मुंबई Conversion Of Tribal : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज (1 मार्च) सूप वाजले. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. आदिवासींच्या सवलतीचा लाभ घेतल्यानंतरही 257 जणांनी धर्मांतर केलं. हा मुद्दा सभागृहात मांडण्यात आला. तर धर्मांतर केलेल्यांची चौकशी करण्यात येईल आणि यात काही गैर किंवा नियमबाह्य आढळलं तर त्यावर कारवाई करण्यात येईल, असं मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना सांगितलं.
धर्मांतर करूनही घेत होते लाभ : राज्यातील काही आदिवासी व्यक्तींनी आपल्या धर्माचा त्याग करून ईसाई, इस्लाम धर्म स्वीकारला. इतर धर्म स्वीकारूनसुध्दा हे आदिवासी, आदिवासी विकास विभागामार्फत मिळणारे सर्व लाभ तसंच आरक्षणसुध्दा घेत होते. याबाबत काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरामध्ये आदिवासी समाजाने मोर्चा काढला होता. अन्य धर्मात धर्मांतरीत होणाऱ्या व्यक्ती आणि समुदायाला अनुसूचित जमातीच्या सूचीतून आणि आरक्षणाच्या फायद्यातून काढून टाकण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. कौशल्य विभागातील आयटीआयमध्ये अशा प्रकारच्या अनेक बोगस आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचं निदर्शनास आलं. अशा बोगस आदिवासी विद्यार्थ्यांवर शासनाने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
समिती गठित : धर्मांतरित झालेल्या आदिवासींना सवलती मिळू नये आणि त्यांना त्यातून काढून टाकण्यात यावं ही मागणी झाल्यानंतर शासनाकडून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीनं सर्वेक्षण केल्यानंतर त्यांच्या निदर्शनास असं आलं की, 257 आदिवासी विद्यार्थिनी धर्मांतर करूनही आदिवासीमधून लाभ आणि त्यांना सुविधा घेत असण्याचं समजलं. यानंतर त्यांनी शासनाला एक अहवाल सादर केला. शासनाला दिलेल्या अहवालात विविध धर्मांमध्ये 257 प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी धर्मांतर केल्याची धक्कादायक बाब समोर आली.
कारवाई करणार : 257 जण धर्मांतर करून प्रशिक्षणार्थी विद्यार्थी म्हणून लाभ घेत होते. पण यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे. तसंच यामध्ये आणखी कोणाचा हात आहे किंवा आणखी कोण सहभागी आहे, याची देखील सखोल चौकशी करण्यात येईल असंही मंत्री लोढा यांनी म्हटलं आहे.
प्रशिक्षणार्थ्यांनी नोंदविलेला धर्म:
बुध्दिस्ट - ०४
मुस्लिम - ३७
ख्रिश्चन - ३
Not available - २२
इतर - १९०
सिख - ०१
एकूण - २५७
हेही वाचा: