ETV Bharat / state

निधी वाटपावरून दोन मंत्र्यांमध्ये वाद; संजय राऊत म्हणतात "महाराष्ट्राला कंगाल केलं..." - Sanjay Raut on Mahayuti - SANJAY RAUT ON MAHAYUTI

sanjay raut : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुतीच्या मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी निधीची मागणी करताच पैसे कुठून आणायचे? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. यावर आता शिवसेना ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी निशाणा साधला.

Sanjay raut
Sanjay raut (Source - Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 24, 2024, 1:22 PM IST

मुंबई Sanjay raut : महायुतीत सर्वकाही अलबेल असल्याचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सातत्याने सांगत असले तरी, अजित पवार यांच्यावर होणारी टीका आणि महायुतीतील प्रमुख दोन घटक पक्ष भाजप आणि शिवसेना शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा सातत्यानं सुरू आहेत. अशातच आता मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री अजित पवार निधी वाटपावरून या दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.

बैठकीत नेमकं काय घडलं? : याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विकास निधीवरून गिरीश महाजन आणि अजित पवार यांच्यात वाद झाल्याचं सूत्रानं सांगितलं. मंत्रिमंडळ बैठकीत गिरीश महाजन यांनी आपल्या विभागांतर्गत येणाऱ्या विविध योजनांसाठी अतिरिक्त निधी देण्यात यावा, अशी मागणी गिरीश महाजन यांनी अजित पवारांकडे केली. सिन्नर मतदारसंघात एका स्मारकासाठी कोट्यवधीच्या निधीची तजवीज कशी काय करण्यात आली असा सवाल गिरीश महाजनांनी उपस्थित केला. "राज्याच्या तिजोरीत पैसेच नसतील तर तुम्ही नको तिथे पैसे का खर्च करता? जिथे गरज नाही तिथे खर्च करू नका" अशा शब्दात अजित पवारांना उत्तर दिलं. अजित पवार यांनी चढ्या आवाजात मागणी फेटाळल्यानं संतप्त झालेल्या गिरीश महाजन यांनीदेखील अर्थमंत्री अजित पवार यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं. 'पैसे कुठून आणायचे? आता काय जमिनी विकायच्या का?' असा सवाल करत गिरीश महाजन यांची मागणी फेटाळून लावली.

जास्तीत जास्त निधी उभारण्याचा प्रयत्न - विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी महायुती सरकार विविध योजनांद्वारे राज्यातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांमध्ये महायुतीचे नेते आणि आमदारही आपापल्या मतदारसंघासाठी आणि मतदारांसाठी जास्तीत जास्त निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहेत.

संजय राऊतांची टीका : राज्यात निधीवाटपावरून रस्सीखेच सुरू असताना संजय राऊत यांनी अर्थसंकल्पावरूनदेखील एनडीए सरकारवर टीका केली. खासदार राऊत यांनी म्हटले, "महायुतीतील नेते केंद्रीय अर्थसंकल्पाचं कौतुक करत आहेत. पण हा देशाचा अर्थसंकल्प नसून गुजरातच्या इस्ट इंडिया कंपनीचा अर्थसंकल्प आहे. निर्मला सीतारामन यांना बिहारमधील पूर दिसला. पण यांना महाराष्ट्रातील पूर दिसला नाही. लोकसभा निवडणुकीत ज्या राज्यांकडून यांना पीडा झाली, त्या राज्याला काही द्यायच नाही, असं यांनी ठरवलं. केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्याय होताेय. महाराष्ट्रावर आठ लाख कोटींचं कर्ज आहे." मंत्रिमंडळातील वादावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. खासदार राऊत यांनी म्हटले, " एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांमध्ये सुरू असलेला संघर्ष संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. गिरीश महाजन यांनी निधी मागितला तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, जमीन विकून पैसे आणू का? असं म्हणतात याचा अर्थ राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. दिल्लीनं महाराष्ट्राला कंगाल केलं."

हेही वाचा

  1. "केंद्र सरकारचा गोडवा गाणाऱ्या महायुतीनं महाराष्ट्रासाठी काय आणलं?"; अर्थसंकल्पावरुन विरोधकांची सरकारवर टीका - Union Budget 2024
  2. घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पक्षात 'शिंदेशाही', शिवसेना ठाकरे पक्षानं कशामुळे केले गंभीर आरोप? - Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
  3. "केंद्रीय अर्थसंकल्प विजय वडेट्टीवारांनादेखील भावला"; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला - UNION BUDGET 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.