ETV Bharat / state

कल्याण - नगर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; सहा जणांचा अंत - ऊसाची ट्रॉली

Accident on Kalyan Highway : कल्याण-नगर महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. एसटी बस, कार आणि ट्रॅक्टरचा विचित्र अपघात झालाय. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय.

कल्याण - नगर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2024, 10:53 AM IST

Updated : Jan 24, 2024, 11:10 AM IST

अहमदनगर Accident on Kalyan Highway : अहमदनगर जिल्ह्यातील भाळवणी जवळील कल्याण - नगर महामार्गावर एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर अशा तीन वाहनांची धडक होऊन भीषण अपघात झालाय. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय. तर अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना तातडीनं उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जातंय. या अपघातामुळं या महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

कसा झाला अपघात : कल्याण - नगर महामार्गावर ऊस वाहतुक करणारा ट्रक्टर, ठाणे - मेहकर एस टी बस आणि इको गाडी यांची ढवळपुरी फाट्याजवळ पहाटेच्या सुमारास जोरदार धडक झाली. या विचित्र अपघातात सहा जण जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता, की यात तिन्ही वाहनांचा अक्षरश: चुराडा झालाय. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना प्राथामिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या अपघातातील काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलंय. या अपघातामुळं कल्याण - निर्मल महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनं बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान अपघातग्रस्तांची ओळख पटविण्याचं काम सुरू असल्याचं सांगण्यात आलंय.

एसटी बस व ट्रॅक्टर चारचाकीला धडकून अपघात : नगर जिल्ह्यातील हिवरे कोरडा शिवारात पहाटे तीनच्या सुमारास एसटी बस ठाणेहून नगरला येत असतानाच समोर ऊसाची ट्रॉली पलटी होऊन ऊस रस्त्यावर पडला होता. दुसरा ट्रॅक्टरवाला ट्रॅक्टर पुढं लावून त्यातील मजूर मदत करत होते. हे पाहून कार चालक त्याठिकाणी थांबून पार्किंग लाईट लावून रोडवरील वाहनांना दिशा देत होता. त्याचवेळी एसटी बस व ट्रॅक्टर चारचाकीला धडकून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

हेही वाचा :

  1. सिग्नल दुरुस्त करताना धडकली लोकल; रेल्वेच्या तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू, वारसांना मदत जाहीर
  2. अटल सेतूवर पहिला अपघात! महिलेचं नियत्रण सुटल्यानं गाडी पलटी; पाहा व्हिडिओ

Last Updated : Jan 24, 2024, 11:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.