ETV Bharat / state

राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा पैलवान देतोय मृत्यूशी झुंज, 'हे' आहे कारण... - Wrestler Accident Pune - WRESTLER ACCIDENT PUNE

Wrestler Accident Pune : रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातात एक 22 वर्षीय पैलवान गंभीर जखमी झाला. सध्या त्याची स्थिती गंभीर असून तो रुग्णालयात उपचार घेत आहे. विजय डोईफोडे असं त्याचं नाव आहे. वाचा सविस्तर वृत्त...

Wrestler Accident Pune
पैलवान विजय डोईफोडे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 10, 2024, 7:53 PM IST

पुणे Wrestler Accident Pune : पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका २२ वर्षांच्या पैलवानाची मृत्यूशी झुंज सुरू आहे. त्याच्यावर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दुचाकी खड्ड्यात आपटली, अन्... : कोल्हापुरात कुस्तीचे प्रशिक्षण घेणाऱ्या या २२ वर्षांचा पैलवान विजय डोईफोडेनं आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासाठी पदकांची कमाई केली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सलग तीन वर्षे तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला; मात्र मागील आठवड्यात दुखापतींवर उपचार करून घेण्यासाठी पुण्यात आलेल्या विजयचा पुण्यातील स्वारगेट भागात दुचाकी खड्ड्यात आपटून अपघात झाला. यामध्ये त्याच्या डोक्याला जबर मार लागला असून तो बेशुद्ध आहे. त्याच्यावर उपचारांसाठी लाखो रुपयांची गरज असून घरची परिस्थिती बेताची आहे. त्याच्यावर चांगले उपचार व्हावेत यासाठी आर्थिक मदतीचं आवाहन त्याच्या पैलवान मित्रांकडून करण्यात येत आहे.

विजयने मिळविलेली पदके :
पै विजय जिजाबा डोईफोडे

१. ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धा, कोल्हापूर- रौप्य पदक

२. जूनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पटना, बिहार- कांस्यपदक

३. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स कुस्ती स्पर्धा, वाराणसी- सुवर्णपदक

४. खाशाबा जाधव वरिष्ठ राज्य कुस्ती स्पर्धा, लातूर - सुवर्णपदक

५. सलग तीन वर्ष

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ८६ किलो वजन गटात :
कोथरूड, पुणे - सुवर्णपदक
बालेवाडी, पुणे - रौप्यपदक
धाराशिव - रौप्यपदक

६. मिनी ऑलंपिक कुस्ती स्पर्धा, बालेवाडी, पुणे - सुवर्णपदक

क्रिकेटपटूंचा अपघात : खेळाडूंचा अपघात झाल्याच्या घटना यापूर्वीही महाराष्ट्रात घडल्या आहेत. ज्यामध्ये काही खेळाडू जखमी झाले तर काहींना प्राण गमवावे लागले. अशीच एक घटना यवतमाळ जिल्ह्यातील नागपूर-तुळजापूर मार्गावर डिसेंबर, 2019 रोजी घडली होती. ज्यामध्ये क्रिकेट सामना खेळून वर्धा येथे परतणाऱ्या क्रिकेटपटूंच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातात दोन क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले होते. जयेश प्रविण लोहिया (वय 10) आणि अक्षद अभिषेक बैद (वय 11) अशी मृतांची नावे होती. हे खेळाडू वर्ध्याच्या 'ब्रदरहूड' क्रिकेट क्लबचे होते.

हेही वाचा:

  1. VIDEO रस्त्यावरील खड्ड्यात केली उसाची लागवड.. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन
  2. Mumbai Corporation : महापालिकेने 3 महिन्यांत 7211 हजार खड्ड्यांवर केली मलमपट्टी
  3. महामार्गाची दूरवस्था, दुरुस्तीचे काम हाती घेऊन पूर्ण होईपर्यंत टोल वसुली बंद करा- आमदार शिवेंद्रराजे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.