ठाणे Married Woman Suicide : कल्याण पूर्वेतील आडिवली-ढोकळी येथे राहणाऱ्या जागृती बारी यांनी आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. तुझे ओठ काळे आहेत, तोंडाला घाणेरडा वास येतो, असं पतीसह तिला सासू-सासरे टोमणे मारत होते. त्यामुळं लग्नाच्या दोन महिन्यांनंतर जागृतीनं जीवनयात्रा संपवलीय. विशेष म्हणजे मृत्यूपूर्वी 24 वर्षीय जागृतीनं तिच्या मोबाईलवर एक चिठ्ठी लिहून सासू, पतीला जबाबदार धरलंय. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सागर रामलाल बारी असं अटक केलेल्या पतीचं नाव आहे. शोभा रामलाल बारी असं अटक करण्यात आलेल्या सासूचं नाव आहे.
10 लाख रुपये देण्याची मागणी : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे गजानन भिका वराडे यांनी आपली मुलगी जागृतीचा विवाह जळगावमधील पिंप्राळामधील सागर रामलाल बारीसोबत दोन महिन्यांपूर्वी लावून दिला. लग्नात सागरला 14 ग्रॅमची सोन्याची चेन, 6 ग्रॅमची सोन्याची अंगठी देण्यात आल्याची माहिती मृतकाच्या वडिलांनी दिली. दुसरीकडं सागर मुंबई पोलीसत नोकरीला आहे. विवाहानंतर 21 जूनला कल्याणमधील आडीवली ढोकळी या परिसरामध्ये पतीसह राहायला जाणार असल्यानं तिचं आई-वडील पिंप्राळा गावात भेटायला गेले होते. मृत जागृतीचे आई-वडील भेटायला आले, तेव्हा तिची सासू शोभा रामलाल बारी हिनं हुंडा दिला नाही, अशी तक्रार केली हाती. तसंच मुंबईत घर घेण्यासाठी 10 लाख रुपये द्या, अशी मागणी केल्याचा आरोप वराडे कुटुंबानं केला आहे.
पतीसह सासूविरोधात गुन्हा दाखल : सध्या शेतीमध्ये पैसा गुंतलेला आहे, त्यामुळं पैसे नाहीत. मी तुम्हाला थोडीफार रक्कम देईन, असं आम्ही सांगितलं. त्यानंतर मुलगी मुंबईमध्ये राहायला गेली. असं वराडं कुटुंबानं प्रसारमाध्यांना माहिती दिली. यानंतर मात्र 5 जुलैला जागृतीचा पती सागरनं तिचा भाऊ विशालला फोन केला. तुझ्या बहिणीनं घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला गळफास घेतला. असं विशाला सांगितलं. या घटनेमुळं जागृतीचे आई-वडील, काही नातेवाईक कल्याणमध्ये आले. यानंतर मृत जागृतीच्या आईनं पोलिसांकडं तक्रार केली. घर घेण्यासाठी 10 लाखांचा हुंडा मागणं, शारिरिक, मानसिक छळ करत असल्याचा गुन्हा पती सागर बारी, सासू शोभा बारी यांच्यावर दाखल करण्यात आला.
तुझे ओठ काळे आहेत : जागृतीच्या आईनं तिच्यासोबत शेवटी काय बोलणं झालं हे सांगितलंय. ‘आई माझी सासू मला तु काळी आहेस, तुझे ओठ काळे आहेत. तोंडाचा घाण वास येतो, असं हिणवते. तू माझ्या मुलाला पसंत नाही. घरातून निघून जा, नाहीतर आईकडून घर घेण्यसाठी 10 लाख रुपये घेऊन ये, असं म्हणत माझा शारिरिक, मानसिक छळ करते, तू त्यांच्याशी बोलून घे’, असं जागृतीनं आपल्या आईला फोनद्वारे सांगितलं.जागृतीचा पती मुंबई पोलिसांमध्ये कार्यरत आहे. सागर आईसोबत कल्याणमधील आडीवली ढोकळी भागात एकविरा आई अपार्टमेंटमध्ये राहत आहे.
सुसाईट नोट सापडली : डोंबिवलीमध्ये आल्यानंतर अवघ्या 13 दिवसांमध्येच जागृतीनं 5 जुलैला टोकाचं पाऊल उचललं. त्याआधी तिनं मोबाईलमध्ये सुसाईट नोट लिहिली. मात्र मोबाईल लॉक असल्यामुळं भाऊ सागरला लॉक ओपन करता आला नाही. यानंतर पोलिसांनी जागृतीचा मोबाईल ताब्यात घेतला. जागृतीच्या बहिणीनं लॉक पॅटर्न सांगितल्यानंतर पोलिसांना नोट सापडली. त्या सुसाईट नोटच्या आधारे मानपाडा पोलिसांनी जागृतीचा पती, सासूवर गुन्हा दाखल केला. घटनेच्या दिवशी सासू गहू घेण्यासाठी बाहेर गेली. तेव्हा तिनं बाहेरून घराला कुलूप लावलं. यानंतर जागृतीनं आत्महत्या केली.
'हे' वाचलंत का :
- पती फिरायला नेत नाही; पत्नीनं साडेचार महिन्याच्या मुलीसह उचललं टोकाचं पाऊल - Palghar Crime News
- पत्नीला कर्करोग, डोक्यावर कर्जाचा डोंगर, उपचारात पैसे संपले; अखेर पत्नीला मारून पतीनं केली आत्महत्या, मुलगी थोडक्यात वाचली - Husband Wife Suicide Case
- मुख्यमंत्र्यांच्या आशेवर आम्ही जगतो; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी पालखीत व्यक्त केल्या भावना - Ashadhi Wari