ETV Bharat / state

आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधम 'स्केच'च्या आधारे जेरबंद - Minor Girl Sexual Abuse

Minor Girl Sexual Abuse : नागपूर शहरात आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं. घरी कुणी नसल्याचा गैरफायदा घेत नराधमानं चिमुकलीवर अत्याचार केला. 'स्केच'च्या आधारे या आरोपीचा शोध सुरू होता.

Minor Girl Sexual Abuse
'स्केच'च्या आधारे आरोपीला अटक (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2024, 4:00 PM IST

Updated : Sep 22, 2024, 3:09 PM IST

नागपूर Minor Girl Sexual Abuse : नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला स्केच'च्या आधारे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. घटनेच्या 6 दिवसानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. गणपत तानाजी जयपूरकर (56) असं या नराधमाचं नाव असून तो सुतारकाम करत असल्याचं निष्पन्न झालं.

आरोपीच्या स्केचच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी आरोपीचे स्केच प्रसिद्ध केल्यानंतर आरोपीनं ओळख लपविण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र अखेर तो पोलिसांच्या हाती लागला. पोलिस आयुक्त रवींद सिंघल यांनीही आरोपींची मानसिकता विकृत असल्याचं सांगितलं.

पोलिस आयुक्त रवींद सिंघल (Source - ETV Bharat Reporter)

असा घडला होता घटनाक्रम : आठ वर्षीय पीडित मुलगी तिच्या 4 वर्षांच्या बहिणीसह घरी होती. मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. दुचाकीवरून एक 40 वर्षीय इसम त्यांच्या घरी आला. घरी कोणी नसल्याचं लक्षात येताच त्यानं आठ वर्षीय मुलीला आतील खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. आरोपीनं पीडितेच्या चार वर्षांच्या बहिणीला शांत राहण्यासाठी 20 रुपये दिल्याचंही तपासात समोर आलंय.

घरी कुणी नसल्याचा घेतला गैरफायदा : पीडित मुलीचं कुटुंब तीन वर्षांपूर्वी कामा-धंद्याच्या शोधात नागपुरात राहायला आले. घटनेच्या दिवशी ते सकाळी कामावर गेले होते. त्यामुळं घरात आठ आणि पाच वर्षांच्या दोन मुली होत्या. दुपारी आरोपी त्यांच्या घरी आला. त्यानं मुलींना त्यांच्या पालकांबद्दल विचारलं. त्यावेळी मुलींनी घरी कोणी नसल्याचं सांगताच आरोपीनं घरात घुसून आठ वर्षीय मुलीवर बलात्कार केला.

पूजेसाठी पंडित शोधायला निघाला होता आरोपी : 15 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. त्यावेळी सर्वत्र गणेशोत्सवाची धूम होती. आरोपी गणपत जयपूरकर यांच्या घरी गणपतीची पूजा होती. त्यासाठी आरोपी पंडितचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडला होता. त्यावेळी आरोपीची नजर त्या दोन चिमुकलींवर गेली.

'स्केच'च्या आधारे आरोपी जेरबंद : घटनेनंतर मुलींचे आई-वडील घरी आले तेव्हा मुलींनी सर्व घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर पालकांनी पारडी पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली. आरोपी अनोळखी असल्यानं पोलिसांनी 'स्केच' तयार करून आरोपीचा शोध सुरू केला. गेल्या 6 दिवसांपासून पोलिसांचे चार पथके आरोपीचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस आरोपीपर्यंत पोहचले.

हेही वाचा

  1. इंजेक्शन देऊन बेशुद्ध अवस्थेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; 2 वर्षानंतर आरोपीला अटक - Minor Girl Sexual Abuse
  2. जमिनीत अचानक खड्डा पडून कोसळला ट्रक; पाहा सीसीटीव्ही, नेमकी भानगड काय? - Pune Truck Collapsed
  3. क्रिप्टोकरंन्सीचा नवा झोल; तपास यंत्रणा पोलीस संभ्रमात, सात जणांना अटक - Sambhaji Nagar Crime News

Last Updated : Sep 22, 2024, 3:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.