ETV Bharat / state

शिर्डीच्या साईबाबांची श्रीमंती अपार; आणखी एक सुवर्ण मुकुट अर्पण - Shirdi Saibaba Donation - SHIRDI SAIBABA DONATION

Shirdi Saibaba Donation : 'श्रद्धा आणि सबुरी'चा संदेश देणाऱया साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातील करोडो भाविक शिर्डीत येतात. कोणी पैसे तर कोणी सोनं, चांदी किंवा हिरे हे साईबाबांच्या चरणी अर्पण करत असतात. त्यामुळं साई मंदिर हे देशातील श्रीमंत मंदिराच्या रांगेत अग्रेसर आहे. अशाच एका साई भक्तानं सुवर्ण मुकुट साईबाबांना अर्पण केलाय.

Shirdi Saibaba crown Donation
साईबाबांना सुवर्ण मुकुट अर्पण (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2024, 5:36 PM IST

Updated : Sep 26, 2024, 6:28 PM IST

शिर्डी Shirdi Saibaba Donation : तेलंगाणा राज्यातील सी. एच. भाग्‍यलक्ष्‍मी या महिला साईभक्तानं गुरुवारी (26 सप्टेंबर) साईबाबांच्या चरणी तब्बल 17 लाख 73 हजार 750 रुपयांचा सुवर्ण मुकुट अर्पण (Gold Crown Donation) केलाय. गेल्या चार दिवसांपूर्वीच एका भक्तानं 13 लाखांचा सुवर्ण मुकुट संस्थानला दान दिला होता.

सुवर्ण मुकुट अर्पण : साईबाबांवर देश, विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. मागील चार दिवसांपूर्वी एका भाविकानं आपलं नाव आणि गाव न सांगता साईबाबा संस्थानला गुप्तदान म्हणून 110 ग्रॅम वजनाचा 12 लाख 70 हजार रुपये किमत असलेला सुवर्ण हिरेजडीत मुकुट अर्पण केला होता.

साईबाबांना सुवर्ण मुकुट अर्पण (ETV Bharat)

आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट : तेलंगाणा राज्यातील सी. एच. भाग्‍यलक्ष्‍मी या साई भक्त महिलेनं आपल्या परिवाराबरोबर शिर्डीत येत साईबाबांच्या चरणी 258 ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला. याची किंमत 17 लाख 73 हजार 750 रुपये आहे. हा सुंदर मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण केला असल्‍याची माहिती साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

Shirdi Saibaba Donation

साईबाबांना घातला मुकुट : भाविकानं हा सुवर्ण मुकुट साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍याकडं सुपुर्द केलाय. त्यानंतर भाविकाच्या इच्छेनुसार साईबाबांना हा सुवर्ण मुकुट घालण्यात आला. यावेळी साईबाबा संस्‍थानच्‍या वतीनं संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साई भक्ताचा शाल व साईबाबांची मूर्ती देवून सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते.

Shirdi Saibaba Donation
साईभक्तांचा सत्कार करताना संस्थानचे पदाधिकारी (ETV Bharat)

हेही वाचा -

  1. साईचरणी तब्बल 'इतक्या' लाखांचा सुवर्ण हिरेजडीत मुकुट अर्पण; पाहा व्हिडिओ - Shirdi Sai Baba Crown Gift
  2. साईबाबा संस्थानमधील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! गनिमी काव्यानं सरकारनं घेतला 'हा' निर्णय - Sai Baba Sansthan Shirdi
  3. साई दरबारात गाजलं तामिळनाडूतील प्रसिद्ध कुम्मी नृत्य ; भाविकांसह ग्रामस्थांनी दिली मनमुराद दाद - Kummi Folk Dance In Shirdi Temple

Last Updated : Sep 26, 2024, 6:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.