ETV Bharat / state

बीडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटची 5 हजार 765 कोटींची मालमत्ता जप्त - Dnyanradha Multistate Bank

Dnyanradha Multistate Bank : कुटे ग्रुपच्या मालकीची असलेली ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्था सध्या चर्चेचा विषय बनली आहे. बीडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटची 5 हजार 765 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

Dnyanradha Multistate Patsanstha
ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखा (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 10, 2024, 1:48 PM IST

बीड Dnyanradha Multistate Bank : बीडची ज्ञानराधा मल्टीस्टेट ही राज्यात एकूण 52 शाखा असलेली मोठी मल्टीस्टेट पतसंस्था म्हणून ओळखली जात होती. त्यातच कुठे ग्रुप हा देखील सामील होता. अर्चना कुठे जरी त्याच्या अध्यक्ष असल्या तरी आर्थिक व्यवहार मात्र ज्ञानराधा मल्टीस्टेट मधूनच होतो.

इतक्या रुपयांची मालमत्ता जप्त : बीडच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने सुरेश कुटे आणि त्याचा भाचा संचालक आशिष पाटोदकर यांच्या फास आणखी आवळला आहे. सुरेश कुटे, अर्चना कुटे आणि आशिष पाटोदकर यांची आतापर्यंत 5 हजार 765 कोटी 24 लाख 20 हजार रुपयांची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे. या मालमत्तेची विक्री करून त्यातून ठेवीदारांचे पैसे द्यावेत यासाठी एमपीआयडी कायद्यानुसार प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू आहे.

कोणत्या ठिकाणी झाली कार्यवाही : आर्थिक गुन्हे शाखा एमपीआयडी म्हणजेच ठेवीदार हित संरक्षण कायद्यानुसार, मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांचे पैसे देण्याबाबत प्रस्ताव शासनाला पाठवणार आहे. या प्रस्तावाचं काम सुरू आहे. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नेमून मालमत्तांचा लिलाव होत असतो. बीड येथील कुटे ग्रुपवर नोव्हेंबर 2023 मध्ये प्राप्तीकर विभागाने छापेमारी केली होती. त्यानंतर कुटे ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे अध्यक्ष असलेल्या ज्ञानराधा मल्टिस्टेट पतसंस्थेत ठेवी मागण्यासाठी ठेवीदारांची मोठी गर्दी झाली आणि पतसंस्था आर्थिक अडचणीत आली. या प्रकरणी जिल्ह्यात 41 गुन्हे नोंद आहेत.

जप्तीची प्रक्रिया सुरू: पोलिसांच्या माहितीनुसार, पतसंस्थेत ठेवीदार आणि बचत खातेदारांचे एकूण 3 हजार 715 कोटी 58 लाख 72 हजार 633 रुपये अडकले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने दोघांच्या एकूण 5 हजार 765 कोटी 24 लाख 20 हजारांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. आणखी काही मालमत्ता असून त्यांच्या जप्तीची प्रक्रिया सुरू आहे.

सुरेश कुटेंची मालमत्ता जप्त : सुरेश आणि अर्चना कुटे यांच्या मालकीच्या 238 मालमत्ता आहेत. पोलिसांनी निंबोरे (जि.सातारा) शिवारात 65 एकर जागेवरील कुटे सन्स डेअरीज ही मिल्क प्रॉडक्ट कंपनी. येथील इमारती, यंत्रसामग्री आणि शेजारी असलेला पेट्रोल पंप अशी 4200 कोटींची मालमत्ता जप्त केली.

आशिष पाटोदकर यांची मालमत्ता जप्त : आशिष पाटोदकर याची चिंचोली (जि. सोलापूर) एमआयडीसीत तिरुपती ॲग्रो प्रॉडक्ट नावाची कंपनी आहे. येथील त्याच्या 3 वेगवेगळ्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यातील एक 185 कोटींची मालमत्ता, दुसरी 35 एकर जागेतील 975 कोटींची व तिसरी 305 कोटींची मालमत्ता आहे. त्यामुळं आता राज्यात सुरेश कुठे, आशिष पाटोदकर आणि अर्चना कुटे यांच्या मालमत्ता या विक्री करून सर्वसामान्यांचे पैसे मिळणार का हा प्रश्न आता ऐरणीवर आहे.

हेही वाचा -

  1. नांदेडमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई; 170 कोटींचं घबाड जप्त - Income Tax Department Raid
  2. ललित टेकचंदानीला ईडीचा दणका, ११३.५ कोटींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश - Lalit Tekchandani
  3. कर्नाटकात लोकायुक्त अधिकार्‍यांचे 63 हून अधिक ठिकाणी छापे, कोट्यवधींची मालमत्ता जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.