ETV Bharat / state

5 वर्षीय चिमुरडीवर 75 वर्षीय नराधमाचा अत्याचार; दोषीला 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा - Thane rape case verdict

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 27, 2024, 5:02 PM IST

Thane rape case verdict : 5 वर्षीय चिमुकलीला टीव्ही पाहण्याच्या बहाण्यानं घरात नेऊन तिच्यावर 75 वर्षीय आरोपीनं अत्याचार केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात 9 नोव्हेंबर, 2021 रोजी घडली होती. या प्रकरणी भिवंडी जिल्हा सत्र न्यायालयाच्या विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश एन. के. कारंडे यांनी आरोपी नराधमाला दोषी ठरवून अंतिम सुनावणीत 3 वर्षांचा कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मौनुद्दीन अजिजुल्ला अन्सारी असं शिक्षा सुनावलेल्या नराधमाचं नाव आहे.

Child Raping Case Bhiwandi
न्यायालय भिवंडी (File Photo)

ठाणे Thane rape case verdict : शेजारी राहणाऱ्या एका 5 वर्षीय चिमुरडीवर 75 वर्षीय नराधमाने टीव्ही पाहण्याच्या बहाण्यानं आपल्या घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना भिवंडी शहरातल्या किडवाई नगर भागात घडली होती. या प्रकरणी भिवंडी जिल्हा सत्र न्यायालयाच्या विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश एन. के. कारंडे यांनी दोषी नराधमाला अंतिम सुनावणीत 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मौनुद्दीन अजिजुल्ला अन्सारी असं शिक्षा सुनावलेल्या नराधमाचं नाव आहे.

चिमुकलीची आईकडे धाव : मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडित चिमुरडी आई-वडिलांसह भिवंडी शहरातील एका परिसरात भागात राहात आहे. तर नराधम मौनुद्दीन हाही त्याच परिसरात राहणारा आहे. त्यातच 9 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास पीडित चिमुरडी घराबाहेर खेळत होती. त्यानंतर आरोपीनं तिला टीव्ही पाहण्याच्या बहाण्यानं सोबत नेलं. त्यावेळी नराधमाच्या घरात कोणी नव्हतं. याचा फायदा घेत त्यानं पीडित चिमुरडीवर अत्याचार केला. नराधमानं केलेल्या अत्याचाराचा त्रास पीडितेला असह्य झाल्यानं तिने आईकडे धाव घेऊन तिच्यावर घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईनं तिच्यासह शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिच्यावर गुजरलेला प्रसंग सांगितला. यानंतर पोलिसांनी नराधमाविरुद्ध अत्याचारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत 10 नोव्हेंबर 2021 रोजी अटक केली होती.

3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा : आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्यावर विशेष पोक्सो न्यायालयात दोषारोस पत्र दाखल करुन शिक्षेसाठी सुनावणी साडेतीन वर्ष सुरू होती. या दाव्याच्या सुनावणीत पीडित फिर्यादी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. विजय मुंडे यांनी बाजू मांडत न्यायालयाला सांगितलं की, 75 वर्षीय आरोपी आणि 5 वर्षीय पीडित शेजारी राहणारे आहेत. तसंच घटनेच्या दिवशी घडलेल्या प्रसंगाचे पुरावे आणि न्यायालयात खटला सिद्ध करण्यासाठी फिर्यादी पक्षाचे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. विशेष पोक्सो न्यायालयाने साक्षी पुरावे ग्राह्य धरून आरोपी मौनुद्दीन याला गुरुवारी (25 जुलै) अंतिम सुनावणीत 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली, असल्याची माहितीही विशेष सरकारी वकील ॲड. विजय मुंडे यांनी दिली. तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन सूर्यवंशी यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता.

हेही वाचा :

  1. नववीत शिकणाऱ्या मुलीला लॉजवर नेऊन अत्याचार, पीडितेच्या कुटुंबीयांना आरोपीकडून धमक्या - Minor Girl Rape Case Beed
  2. डायघर बलात्कार प्रकरणी पीडितेच्या सासर विरोधात गुन्हा दाखल - Ganesh Ghol temple rape case
  3. चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून खून, शेजारी राहणाऱ्या नराधमाला अटक - Bhiwandi Rape News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.