ETV Bharat / state

मनोज जरांगेंच्या लढ्याला यश, मराठा आंदोलकांचा नवी मुंबईत जल्लोष - मनोज जरांगेंच्या लढ्याला यश

Maratha Community Celebration : राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत, आज (27 जानेवारी) त्याचे अध्यादेश काढले आहेत. त्यामुळं मनोज जरांगेंसह मराठा समाजाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांचा जल्लोष पाहायला मिळतोय.

after maratha reservation announcement maratha community celebratio in navi mumbai
मनोज जरांगेंच्या लढ्याला यश, मराठा आंदोलकांचा नवी मुंबईत जल्लोष
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2024, 2:26 PM IST

नवी मुंबई Maratha Community Celebration : मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला मोठं यश मिळालं असून मध्यरात्री तीन तास चर्चा झाल्यानंतर सरकारनं मनोज जरांगेच्या सर्व मागण्यांचा सुधारित अधिसूचना जारी करुन त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळं गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजाच्या मागणीला मोठं यश आलंय. याच पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा आंदोलकांचा जल्लोष पाहायला मिळतोय.

  • #WATCH | Navi Mumbai: Maratha reservation activists celebrate after Manoj Jarange Patil announces to end the protests today as the government has accepted their demands pic.twitter.com/V1KxosEHRm

    — ANI (@ANI) January 27, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नवी मुंबईत जल्लोष : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला मोठं यश मिळाल्यानं मराठा समाजाच्या वतीनं नवी मुंबईत जल्लोष केला जात आहे. डीजेच्या तालावर नाचत मराठा आंदोलक आनंद साजरा करतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, राज्य सरकारनं मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करताच नवी मुंबईत मराठा आंदोलकांनी मध्यरात्रीपासूनच जल्लोष सुरू केला होता. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, तसंच आंदोलकांवरील गुन्हे तातडीनं मागे घेण्यात यावेत, यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत होते. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सुरुवात जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून झाली होती. सरकारला दिलेला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम संपल्यानंतर जरांगे यांनी मुंबईत धडकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, 26 जानेवारीला मराठ्यांचं वादळ नवी मुंबईत येऊन धडकलं होतं.

मुख्यमंत्र्यांचा ताफा नवी मुंबईत : दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा वर्षा बंगल्यावरुन नवी मुंबईच्या दिशेनं दाखल झाला आहे. शिंदे मराठा आंदोलकांची भेट घेतली असून त्यांच्याकडं राज्य सरकारचा नवा अधिसूचना सूपुर्द केला आहे. यानंतर मनोज जरांगेंनी आपलं उपोषण सोडलं असून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा -

  1. मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी 'असं' सुरू आहे सर्वेक्षण; 'ईटीव्ही भारत'चा ग्राऊंड रिपोर्ट
  2. मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस; 'मुंबईतील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता'
  3. 'भगवं वादळ' आज धडकणार नवी मुंबईत; तगडा पोलीस बंदोबस्त, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत कसं आहे नियोजन ?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.