ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अनधिकृत बांधकामांची झाडाझडती, पाचगणीतील 'त्या' हॉटेलला ठोकलं टाळं - Pune Hit and Run Accident - PUNE HIT AND RUN ACCIDENT

Illegal Construction : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडिल विशाल अग्रवालनं शासकीय मिळकतीवर पंचतारांकित हॉटेल आणि क्लब उभारल्याची बाब समोर आल्यानंतर अशा अनाधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

पाचगणीतील 'त्या' हॉटेलला ठोकलं टाळं
पाचगणीतील 'त्या' हॉटेलला ठोकलं टाळं (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 31, 2024, 10:51 PM IST

सातारा Illegal Construction : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडिल विशाल अग्रवालनं लीजवर घेतलेल्या शासकीय मिळकतीवर पंचतारांकित हॉटेल आणि क्लब उभारल्याची बाब समोर आली. अशा अनाधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर प्रशासकीय कारवाईला वेग आलाय. अग्रवालचे हॉटेल सील केल्यानंतर प्रशासनानं शुक्रवारी पाचगणीतील फर्न हॉटेलही सील केलंय.

नंदनवनात अनाधिकृत बांधकामांचा विषय ऐरणीवर : महाराष्ट्राचं मिनी काश्मीर अर्थात थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वर, पाचगणीत धनिकांनी मालमत्ता खरेदी केल्या आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामं केली आहेत. सध्या अनाधिकृत बांधकामांचा विषय ऐरणीवर आलाय. पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवालच्या अनाधिकृत हॉटेलच्या वादग्रस्त प्रकरणानंतर माहिती अधिकार कार्यकर्त्यांसह नागरीकांनी अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी अनाधिकृत असलेल्या बांधकामांवर बुलडोझर फिरविण्याचे थेट आदेशच जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर प्रशासकीय हालचालींना वेग आला.

अनाधिकृत कामामुळं पाचगणीतील हॉटेल सील : पाचगणीतील फर्न हॉटेलचं बरंच बांधकाम हे अनाधिकृत असल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापनास नोटीस बजावून संपूर्ण हॉटेल सील करण्यात आलं आहे. यानंतर लवकरच प्रशासनाकडून अनाधिकृत बांधकामावर हातोडा पडणार आहे. दरम्यान, महाबळेश्वर आणि पाचगणीतील अनाधिकृत बांधकामांची माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं बेकायदा बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवालचं महाबळेश्वरातील अनाधिकृत हॉटेल आणि क्लब प्रशासनानं सील केला होता. त्यानंतर शुक्रवारी पाचगणीतील फर्न हॉटेलही सील करत अनाधिकृत बांधकामे करणाऱ्यांना दणका दिलाय. यामुळं प्रशासन पुढं काय काय कारवाई करणार, याकडे महाबळेश्वर, पाचगणीतील व्यावसायिकांचं लक्ष लागलंय.

हेही वाचा :

  1. EXCLUSIVE: "...म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी रस्त्यावर"; 'ईटीव्ही भारत'च्या मुलाखतीत विरोधकांच्या दाव्याला मुख्यमंत्र्यांचं रोखठोक उत्तर - CM Eknath Shinde Interview
  2. महाबळेश्वरातील जमीन घोटाळ्याप्रकरणी जीएसटी आयुक्तासह तिघांना नोटीस; ११ जून रोजी सुनावणी - Mahabaleshwar land scam case
  3. पुणे हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये खासगी व्यक्तींकडून फेरफार, ते चार जण कोण? - Pune Hit And Run Case Update

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.