ETV Bharat / state

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गर्दी वाढली; विमानांच्या उड्डाण संख्येत होणार 'इतकी' कपात - मुंबई विमानतळ

Mumbai International Airport : देशातील दुसऱ्या क्रमांकाचं व्यग्र विमानतळ अशी ओळख असलेल्या मुंबई विमानतळावरील किमान 40 विमान सेवा रद्द होणार आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणानं 13 फेब्रुवारी रोजी हा आदेश जारी केला आहे.

Mumbai International Airport
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 14, 2024, 11:07 AM IST

Updated : Feb 14, 2024, 11:26 AM IST

मुंबई Mumbai International Airport : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उड्डाण संख्या कमी करण्याचे आदेश केंद्रीय प्राधिकरणानं मुंबई विमानतळ प्राधिकरणाला दिले आहेत. त्यामुळं आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दिवसाला 40 विमानांचं उड्डाण कमी होणार आहे. नियोजित वेळापत्रकाचं पालन करण्यासाठी सहाय्यभूत ठरावं, या उद्देशानं 13 फेब्रुवारी रोजी हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

40 विमानांची उड्डाणं होणार कमी : देशातील अत्यंत गजबज असलेलं मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. या विमानतळावर एकूण उड्डाणांची संख्या कमी करावी, असं भारतीय विमानतळ प्राधिकरणानं म्हटलं आहे. यामुळं आता दिवसाला 40 विमानांची उड्डाणं कमी होणार आहेत. एकूणच विमानतळावरील प्रचंड गर्दी आणि गजबज कमी करावी. तसेच वक्तशीरपणा आणि व्यवस्थापन नेमकं करता यावं, यासाठी हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

नियोजन करण्यास अडथळा : भारतीय विमानतळ प्राधिकरणानं म्हटलं आहे की, मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पिक अवर्समध्ये विमानांची हालचाल पूर्वी 46 होत होती. आता ती कमी करुन 44 करावी आणि नॉन पिक अवर्समध्ये 44 उड्डाण संख्या होती, ती 42 पर्यंत कमी करावी. यामुळं एअरलाइन्स उड्डाण आठवड्यातून 40 इतक्या संख्येनं कमी होणार आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणानं हे आदेश देत असताना जारी केलेल्या आदेशपत्रात म्हटलं की, "एकूणच आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रचंड गर्दी होते. त्यामुळं नियोजन करण्यास अडथळा येतोय. व्यवस्थित नियोजन करण्यासाठी विमानतळावरील नियोजित उड्डाण संख्या कमी करणं आवश्यक आहे. त्यामुळंच पीक अवर्समधील विमान उड्डाणांची कपात सूचवली आहे."

जेट ऑपरेशन कर्फ्यू चार तासावरुन आठ तासावर : भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून बिझनेस जेट ऑपरेशन कर्फ्यू हा पूर्वी चार तास होता, तो आठ तासापर्यंत वाढवलेला आहे. परंतु भारतीय विमानतळ प्राधिकरणानं दिलेल्या या निर्देशामुळं रिलायन्स इंडस्ट्रीज डब्ल्यू आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कॉर्पोरेट संस्थांकडून निषेध नोंदवण्यात आला आहे.

कोणत्या एअरलाइन्स कंपन्यांचे किती उड्डाण : 'विस्तारा'ची उड्डाणसंख्या 58 वरुन 61 वर गेलीय. 'आकासा एअर' 67 वरुन 60 वर आलेत. 'एअर इंडिया'ची उड्डाणं 53 वरुन 46 वर आली. 'इंडिगो'ची 53 वरुन 44 उड्डाणं झालीयत. तर 'स्पाइस जेट' कंपनीची उड्डाणं 32 वरुन 25 झाली.

हेही वाचा -

  1. Mumbai International Airport : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ १७ ऑक्टोबरला ६ तास देखभाल दुरुस्तीसाठी बंद
  2. Mumbai Bomb Blast Threat : मुंबईत विमानतळावर बॉम्बस्फोट होणार, पोलीस अधिकाऱ्याचा फोन?
  3. Mumbai Airport : विमानतळावर एका व्यक्तीच्या बॅगेत 28 कोटी किंमतीचे 281 किलो कोकेन जप्त,एका भारतीय प्रवाशाला अटक

Last Updated : Feb 14, 2024, 11:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.