ETV Bharat / state

बलात्कार करुन 1984 मध्ये दाऊद झाला होता फरार; तब्बल 40 वर्षानंतर ठोकल्या बेड्या - Rape Accused Arrested - RAPE ACCUSED ARRESTED

Rape Accused Arrested : मुंबईत एका महिलेवर बलात्कार करून दाऊद 40 वर्षांपासून फरार होता; मात्र पोलिसांनी त्याला तांत्रिक पद्धतीने तपास करून आग्रा शहरातून अटक केली आहे. गुन्ह्या प्रकरणी त्याच्यावर खटलाही दाखल करण्यात आला होता. परंतु, तो न्यायालयात एकाही तारखेला हजर झाला नाही. अखेर पोलिसांनी तपास करून त्याला बेड्या ठोकल्या.

Rape Accused Arrested
आरोपीला अटक (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 6:10 PM IST

Updated : May 7, 2024, 6:36 PM IST

मुंबई Rape Accused Arrested : बलात्काराच्या आरोपात मागील ४० वर्षांपासून फरार आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाण्याकडून आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त मोहित कुमार गर्ग यांनी दिली आहे. अटक आरोपीचे नाव पापा उर्फ दाऊद बंदू खान असं आहे.

कोर्टाच्या सुनावनीला राहत होता अनुपस्थित : येथील डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात 1984 मध्ये आरोपी पापा विरोधात बलात्काराच्या गुन्ह्यात भारतीय दंड संविधान कलम 366 आणि 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 1985 मध्ये गुन्ह्याची सुनावणी सत्र न्यायाधीश, २९ वे न्यायालय, मुंबई यांच्या न्यायालयात सुरू करण्यात आली होती. बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी हा खटल्याच्या सुनावणीला न्यायालयात हजर राहत नव्हता. म्हणून सत्र न्यायाधीश यांनी या खटल्यातील मुख्य आरोपीस फरार घोषित केले होते. त्याच्या विरुध्द स्टॅंडिंग अजामीनपात्र वॉरन्ट जारी केले होते. पापा हा मागील ४० वर्षांपासून फरार होता व त्यामुळे नमूद खटला न्यायालयात प्रलंबित होता.

घर विकून उत्तर भारतात पळाला : निवडणूक आचार संहितेच्या काळामध्ये पोलीस उपायुक्त मोहितकुमार गर्ग यांनी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील जास्तीत जास्त फरार आरोपी यांचा शोध घेऊन अटक करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यास अनुसरून या गुन्ह्यातील फरार आरोपी पापा याचा फॉक्लंड रोड, आठवी क्रॉस गल्ली, पठ्ठे बापूराव रोड या मुंबईतील पत्त्यावर शोध घेतला असता तो मिळून आला नाही. अधिक माहिती घेत असता पोलीस पथकास पापा आरोपी हा त्याचे मुंबईतील राहते घर विकून कुटुंबासमवेत भारताच्या उत्तरेला कोठेतरी निघून गेल्याची माहिती प्राप्त झाली; परंतु आरोपी हा कोठे निघून गेला आहे, याबाबत कोणतीही खात्रीलायक माहिती प्राप्त झाली नाही.

आरोपीला आग्रा येथून अटक : पोलीस पथकातील पोलीस हवालदार राणे यांनी अविरत मेहनत करून आरोपीताच्या संपर्कातील व्यक्तीकडे चौकशी सुरू केली. त्यांना गुप्त बातमीदारांकडून आरोपीच्या ठावठिकाण्याबाबत विश्वसनीय माहिती प्राप्त झाली. त्यानंतर त्या माहितीचे पृथक्करण करून त्यामधून तांत्रिक तपास करून आरोपीचे सध्याचे राहण्याचे ठिकाणाबाबत माहिती मिळवली. त्यानंतर चाळीस वर्षांपासून फरार असलेला पापा हा आरोपी दिल्ली येथील आग्रा येथे असल्याबाबतची खात्री करण्यात आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संतोष कोयंडे आणि पथक आग्रा येथे रवाना झाले. आग्रा परिसरात आरोपीचे राहते ठिकानी गुप्त पाळत ठेवून तांत्रिक पद्धतीने आरोपीचे राहते ठिकाण निश्चित करण्यात आले.

तांत्रिक तपासामुळे आरोपी अडकला : त्यानंतर आरोपीस सापळा रचून शिताफीने ताब्यात घेण्यात आले आणि स्टॅंडिंग अजामीनपात्र वॉरंटवरून त्याला अटक करण्यात आली. त्याचा मुख्य न्यायिक मॅजिस्ट्रेट, आग्रा यांचाकडून ट्रान्झिट रिमांड प्राप्त करण्यात आला असून आज सत्र न्यायाधीश, ३४ वे न्यायालय यांच्या समक्ष हजर करण्यात येत आहे. आरोपी पापा उर्फ दाऊद बंदू खान याने पठ्ठे बापूराव रोड येथील रूम सुमारे 25 वर्षांपूर्वी विकली असून आरोपी हा कुटुंबासह निघून गेल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलीस हवालदार राणे यांनी गुप्त बातमीदारामार्फत तपास केला असता आणि आरोपी बाबत तांत्रिक तपास केला असता आरोपी आग्रा येथे असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली. यानंतर 40 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या असल्याची माहिती डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय घोरपडे यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. सत्तेसाठी भाजपा कोणतीही किंमत मोजण्यास तयार - सोनिया गांधी यांचा घणाघात - Lok Sabha Election 2024
  2. रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल; ईव्हीएम मशीनची केली होती पूजा - Lok Sabha Election 2024
  3. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील दिग्गज नेत्यांसह सेलिब्रिटींनी बजाविला मतदानाचा हक्क, पाहा संपूर्ण यादी - lok sabha election 2024

Last Updated : May 7, 2024, 6:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.