ETV Bharat / state

केंद्र सरकार पुन्हा कांदा निर्यात बंदी करणार नाही - अजित पवार - Ajit Pawar On onion export

Ajit Pawar On onion export : " पुन्हा केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालणार नाही, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्रीय कृषिमंत्री चौहान, राज्याचे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आम्हाला कांद्या निर्णयाबद्दल चर्चा करण्यासाठी दिल्लीत बोलल्याचं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
अजित पवार यांची पत्रकार परिषद (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2024, 10:50 PM IST

मुंबई Ajit Pawar On onion export : महाराष्ट्रातील कांद्या प्रश्नाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलंय. "केंद्रात आणि राज्यात आमच्या विचाराचं सरकार असल्यानं कांदा निर्यातीवर बंदी घालणार नाही," असं थेट केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीच सांगितल्याचं अजित पवार म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार यांची पत्रकार परिषद (ETV BHARAT Reporter)

कांदा निर्यातीवर बंदी नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले "वाढवन बंदराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी राज्यात येणार आहेत. देशाचे कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मी उपस्थित होतो. त्यावेळी आम्ही कृषीमंत्र्यांना सांगितलं की, केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालणार नाही, अशी आशा आहे. सोयाबीन, कापूस, ऊस या दोन-तीन प्रश्नांवर चर्चा झाली. मला त्यांची काम करण्याची पद्धत आवडली. एक रुपया पीक विम्याचा मार्गही त्यांनी मोकळा केला. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी या विषयावर दिल्लीत चर्चा करणार असल्याचं सांगितलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासमोर चर्चा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय."

नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे : "आधार कार्ड बँक लिंक नसल्यामुळं अनेक महिला या योजनेपासून वंचित आहेत. या योजनेचे पैसे भगिनींना पूर्ण देण्यात यावेत, असं निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. लाडक्या बहिणीला सुरक्षा भाऊ देत आहे. कोणत्याही सरकारला एखादी वाईट घटना घडावी, असं वाटत नाही. त्यामुळं आशा नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे, अशा प्रकारे सरकारनं पावले उचलली आहेत,"असे अजित पवारांनी सांगितलं.

लाभार्थी एकच जात : "मी जातीपातीला महत्व देत नाही. जेव्हाही मी राज्यात फिरतो, तेव्हा शेतकऱ्यांना भेटतो. आम्ही आणलेल्या योजनांमध्ये सर्व स्तरातील गरीबांचा समावेश आहे. योजनेसाठी व्यक्ती गरीब असावी. ती राज्यातील कोणत्याही समाजाची असावी. इतर योजना वेगवेगळ्या समजुतीसाठी आहेत. त्यामुळं लाभार्थी ही एकच जात आहे," अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महा राष्ट्रवादी व्हॉट्सॲप हेल्पलाइन : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सरकारच्या योजनांच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आज हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "संदेश पाठवून सरकारच्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहचेल. त्यासाठी महा राष्ट्रवादी व्हॉट्सॲप हेल्पलाइन क्रमांक ९८६१७१७१७१ जारी करण्यात आला. पुढील महिन्यात पक्षाच्या वतीनं या हेल्पलाइन क्रमांकाचे स्टिकर घरोघरी लावण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयात एक डेस्क तयार करून लोकांच्या तक्रारींचा दररोज आढावा घेतला जाणार आहे," अशी माहिती त्यांनी दिली.

'हे' वाचलंत का :

  1. "स्वार्थासाठी गद्दारी करणारा तुमचा लाडका भाऊ होऊ शकतो का?", मनमाड सभेत आदित्य ठाकरेंचा प्रहार - Aaditya Thackeray Manmad Sabha
  2. महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र, देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची घेतली भेट - Maharashtra politics
  3. "यांच्याकडे आपण लक्ष देत नाही...", शिंदेंच्या आमदाराला अजित पवारांनी एका वाक्यात दिलं उत्तर - Ajit Pawar On Mahendra Thorve

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.