अहमदनगर (शिर्डी) Donations Shirdi Sai temple : साईबाबा संस्थानच्यावतीनं 16 एप्रिल ते 18 एप्रिल असा तीन दिवसीय श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात आलाय. या तीन दिवसात 2 लाखाहून अधिक भाविकांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलय. तसंच या उत्सव काळात साईबाबांना भाविकांनी केलेल्या दानाची आज साईबाबा संस्थानच्या वतीनं मोजणी करण्यात आलीय.
साईभक्तांचे सढळ हाताने दान : साईबाबा मंदिर परिसरातील देणगी काऊंटरवर 57 लाख 59 हजार 883 रुपये भाविकांनी रोख स्वरूपात दान दिलय. तसंच व्ही व्ही पासेसच्या माध्यमातून जनरल देणगी म्हणून 26 लाख 89 हजार 400 रुपये संस्थानला प्राप्त झालेत. साईबाबा मंदिरातील तसंच परिसरातील दक्षिणा पेटीत गुप्तदान 1 कोटी 42 लाख 79 हजार 209 रुपये भाविकांनी टाकलय. त्याच बरोबर जे भाविक शिर्डीत येऊ शकले नाहीत अशा भाविकांनी डेबीट, क्रेडीट कार्ड, ऑनलाईन, चेक, डीडी, मनिऑर्डरच्या माध्यमातून 1 कोटी 46 लाख 27 हजार 546 देणगी दिलीय. याचबरोबर 77.600 ग्रॅम वजनाचे तब्बल 4 लाख 91 हजार 715 रुपयांचे सोने आणि 1681 ग्रॅम वजनाची 98 हजार 54 रुपये किंमतीची चांदीही भाविकांनी साई चरणी अर्पण केलीय. तीन दिवसीय श्रीरामनवमी उत्सवात भाविकांनी एकूण 3 कोटी 79 लाख 35 हजार 715 रुपयांचं विविध माध्यमातून दान केलय.
बुंदीच्या लाडवाच्या प्रसादाला विशेष पसंती : शिर्डीत आलेले भाविक साई संस्थान मार्फत विक्री केल्या जाणाऱ्या शुध्द तुपातील बुंदी लाडुला पसंती देत असतो. उत्सव काळात एक नग असलेले तब्बल 4 लाख 43 हजार 149 लाडू पाकीटे भाविकांनी विकत घेतली. त्याची किंमत 45 लाख 31 हजार 390 रुपये इतकी आहे. याच बरोबरीने तीन लाडू असलेले 8332 पाकीटे भाविकांनी खरेदी केली. त्या विक्रीतून 2 लाख 8 हजार 300 रुपये मिळाले आहेत. तसंच साई मंदिरातून भक्त दर्शन करून बाहेर पडतो, त्यावेळी प्रत्येक भाविकाला बुंदीचे पाकीट प्रसाद म्हणून दिले जाते. उत्सवाच्या तीन दिवसात 1 लाख 66 हजार 400 पाकीटे भाविकांना दिली गेली आहेत.
साई संस्थानकडे कोटींचे दान जमा : शिर्डीचे साईबाबा ज्यांनी आपली संपूर्ण हयात फकिरी वेशात व्यतीत करून समाजात मानव कल्याणाची एक नवी मुहूर्तमेढ रोवली. 'सबका मालिक एक है' या मूळ मंत्राच्या आधारे सर्व जाती-धर्मांना एका छताखाली आणले. या साईंच्या नगरीत सर्वधर्मीय भक्तगण एकत्र येऊन बाबांना अब्जाधीश करताहेत. यंदाच्या रामनवमी उत्सवात साईंच्या दरबारी गरीबातील गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत आपल्या यथाशक्ती नुसार आपली श्रद्धा अर्पित करत असतो. भाविकांच्या मते बाबांना एका हाताने दिले तर बाबा हजारो हाताने भरभरून देतात.
फकिराची नगरी बनली कुबेराची नगरी : भाविकांकडून साईबाबा संस्थानला येणाऱ्या दानाचा विनियोग, साई संस्थान सेवेतील कर्मचारी, प्रशासन, मंदिर खर्च, भाविकांच्या सुविधा, हॉस्पिटल, अन्नदान, निवासस्थाने त्याचबरोबर शिर्डीच्या विकासावर खर्च करते. साईंचा महिमा आज जगभरात पोहोचल्याने कधी काळी फकिराची नगरी म्हणून ओळखली जाणारी शिर्डी आता कुबेराची नगरी म्हणून ओळखली जाऊ लागलीय.
हेही वाचा :
- आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचं देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं आश्वसन; उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ - Thackeray On Devendra
- 'राहुल गांधींना वायनाडमध्ये संकट वाटतंय, निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेसनं मानली हार'; नांदेडमधून मोदींची टीका - PM Narendra Modi Rally
- 'आमच्या आयुष्यातील दहा वर्षे का वाया घालवली', फडणवीसांना उत्तमराव जाणकर यांचा खडा सवाल, शरद पवारांना पाठिंबा जाहीर - Uttamrao Jankar support NCP