ETV Bharat / state

गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट: आई मुलीसह मुलाचा करुण अंत; ऐन दिवाळीत कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर - GAS CYLINDER BLAST AT NEW MUMBAI

किराणा दुकानातील दोन लहान गँस सिलेंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. या दुकानात पेट्रोल, डिझेल विकण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Gas Cylinder Blast At New Mumbai
गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2024, 7:27 AM IST

Updated : Oct 31, 2024, 8:16 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबई परिसरातील उलवेच्या जावळे गावात बुधवारी दिवाळीच्या पूर्व संध्येला गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये आई मुलगा आणि मुलगी अशा एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत एक व्यक्ती गंभीर भाजल्यामुळे जखमी झाला. त्याला जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.

गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात तीन ठार : दिवाळीच्या पूर्वसंध्येला दुर्घटना घडल्यानं नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. उलवे येथील जावळे गावात एका किराणा दुकानात 5 किलोच्या 2 सिलेंडरचा स्फोट झाल्यानं एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. एकीकडं नवी मुंबई शहर आणि परिसरात दिवाळीचा उत्साह सुरू आहे. दुसरीकडं सिलेंडरचा स्फोट झाल्यानं एकाच कुटुंबातील तिघांचा बळी गेला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला हृदयद्रावक घटना घडल्यानं नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

स्फोटाची तीव्रता भयंकर : उलवे येथील जावळे गावात किराणा दुकानात झालेल्या स्फोटाची तीव्रता भयानक होती. त्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकानं रुग्णालयात नेताना प्राण सोडला. मृत्यू झालेल्यांमध्ये आईसह दोन मुलांचा समावेश आहे. त्यात 38 वर्षीय महिला, एक 15 वर्षांची मुलगी असून एक 8 वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. या किरणा मालाच्या दुकानात छोटे सिलिंडर विक्रीसाठी ठेवले होते. या दुकानात छुप्या पद्धतीनं पेट्रोलचीही विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे. खबरदारीसाठी आजूबाजूची घरं आणि रस्ता प्रशासनामार्फत रिकामा करण्यात आला. या घटनेत तीन मृत्यूसह आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा :

  1. साताऱ्यात सर्व्हिसिंग सेंटरमध्ये कॉम्प्रेसरचा स्फोट; एक जण जागीच ठार, दोन गंभीर जखमी, पाहा व्हिडिओ - Satara Compressor explosion
  2. पिंपरी चिंचवडमध्ये स्वयंपाक करताना गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; 5 कामगार भाजले - Gas Cylinder Blast
  3. नागपुरातील विटांच्या कारखान्यात भीषण स्फोट; एका कामगाराचा मृत्यू तर नऊ जखमी - Nagpur Factory Blast

Last Updated : Oct 31, 2024, 8:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.