ETV Bharat / state

घाटकोपर होर्डिंग प्रकरण: फरार आरोपी जान्हवी मराठेसह आणखी एकास गोव्यातून अटक - Ghatkopar Hoarding Case

Ghatkopar Hoarding Case : मुंबईतील घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील फरार आरोपी जान्हवी मराठे हिला गोव्यातून आज (8 जून) गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकानं अटक केली आहे. जान्हवी मराठे उर्फ जान्हवी सोनाळकर हिच्यासोबत सागर पाटील याला देखील गोव्याहून मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर जान्हवी मराठे फरार झाली होती आणि तपास पथकाच्या रडारवर होती.

Ghatkopar Hoarding Case
अटक (ETV Bharat REporer)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 8, 2024, 10:59 PM IST

मुंबई Ghatkopar Hoarding Case : गुन्हे शाखेच्या रडारवर असलेली जान्हवी मराठे ही तिचा साथीदार सागर पाटीलसोबत गोव्यात हॉटेलमध्ये लपून बसली होती. मात्र, पोलीस तिचा माग काढतच होते. पोलिसांची चाहूल लागताच मराठे हॉटेल वारंवार बदलत होती. अखेर आज जान्हवी मराठे पोलिसांच्या जाळ्यात आपल्या साथीदारासोबत अडकली. पोलिसांचे पथक या दोन्ही आरोपींना गोव्याहून मुंबईत घेऊन येत असून उद्या कोर्टात दोघांना हजर केले जाणार आहे.

सागरला दिले होते बांधकामाचे कंत्राट : घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील जान्हवी मराठे ही तिसरी आणि सागर पाटील हा चौथा आरोपी आहे. याआधी मुख्य आरोपी भावेश भिंडे याला अटक करण्यात आली होती. नंतर पालिकेचा अभियंता मनोज संघू याला अटक करण्यात आली. हे दोघे देखील न्यायालयीन कोठडीत आहेत. जान्हवी मराठे इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडची संचालिका असताना घाटकोपर होर्डिंगबाबत सर्व कागदपत्र तयार करून परवानगी मिळवण्यात आली होती. त्यानंतर मराठे हिच्या सांगण्यावरून होर्डिंगच्या बांधकामाचे कंत्राट सागर पाटील याला देण्यात आले होते.

मराठेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची माजी संचालिका जान्हवी मराठेचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर तिला अटक करण्यात आहे. तसेच महापालिकेचे अधिकारी आणि जीआरपीच्या लिपिकांना चौकशीला बोलावणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी दिली होती. तसेच जीआरपीचे एसीपी शहाजी निकम यांची देखील दोन दिवस चौकशी करण्यात आली आहे.

नियमबाह्य परवानगी भोवली : जान्हवी मराठे ही इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन झाल्यापासून डिसेंबर २०२३ पर्यंत कंपनीच्या संचालक पदावर काम करत होती. मराठे संचालिका असताना घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त झालेल होर्डिंगसाठी परवानगी मागून ते होर्डिंग बांधण्यात आले होते. तसेच आरोपी मनोज रामकृष्ण संघू (वय ४७) हा मूळचा केरळचा असून त्याने बीई सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. संघूचा जन्म मुंबईत झाला असून तो मुंबईतच वाढला आहे. मात्र, इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला होर्डिंगसाठी स्ट्रक्चर स्टॅबिलिटी सर्टिफिकेट देऊन नियमबाह्य परवानगी दिल्याने मनोज संघू याला काल मुलुंडमधून अटक करण्यात आली होती.

अभियंता एसआयटीच्या रडारवर : मुंबई महानगर पालिकेच्या एन वार्डमधील तत्कालीन अभियंता सुनील दळवी हा गुन्हे शाखेच्या एसआयटीच्या रडारवर आला आहे. दळवी याने घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त होर्डिंगबाबत बेयकादेशीर असल्याची नोटीस जीआरपीला दिली होती. त्यानंतर त्याने ही नोटीस मागे घेतली. तो सतत भावेश भिंडेच्या संपर्कात होता असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) गेल्या सोमवारी त्याची कसून चौकशी करत जबाब नोंदविला होता.

हेही वाचा :

  1. देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाबाबत भाजपाचा ठराव, परंतु फडणवीसांचा निर्णय अजूनही गुलदस्त्यातच - Devendra Fadnavsi Resign Issue
  2. मोदी 3.0 मध्ये राज्यातील कोणत्या खासदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी, वाचा संभाव्य यादी - Cabinate Ministers
  3. धक्कादायक! अल्पवयीन मुलीचं अपहरण करून पाजली बियर अन् केला बलात्कार - Minor Girl Rape Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.