ETV Bharat / state

बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार होणार लढत; अजित पवार यांना उमेदवारी जाहीर - NCP RELEASES CANDIDATE LIST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Ncp Releases Candidate List
संपादित छायाचित्र (ETv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2024, 1:11 PM IST

Updated : Oct 23, 2024, 1:43 PM IST

मुंबई : विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी राज्यात सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपल्या 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत पुन्हा पवार विरोधात पवार लढत होणार आहे.

Ncp Releases Candidate List
राष्ट्रवादी काँग्रेसची यादी (Reporter)

सुलभा खोडके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे जोरदार पडघम वाजू लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून आता जागा वाटपाबाबत अधिक स्पष्टता यायला सुरुवात झाली आहे. तर भाजपानं 99 जणांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली 38 जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात बहुसंख्य पूर्वीच्या आमदारांना पुन्हा मैदानात उतरवण्यात आलं आहे. तत्पूर्वी सुलभा खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सुलभा खोडके यांना अमरावतीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Ncp Releases Candidate List
राष्ट्रवादी काँग्रेसची यादी (Reporter)

कोणत्या मतदार संघात कोणाला उमेदवारी ? : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 38 जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीतील प्रमुख उमेदवारांना या पहिल्या यादीत स्थान देण्यात आलं आहे. यात बारामतीतून अजित पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कागलमधून हसन मुश्रीफ, आंबेगावमधून दिलीप वळसे-पाटील, इंदापूरमधून दत्ता भरणे, मावळमधून सुनील शेळके, सुलभा खोडके यांना अमरावतीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उदगीरमधून संजय बनसोडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर येवल्यातून छगन भुजबळ यांना उमेदवारी जाहीर झाली. विशेष म्हणजे चंदगड विधानसभा मतदारसंघात महायुतीत रस्सीखेच होती. इथं भाजपाचे शिवाजी पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी जनभावना होती. मात्र शिवाजी पाटील यांना उमेदवारी देण्यात न आल्यामुळं ते आता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

हेही वाचा :

  1. विधानसभा निवडणूक 2024 : राष्ट्रवादीच्या 27 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, सयाजी शिंदे, रुपाली चाकणकरांसह 'या' नेत्यांचा आहे समावेश
  2. "दादा न्याय देतील असं वाटलं होतं, पण…", पुणे शहराध्यक्षांनी व्यक्त केली खदखद; घेतला मोठा निर्णय
  3. घड्याळ चिन्ह अजित पवारांकडेच राहणार; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

Last Updated : Oct 23, 2024, 1:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.