDIA Bloc Maharally LIVE Updates

2 बारामतीत कोणाची दिसणार 'पॉवर'? आतापर्यंत एकहाती वर्चस्व राखलेल्या मतदारसंघात काका-पुतण्यामध्येच प्रतिष्ठेची लढाई - Baramati Lok Sabha Constituency

3 भाजपामध्ये सगळे ठग गेल्यानं आम्ही ठगमुक्त झालो-उद्धव ठाकरे - Uddhav Thackeray In Delhi

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.