ETV Bharat / state

३२७ कोटीचं एमडी ड्रग्ज जप्त, मुख्य सूत्रधार सलीम डोळाचं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कनेक्शन उघड - 327 crores MD drug seized

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 3, 2024, 6:41 PM IST

Updated : Jul 3, 2024, 8:10 PM IST

327 crores MD drug seized : ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर गुन्हे शाखा एकने एमडी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला काल (3 जुलै) अटक केली आहे. यात 15 जणांचा समावेश असून त्यांच्याकडून 327 कोटी 69 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. यासह काही शस्त्रांचाही समावेश आहे. जाणून घ्या सविस्तर बातमी.

Drug Seized In Mira Bhainder
पोलिसांनी जप्त केलेले ड्रग्ज (ETV Bharat Reporter)

ठाणे (मिरा भाईंदर) 327 crores MD drug seized : मीरा-भाईंदर गुन्हे शाखा एकने एमडी ड्रग्सची आंतरराज्यीय तस्करी करणारी टोळी गजाआड केली आहे. या टोळीकडून ३२७ कोटी ६९ लाख रुपयांचे एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईमध्ये महाराष्ट्रातून तीन, तेलंगाणामधून तीन, उत्तर प्रदेशमधून आठ आणि गुजरातमधून एक अशा एकूण १५ आरोपींना अटक केली आहे. त्यासोबतच तीन पिस्तुल, एक रिव्हॉल्हर आणि ३३ जिवंत काडतुसे देखील पोलिसांनी जप्त केली आहेत.

ड्रग्ज तस्करांविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईविषयी माहिती देताना पोलीस आयुक्त मधुकर पांडे (ETV Bharat Reporter)

सलीमचा संबंध दाऊद गॅंगशी : ही टोळी संपूर्ण देशभरात कार्यरत होती. यामधील पैशाची उलाढाल करणारा मुख्य आरोपी आणि ड्रग्ज तस्कर सलीम डोळा हा सध्या फरार असून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्याचा देखील शोध पोलीस घेत आहेत. या एमडी ड्रग्ज तस्करीमध्ये सलीम डोळा हा प्रमुख असून त्याला काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. देशभरात सलीम डोळा विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. डोळा हा सर्व कारभार दुबईमधून चालवत असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.

तेलंगाणातून दोघांना अटक : लोकसभा निवडणुकीच्या काळात मिरा भाईंदर गुन्हे शाखा एकच्या टीमने नाकाबंदी केली होती. यावेळी १५ मे रोजी काशीमिरा भागातून शोएब मेमन आणि निकोलेस हे दोघे एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी आले होते. या दोघांना ताब्यात घेतलं असता त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले गेले. या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ड्रग्ज तेलंगाणामधून आणलं असं समजताच पोलिसांचं एक पथक तेलंगाणा येथे रवाना झालं. तेलंगाणामधील विकाराबाद जिल्ह्यामधून नासिर उर्फ बाबा शेख आणि दयानंद उर्फ दया माणिक यांना ताब्यात घेत २५ कोटी किंमतीचे एमडी ड्रग्स आणि कारखाना जप्त केला. यामध्ये मोठी टोळी असल्याचं निष्पन्न झालं.

३२७ कोटीचं ड्रग्ज जप्त : गुन्हे शाखेच्या टीमनं सखोल तपास करत महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, हैदराबाद मधून एकूण १५ जणांना ताब्यात घेत ३२७ करोड ६९ लाख रुपयांचं एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्ज जप्त केलं आहे. यांचा मुख्य सूत्रधार सलीम डोळा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित असून पोलीस त्यांचा तपास करत आहे. यामध्ये अधिक पाच ते सहा आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा :

  1. 10 वर्ष झाली अजून 20 बाकी ; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, विरोधी पक्षनेत्यांचा 'वॉकआऊट' - PM Modi Slams Opposition
  2. नवाब भाई आहेत कुठं...? अजित पवारांच्या 'देवगिरी'वर काय घडलं? - Nawab Malik
  3. हाथरस चेंगराचेंगरीनंतर 'भोलेबाबा' फरार : आत्तापर्यंत 116 भक्तांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश - Hathras stampede

Last Updated : Jul 3, 2024, 8:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.