मुंबई - Akshay Kumar infected with covid19 : रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या मुलाचे अनंत अंबानी याचे लग्न आज मुंबईत होत आहे. जगभरात चर्चा असलेल्या या लग्नासाठी कोण कोण उपस्थित राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्योग जगतातील तसेच राजकारण आणि सिने उद्योगातील बड्या असामींना लग्नासाठी निमंत्रण पत्रिका देण्यात आल्या आहेत. अनंत अंबानी यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता अक्षय कुमार यालाही मिळाली होती मात्र आता अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने तो या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाही.
अक्षय कुमार राहणार अनुपस्थित
दरम्यान सरफिरा या चित्रपटाचे प्रमोशन सुरू होते. या प्रमोशनच्या दरम्यान अक्षय कुमार या अस्वस्थ वाटू लागल्याने त्याची तपासणी करण्यात आली. या प्रमोशन करणाऱ्या पथकातील काही सदस्य यांना यापूर्वीच कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अक्षय कुमार याची सुद्धा चाचणी केली असता अक्षय कुमार याला कोव्हिड 19 ( covid-19 ) ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता अक्षय कुमार अनंत अंबानी यांच्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाही.
सरफिरा रिलीज दिवशी अक्षयचे चाहते काळजीत
सरफिरा रिलीजच्या दिवशीच त्याच्यावर उपचार सुरू असल्याच्या बातमीमुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत. अक्षय 12 जुलै रोजी अंबानी कुटुंबाच्या सेलिब्रेशनला जाणार होता. पण कोविडनंतर तो अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला उपस्थित राहणार नाही. याआधी अक्षय जामनगरला अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सेरेमनीमध्ये सहभागी झाला होता. या प्री वेडिंग सोहळ्यात त्यानं दमाल डान्सही केला होता. आता मात्र अनंत-राधिकाच्या लग्नात सगळेच त्याला मिस करणार आहेत.
अक्षय कुमारसाठी चाहत्यांची प्रार्थना
आज 12 जुलै रोजी अक्षयचा सरफिरा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सरफिरा हा जीआर गोपीनाथ यांच्या आयुष्यातील घटनांवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त राधिका मर्चंट देखील मुख्य भूमिकेत आहे. सरफिरामध्ये सीमा बिस्वास, परेश रावल आणि जय उपाध्याय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधा कोंगारा यांनी केले आहे. यापूर्वी सोरुराई पोत्रू या तमिळ भाषेतील त्यांच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याच चित्रपटाचा हा रिमेक आहे. यातील अक्षयची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे चाहत्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरुन दिसत आहे. अक्षय कुमारला कोरोना झाल्याची बातमी आल्यानंतर चाहते त्याला बरे वाटावे यासाठी प्रार्थना करताना दिसत आहे.
सरफिराला संमीश्र प्रतिसाद
दाखवण्यात आल्या आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अक्षय खूपच उत्सुक दिसत होता. चित्रपटाचे दिग्दर्शन सुधा कोंगारा यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त राधिका मर्चंट देखील मुख्य भूमिकेत आहे. सरफिरामध्ये सीमा बिस्वास, परेश रावल आणि जय उपाध्याय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
हेही वाचा -