मुंबई Mumbai Rain : मुंबईतील अनेक भागात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई तसेच उपनगरांत आज सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. दरम्यान मुसळधार पावसामुळं मुंबईतील अनेत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर काही उड्डाणे शहरातील जवळच्या विमानतळांवर वळवण्यात आली. वाहतूक सेवेवरही याचा परिणाम जाणवत आहे. मुंबई लोकल काही मिनिटं उशिरानं धावत आहे.
एअर इंडिया देणार रिफंड : मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसामुळे उड्डाण सेवेवर परिणाम झाला आहे. पावसामुळे काही उड्डाणे रद्द तर काही उड्डाणे इतर ठिकाणी वळवण्यात आली आहेत. एअर इंडियाने प्रवासासाठी कन्फर्म झालेल्या बुकिंगसाठी पूर्ण परतावा किंवा एक वेळचं विनामूल्य रीशेड्युलिंग ऑफर देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक लिंक शेअर करत लोकांना विमानतळावर जाण्यापूर्वी फ्लाइटची स्थिती तपासण्यास सांगितलं. एअर इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिलीय.
🗓️ २२ जुलै २०२४
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 22, 2024
⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
🌊 भरती - दुपारी - १२:५० वाजता - ४.५९ मीटर
ओहोटी - सायंकाळी - ०६:५७ वाजता - १.५५ मीटर
🌊 भरती - (उद्या - दि.२३.०७.२०२४) मध्यरात्री - १२:४५ वाजता -…
मुंबई पोलिसांकडून ॲडव्हायझरी : मुंबईतील पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. सर्वसामान्यांनी किनारपट्टी भागात न जाण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. यासोबतच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असं आवाहनही मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे. आपत्कालीन परिस्थितीत 100 क्रमांकावर फोन करण्याचं आवाहनदेखील करण्यात आलं.
#ImportantUpdate: Flights to and from Mumbai are getting affected due to heavy rains. Guests are advised to start early for the airport, as slow traffic and waterlogging may delay movement.
— Air India (@airindia) July 21, 2024
Please check flight status before heading to the airport by clicking here:…
- ऑरेंज अलर्ट जारी : मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह कोकणातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं आज मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Heavy rains in Mumbai are affecting flight operations and resulting in cancellation and diversion of some of our flights. Air India is offering full refunds or a one-time complimentary rescheduling for bookings confirmed for travel on 21st July 2024.
— Air India (@airindia) July 21, 2024
Please check flight status…
हेही वाचा
- मुसळधार पावसाचा नागपूरला फटका : दोघांचा मृत्यू, बालक अजूनही बेपत्ता; आज मुसळधार पावसाचा इशारा, शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर - Heavy Rain Hit To Nagpur
- चंद्रपुरात पुराचा हाहाकार; चिचपल्लीतील मामा तलाव फुटल्यानं तीनशे घरात पाणी; रेड अलर्टमुळे शाळांना सुट्टी - Heavy Rain Hit To Chandrapur
- कोकणातील नागरिकांना सावधानतेचा इशारा: हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता - Maharashtra Weather Update