ETV Bharat / state

अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष - राहुल नार्वेकर - शरद पवार

Ajit Pawar faction real NCP : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निकाल दिला आहे. तसंच दोन्ही गटांचे आमदार नार्वेकरांनी पात्र ठरवले आहेत. त्यामुळं शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

Ajit Pawar Group real NCP
Ajit Pawar Group real NCP
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2024, 5:49 PM IST

Updated : Feb 15, 2024, 6:16 PM IST

मुंबई Ajit Pawar faction real NCP : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या पाच याचिकांवर आज निकाल दिलाय. अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निकाल देत राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गटाला मोठा दिलासा दिला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेप्रकरणी पाच याचिकांवर निर्णय दिला. शरद पवार गटाकडून तीन तर अजित पवार गटानं दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावरील निकालाचं वाचन करताना राहुल नार्वेकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेले निकष, पक्षाची घटना, पक्षाचं नेतृत्व, पक्षाचा विधिमंडळ गट या निकषांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा : विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालानं शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाला 41 आमदारांचा पाठिंबा आहे. 53 पैकी 43 आमदार अजित पवार गटाकडं आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांचा असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. निकालात राहुल नार्वेकर म्हणाले की, शरद पवारांच्या अध्यक्ष पदाला आव्हान देण्यात आलं नव्हतं. अध्यक्ष पदाच्या दाव्यासाठी दोन्ही गटाकडून पुरावे सादर करण्यात आले. राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण? हे ठरवण्याचा अधिकार मला नाहीय. 30 जून 2023 रोजी राष्ट्रवादीत फूट पडली होती. त्यापूर्वी त्यांच्यात कोणताही वाद नव्हता.

निकाल पत्रात काय म्हटल? : अजित पवार गटाला 53 पैकी 41 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळं अजित पवार गटाला कायदेशीर पक्षाचा अधिकार आहे. पक्षाच्या घटनेबाबत कोणताही वाद नाही. पक्षाची घटना लक्षात घेण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसंच 10 व्या सूचीनुसार निकाल देण्यात येणार आहे. दोन्ही गटांनी आपलाचं राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा केला आहे. त्याबाबत दोन्ही गटांनी म्हणण मांडलं आहे.

हे वाचलंत का :

  1. विधीमंडळातील बहुमताच्या आधारे राष्ट्रवादी अजित पवारांकडेच राहणार- राहुल नार्वेकर
  2. इलेक्टोरल बाँडबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लोकशाही वाचवणारा, विरोधी पक्षानं केलं निर्णयाचं स्वागत
  3. आमदार अपात्र झाले तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ, ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्याकडून तो काढून घेतात यावर काय अपेक्षा करायची - सुप्रिया सुळे

Last Updated : Feb 15, 2024, 6:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.