ETV Bharat / state

अजित पवारांच्या विरोधात पुतण्या राजकीय मैदानात, प्रथमच राजकारणातील प्रवेशावर मांडली स्पष्ट भूमिका - Yugendra Pawar visited Baramati

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत काम करणार असल्याचेही संकेत दिले आहेत.

युगेंद्र पवार पत्रकारांशी बोलतना
युगेंद्र पवार पत्रकारांशी बोलतना
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2024, 8:17 PM IST

युगेंद्र पवार पत्रकारांशी बोलतना

बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आज बुधवार (दि. 21 फेब्रुवारी) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या पक्ष कार्यालयाला भेट दिली. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अनेक घडामोडी आपण बघत आहोत. त्यातच नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुटुंबात मला एकटं पाडलं जात असल्याचं म्हटलं होतं. त्याची चर्चा सुरू असतानाच युगेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी बोलताना आगामी लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेनुसार काम करणार असल्याचं युगेंद्र पवार यांनी यावेळी सांगितलं.

माझे आई-वडीलही मला पाठिंबा देतील : लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होण्याची चर्चा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या राजकीय प्रवेशाचं स्वागत केलं आहे. यावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, "ज्येष्ठ नेत्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केल्यानं मलाही याचा आनंदच आहे. तसंच, माझ्या भूमिकेला माझे आई-वडीलही मला पाठिंबा देतील."

कुस्तीगीर संघाच्या वतीने कुस्त्यांचं आयोजन : युगेंद्र पवार हे जलसंधारण, ओढा खोलीकरण, पर्यावरण समृद्ध राहण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात सीडबॉल निर्मितीच्या उपक्रमात योगदान देतात. अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना विहिरी खोदून दिल्या आहेत. युगेंद्र पवार हे राजकारणात सक्रिय नव्हते. मात्र, राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर बारामतीमध्ये शरद पवार यांच्या गटाला कार्यकर्ते आहेत की नाही, असा सवाल उपस्थित झाला. त्याचवेळी पहिल्यांदा त्यांनी बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीनं कुस्त्यांचं आयोजन करून शरद पवार यांना निमंत्रित केलं होतं.

''अद्याप सक्रिय राजकारणात नाही'' : मी सध्या संपूर्णपणे राजकारणात सक्रिय व्हायचा निर्णय घेतलेला नाही. मी व्यावसायिक आहे. मी यापूर्वी मुंबईत कार्यरत होतो. सध्या पुण्यात कार्य करतो. काही वर्ष पुण्यात शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर दोन-तीन वर्ष युरोपला होतो. अमेरिकेत गेली सात-आठ वर्ष काम करीत होतो. मी पुन्हा भारतात येईल, असं वाटत नव्हतं. पण मी पुन्हा भारतात परतलो. कुटुंबाचा व्यवसाय पहायला सुरुवात केली. चार वर्षांपूर्वी शरद पवार साहेब यांनी विद्या प्रतिष्ठान संस्थेवर माझी निवड केली. त्यामुळे राजकारण आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी घरातूनच मला मिळाल्या आहेत," अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

राजकारण आणि कुटुंब वेगळ्या गोष्टी : अजित पवार यांची निवड करणार की शरद पवार असं विचारलं असता युगेंद्र म्हणाले की, "राजकारण आणि कुटुंब या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अजित पवार यांची वैचारिक भूमिका वेगळी असली तरी कुटुंब म्हणून आम्ही एकच आहोत. मी जेव्हा अजित पवारांना भेटतो तेव्हा राजकारणाबाबात कसलाच विषय होत नाही. मी त्यांना पुतण्या म्हणूनच भेटतो. परंतु, शरद पवार यांच्यावर माझी जास्त निष्ठा आणि श्रद्धा आहे. त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. त्यामुळे शरद पवार म्हणतील तीच माझी भूमिका असेल," असंही युगेंद्र पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा :

1 शरद पवार गटासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना उच्च न्यायालयाची नोटीस

2 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम, नाशिकमधील शेतकऱ्यांमध्ये संताप

3 काकांविरोधात बंड करणाऱ्या अजित पवारांच्या सख्ख्या पुतण्याची 'आजोबां'ना साथ, राजकारणात होणार सक्रिय?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.