ETV Bharat / state

अमरावतीत 400 वर्ष जुने औषधी गुणयुक्त गोरखचिंचेचं झाड, मूळच्या आफ्रिकेतील या वृक्षाला असतं दीड ते दोन हजार वर्ष आयुष्य - Gorakhchinch tree

Gorakhchinche Tree : अमरावती शहरात गजबजलेल्या अशा शेगाव नाका चौक परिसरात गोरखचिंचेचं सुमारे साडेतीनशे ते चारशे वर्ष जुनं झाड मोठ्या डौलात उभं आहे. गोरखचिंच हे मुळात आफ्रिका खंडातील झाड असून आफ्रिका खंडात 'आफ्रिकन बाओबा' या नावाने ओळखले जाणारे हे झाड फार पूर्वी भारतात आले.

Gorakhchinche Tree
गोरखचिंचेचे झाड (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 18, 2024, 6:22 PM IST

गोरखचिंच झाडाविषयी माहिती देताना वनस्पती प्रेमी (Reporter)

अमरावती Gorakhchinche Tree : उत्तर भारतात या वृक्षांची संख्या अधिक असून अमरावती शहरात असणाऱ्या या झाडांचे बीजं महाराष्ट्रभर रुजवून या झाडाची लागवड राज्यभर करून हे झाड वाढविण्याचा प्रयत्न वृक्षप्रेमींकडून आता केला जात आहे. अतिशय दुर्मीळ असणाऱ्या वृक्षांमध्ये गोरखचिंच गणल्या जातं. याला गोरखइमली पंचकर्णिका, मंकी ब्रेड टी आणि कल्पवृक्ष या नावाने ओळखतात. या वृक्षाची उंची 50 फुटापर्यंत वाढते तर या वृक्षाच्या खोडाचा परीघ हा 100 फुटापर्यंत असतो. लांब देठाची फुलं या झाडाला येतात या फुलांना पाच पाकळ्या असतात. ह्या झाडाची फुले विशेषतः रात्री फुलतात आणि त्याचा छान सुवास रात्रभर दरवळतो. झाडावरील फुलं गळून पडल्यावर त्या ठिकाणी बाटलीच्या आकारासारखी भुल्यासारखी लांब फळं येतात. राखाडी रंगाची ही फुलं दुधी भोपळ्यासारखी टणक असतात. या फळांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवलं जातं.

या वृक्षाचा असा आहे फायदा : गोरखचिंचेच्या पानात क जीवनसत्व, शर्करा, पोटॅशियम आणि टारटरेट आहेत. या वृक्षाच्या ताज्या बियांची भाजी केली जाते तर अनेकदा या झाडांच्या बियांना भाजून त्याचा उपयोग कॉफी ऐवजी केला जातो. या वृक्षाच्या फळातील गरापासून शीतपेय तयार केलं जातं. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी या वृक्षाचे फळ आणि त्याचे पेय अतिशय उपयुक्त आहे. ताप ,आव, अजीर्ण, अतिसार, भोवळ यावर देखील हे पेय महत्त्वपूर्ण औषध असल्याची माहिती वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासक प्रा. डॉ. अर्चना मोहोड यांनी' ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.

या वृक्षाच्या झाडापासून तयार करतात होड्या : या वृक्षाचं लाकूड अतिशय हलकं असतं. त्यामुळे या वृक्षाच्या लाकडापासून मासेमारीसाठी अनेक भागात होड्या तयार केल्या जातात. या वृक्षाची आंतर साल उत्तम टिकाऊ असल्यामुळे त्याचा वापर ब्राऊन पेपर तयार करण्यासाठी देखील केला जातो. खोडाच्या आंतरजालापासून मजबूत दोर देखील तयार करण्यात येतो. फळांच्या वाळलेल्या करवंट्याचा उपयोग पाणी साठवणे आणि पाणी पिण्यासाठी देखील केला जातो. सुगरण पक्षी या वृक्षावर घरटी करतात, अशी माहिती देखील प्रा. डॉ. अर्चना मोहोड यांनी दिली.

वृक्षाला असे आले धार्मिक महत्त्व : नवनाथांपैकी एक समजले जाणारे नाथ संप्रदायाचे संस्थापक गोरखनाथ महाराज हे पहिल्या शतकाच्या पूर्वार्धात उत्तरेत होऊन गेले. गोरखनाथांचे मंदिर उत्तर प्रदेशात गोरखपूर या शहरात आहे. गोरखनाथांनी संपूर्ण भारतात भ्रमण करून अनेक ग्रंथ रचले. महाराष्ट्रातही अनेक भागात गोरखनाथांचे अनेक भाविक आहेत. गोरखनाथांनी ज्या वृक्षाखाली आपले सामाजिक विचार त्यांच्या अनुयायांना सांगितले त्या परदेशातून आलेला वृक्षाचे नाव कोणालाही त्यावेळी माहिती नव्हते. मात्र झाडाला लागलेल्या शेंगा या चिंचेच्या आकारासारख्या असल्यामुळे त्या झाडाला गोरखचिंच असं नाव पडलं असल्याची माहिती विविध वनस्पतींची माहिती असणारे लातूरच्या सह्याद्री देवराई संस्थेचे सदस्य शिवशंकर चापुले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. आम्ही या झाडाच्या बिया संकलित करून आमच्या लातूर जिल्ह्यात या झाडाची रोपं तयार करणार आहोत. यासह महाराष्ट्रभर हे झाड कसं पोहोचेल यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे देखील शिवशंकर चापुले म्हणाले.

अमरावतीत असा टिकून आहे हा वृक्ष : अमरावती शहरात परतवाडा मार्गावर आज अतिशय गजबजलेले गाडगे नगर हे 1960 मध्ये वसले. गाडगे नगरला लागून असणारे राठी नगर हे 1970 मध्ये वसण्यास सुरुवात झाली. यापूर्वी या संपूर्ण परिसरात शेत होतं. 1923 मध्ये किंग एडवर्ड कॉलेज अर्थात आजचे विदर्भ महाविद्यालय स्थापन झाले. त्यानंतर या भागात वर्दळ वाढायला लागली. 1960 ते 70 च्या दरम्यान मराठी नावाच्या व्यक्तीचे शेत असणारे आजच्या राठी नगरमध्ये लेआउट पडण्यास सुरुवात झाली. त्यावेळी राठी यांच्या शेतातील अनेक झाडं तोडण्यात आली. मात्र त्यावेळी लगतच्या शेगाव गावाकडे वळणाऱ्या मार्गावर शेताच्या धुर्‍यावर असणारे गोरखचिंच या झाडाचे महत्व शेतमालक राठी यांना कोणीतरी सांगितलं असल्यामुळे त्यांनी हे अतिशय महत्त्वपूर्ण झाड तोडलं नाही. शेगाव नाका ते राहटगाव मार्गाकडे वळताना चौकात अगदी उजवीकडेच गोरखचिंचेचं हे भलं मोठं झाड उभं आहे. आज या झाडाचं वय साडेतीनशे ते चारशे वर्ष असून अमरावतीच्या आणखी 15 ते 20 पिढ्यांपर्यंत हे झाड असंच येथे टिकून राहणार अशी त्याची क्षमता आहे, ही माहिती डॉ. अर्चना मोहेड यांनी दिली. अमरावतीकरांनी आजवर जपले त्याप्रमाणेच हे झाड असेच पुढे देखील जतन करून ठेवावं अशी अपेक्षा राज्यभरातील वृक्षप्रेमींकडून केली जाते.

दिवंगत विजय भोसले यांनी वृक्ष संवर्धनासाठी केला प्रयत्न : 2014 ते 2018 मध्ये सेवानिवृत्त उपवनसंरक्षक दिवंगत विजय भोसले यांनी शेगाव नाका चौक परिसरातील वृक्ष संवर्धनासाठी जागृती मोहीम राबविली होती. या वृक्षांच्या बियांचे संकलन करून अमरावती शहरासह लगतच्या जंगल परिसरात हे झाड वाढावे यासाठी त्यांनी वन अधिकाऱ्यांकडे अनेकदा पाठपुरावा देखील केला होता. कोरोना काळात त्यांचं निधन झाल्यानंतर गोरखचिंच या वृक्षाच्या संवर्धनासाठी अमरावतीत विशेष असा पुढाकार कोणाकडूनही घेतला गेला नाही.

हेही वाचा :

  1. तर विधानसभा लढविणारच, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा - Manoj Jarange Patil
  2. छत्तीसगडमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या; घटनेनंतर आरोपीनंही केली आत्महत्या - Killing Five People in Sarangarh
  3. काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत, त्यामुळे काँग्रेसला पाडा - योगी आदित्यनाथ - Yogi Adityanath In Malegaon

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.