ETV Bharat / state

लैला खान हत्याकांड; लैला खान आणि इतर भावंडांचा डीएनए केवळ आईशी जुळला, अद्याप बाप नाही कळला, सत्र न्यायालय शुक्रवारी शिक्षा ठोठावणार - Laila Khan Murder Case - LAILA KHAN MURDER CASE

Laila Khan Murder Case : बॉलीवूड अभिनेत्री लैला खान (Laila Khan) आणि तिच्या कुटुंबातील पाच जणांच्या हत्याकांड प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपी परवेझ टाक (Accused Parvez Tak) याला सत्र न्यायालय शुक्रवारी शिक्षा ठोठावणार आहे. सरकारी पक्षानं हे दुर्मिळ प्रकरण असल्यानं आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडं केलीय. २०१२ मध्ये उघडकीस आलेल्या या भयानक हत्याकांडानं बॉलीवूड जगतासह संपूर्ण भारतात खळबळ उडाली होती. काय आहे हे दुर्मिळ प्रकरण हे पाहुयात.

Laila Khan Murder Case
लैला खान हत्या प्रकरण (ETV Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 10:53 PM IST

Updated : May 24, 2024, 12:12 PM IST

मुंबई Laila Khan Murder Case : 2011 मध्ये आरोपी असलेल्या सावत्र बाप परवेज टाक (Accused Parvez Tak) याने लैला खान (Laila Khan), तिची आई सेलिना, जुळी भावंडं झारा आणि इम्रान, मोठी बहीण हाश्मीना आणि अफ्रिन पटेल यांची इगतपुरीच्या फार्महाउसवर नेऊन निर्घृण हत्या केली होती. पोलिसांपासून सुटका व्हावी म्हणून परवेजने फार्महाउसवर स्विमिंग पूलसाठीच्या खड्ड्यात मातीचा भर टाकून आणि गाद्यांखाली हे सहा मृतदेहा गाडले होते.

सहा मानवी सांगाडे बाहेर काढले : याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा ४ जुलै २०१२ रोजी दाखल झाला आणि हा गुन्हा गुन्हे शाखेच्या कक्ष ८ कडं वर्ग करण्यात आला. कक्ष ८ कडं तपास आला आणि तपासाची चक्रे जोरदार फिरली. कक्ष ८ चे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरु झाला आणि अवघ्या चार दिवसात म्हणजेच ८ जुलै २०१२ ला आरोपी परवेज टाक याला जम्मू काश्मीरमधील किश्तवाड येथून बेड्या ठोकत मुंबईत आणले. परवेजला बोलतं करून इगतपुरी येथील फार्महाउसपर्यंत कक्ष ८ चे पथक पोहोचले. कक्ष ८ च्या पोलिसांनी परवेजने दाखवलेल्या ठिकाणी उत्तखनन करून सहा मानवी सांगाडे बाहेर काढले होते. या सांगाडयांचा डीएनए केवळ सेलिना यांच्याशी जुळला.

डीएनए आईशी जुळले : सेलिनाचा पहिला पती नासिर पटेल, दुसरा असिफ शेख आणि तिसरा परवेज इकबाल टाक यांच्याशी एकाही आपत्याचा डीएनए जुळलेला नाही ही तपासातील विशेष बाब आहे. सेलिनाचा पहिला पती नासिर पटेल हा सध्या हयात नसून दुसरा पती असिफ शेख हा पुण्यात राहतो. डीएनए आईशी जुळले असून पोलिसांना सापडलेल्या सांगाड्यांवर सोन्याचे दागिने आणि इतर गोष्टींमुळं देखील त्यांची ओळख पटली असल्याचं एका तपासातील पोलिसांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे भक्कम पुरावे म्हणून सहा मानवी सांगडे अजूनपर्यंत तब्ब्ल १३ वर्ष पोलिसांनी जतन करून ठेवले आहेत.

मुंबई ते जम्मू काश्मीर अशी झाली गुन्ह्याची उकल : कक्ष ८ कडे तपास आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये लैला खानची आई सेलिना हिची स्कॉर्पिओ कार पोलिसांनी जप्त केली होती. कारण परवेज टाक आणि त्याचा साथीदार शकील वाणी हे पळून जम्मू काश्मीरमध्ये एका हॉटेलात राहण्यासाठी गेले होते. परवेज हा इस्टेट एजंटचे काम करत होता. त्याच्यावर जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड पोलिसात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल आहेत. हॉटेलमधील लोकांना संशय आल्यानं त्यांनी पोलिसांना कळवलं होतं आणि पोलिसांनी जम्मू काश्मीरमधील फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली होती. दरम्यान हॉटेलबाहेरील स्कॉर्पिओ कार देखील जप्त केली. त्याची माहिती काढली असता ती सेलिना यांच्यावर मुंबईतील असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याचप्रमाणं लैला खान आणि तिच्या कुटुंबियांसोबत शेवटपर्यंत परवेज टाकला पाहणारे साक्षीदार देखील पोलिसांच्या हाती लागले आणि या गुन्ह्याचे कोडे सुटले. तसेच पोलिसांना परवेज टाक याचे मतदानाचे कार्ड देखील स्कॉर्पिओ कारमध्ये सापडले होते. या गुन्ह्याच्या तपासात महत्वाची भूमिका कक्ष ८ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे, पोलीस निरीक्षक ज्योत्स्ना रासम आणि पोलीस हवाल असलेल्या अंकुश साळवी यांनी बजावली होती. अंदाजे १७ हजार ४० पानांचे आरोपपत्र या गुन्ह्यात दाखल करण्यात आले असल्याची माहिती, दीपक फटांगरे यांनी दिलीय. तसेच त्यांनी सांगितलं की, या गुन्ह्याचा तपास आव्हानात्मक होता. पण गुन्हा दुर्मिळ असल्याचा कसब लावून तपास केला.

१ वर्ष पोलीस घेत होते लैलाचा शोध : लैला आणि कुटुंबीय बेपत्ता झाल्यावर तिच्या वडिलांनी बरेच महिने त्यांचा शोध घेतला. पण, काहीच पत्ता लागत नसल्यामुळं नासिर पटेल यांना परवेजवर (लैलाचे सावत्र वडील) संशय आला. त्यांनी ओशिवरा पोलिसांकडे लैलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. त्यांच्यासोबतच दिग्दर्शक राकेश सावंत यांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली होती. कारण, लैला त्यांच्या सिनेमात काम करणार होती. मात्र, ती बेपत्ता झाल्यामुळं त्यांच्या सिनेमाचं चित्रीकरण अर्ध्यावर रखडलं होतं. पोलिसांनी शोध घेत असताना २१ जून २०१२ मध्ये त्यांना परवेज विरोधात काही पुरावे सापडले आणि त्यांनी परवेजला अटक केली. यावेळी परवेजने केलेला खुलासा ऐकून सगळे जण थक्क झाले होते.

सावत्र वडिलांनीच केली लैलाची हत्या : परवेजने, लैला आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला. तसेच इगतपुरीच्या फार्महाऊसवर केअर टेकर म्हणून शकील वाणी याला परवेजनेच कट रचून कामाला ठेवले होते. त्याच्या मदतीने त्याने सगळ्यांचे मृतदेह फार्महाऊसमध्येच गाडले. परवेजने गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि लैलाच्या फार्महाऊसमधून ६ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. इगतपुरी येथील फार्म हाऊसच्या आवारात बॉलीवूड अभिनेत्री लैला खान, तिची आई सेलिना व चार भावंडांची हत्या झाली. ही घटना फेब्रुवारी २०११ मध्ये घडली होती. त्यानंतर पोलिसांनी ८ जुलै २०१२ रोजी परवेझला अटक केली, तेव्हापासून परवेज तुरुंगात आहे. याप्रकरणी सत्र न्यायालयाने आरोपी परवेझला दोषी ठरवलं आहे. सुनावणीला हजर राहण्यासाठी परवेजची पहिली पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा जम्मू काश्मीरहुन मुंबईत आला आहे.

हत्या का केली : ११ जुलै २०१२ रोजी गुन्हे शाखेचे मुंबई पोलिसांचे तेव्हाचे सहपोलीस आयुक्त हिमांशू राय यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपीच्या अटकेची माहिती दिली होती. त्यांच्या पथकाने जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे जाऊन परवेझ इक्बाल टाकला अटक केली होती. परवेजने चौकशीदरम्यान लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांच्या हत्येची कबुली दिली. परवेजला शेख नावाच्या व्यक्तीसोबत सेलिना आणि लैला खानसह इतर भावंडांना दुबईला पाठवायचे होते आणि तेथून वाम मार्गाने पैसा कमवण्याचा परवेजचा हेतू होता. मात्र, सेलिनाचा याला विरोध होता. म्हणून याच रागाने त्याने सेलिनासह सर्वच कुटुंबातील सदस्यांचा खून केला होता.

लैलाने या सिनेमांमध्ये केले होते काम : रेश्मा पटेल म्हणजेच लैला खानचा जन्म 1978 मध्ये झाला आणि तिने 2002 मध्ये कन्नड चित्रपट मेकअपमधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 2008 मध्ये लैलाने राजेश खन्नासोबत 'वफा ए डेडली' लव्हस्टोरी चित्रपटात काम केलं होतं. मात्र, हा चित्रपट चांगलाच फ्लॉप झाला. 2011 मध्ये अभिनेत्री लैला खानची हत्या झाली होती. लैला खानचा पाकिस्तानात जन्म झालेला नाही. मात्र, तिने एका पाकिस्तानी चित्रपटात काम केल्याची चर्चा आहे.

हेही वाचा -

  1. सुरेंद्र अग्रवाल यांचं अजून एक अंडरवर्ल्ड संबंध पुढे, तुला तर मारून टाकेल, अजून एकाला दिली होती धमकी - Surendra Agarwal
  2. 'ईव्हीएम'मध्ये घोटाळा केला तर बघाच, मुख्य निवडणूक आयुक्तांना माजी मंत्र्याची धमकी - Subodh Savji Threat
  3. राजकीय दबावामुळे मुलाला जामीन मिळाला, अन् प्रश्न...; सुप्रिया सुळेंचा नितेश राणेंवर पलटवार - Supriya Sule Criticized Nitesh Rane

Last Updated : May 24, 2024, 12:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.