ETV Bharat / state

मुलीनं मित्राच्या मदतीनं जन्मदात्या आईचा केला खून; कारण जाणून बसेल धक्का - Mother killed by daughter - MOTHER KILLED BY DAUGHTER

Mother Killed by Daughter : माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुण्यातून समोर आलीय. पोटच्या मुलीनं आपल्या मित्राच्या मदतीनं जन्मदात्या आईचा खून केल्याची ही घटना पुण्यातील वडगाव शेरीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत या मुलीसह तिच्या मित्रालाही अटक केलीय.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 9, 2024, 7:26 PM IST

पुणे Mother Killed by Daughter : पुणे शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून धक्कादायक घटना घडत आहेत. विविध गुन्ह्यांसह खुनाच्या घटनाही पुण्यात वाढल्या आहेत. पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगाव शेरीत धक्कादायक घटना घडली आहे. 18 वर्षीय मुलीनं मित्राच्या मदतीनं स्वतःच्या आईच्याच डोक्यात हातोड्याचे घाव घालून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला.

गुन्हा दाखल : खून केल्यानंतर आई घरातील मोरीत घसरून पडल्याचा बनावही या मुलीनं केला होता. मात्र, पोलिसांच्या तपासात सत्य समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या मुलीसह मित्राला अटक केली आहे. मंगल संजय गोखले (वय ४५, राजश्री कॉलनी वडगाव शेरी) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेची मुलगी योशिता संजय गोखले (वय १८) आणि तिचा मित्र यश मिलिंद शितोळे (वय १८, गणेश नगर वडगाव शेरी) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. विनोद शाहू गाडे (वय ४२) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

मुलीनेच मित्राच्या मदतीनं आईचा केला खून : याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योशिता ही मयत मंगल गोखले यांची मुलगी आहे. मुलीनं आपल्या मित्राच्या मदतीनं आईच्या बँक खात्यातून पैसे काढले होते. हे काढलेले पैसे जर आईला समजले तर ती रागावेल अशी भीती आरोपी मुलगी योशिता हिला वाटत होती. यातून तिने आईचा खून करण्याचा कट रचला आणि तिने मित्राला घरी बोलावलं. घरातील हातोडा त्याला दिला आणि झोपलेल्या आईच्या डोक्यात हातोड्याची घाव घालून खून करण्यात आला. खून केल्यानंतर या दोघांनी आई घरातील मोरीत पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झाल्याचा बनाव केला. मात्र, नातेवाईकांना शंका आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता, मुलीनेच मित्राच्या मदतीने आईचा खून केल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा :

1 सावित्रीबाई फुले विद्यापीठात मुलाला मारहाण : चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Student Beaten In Pune University

2 'त्या' प्रश्नावरून नवनीत राणा म्हणाल्या, " नवरा बायकोमध्ये भांडण लावू नका" - lok Sabha election 2024

3 कर्ज काढून घेतली दुचाकी ; फायनान्स कंपनी कर्मचाऱ्यांच्या मारहाणीतून सुटला अन् तलावात पडून तरुणानं गमावला जीव - Youth Died In Pond

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.