ETV Bharat / state

शारजावरून नागपूरला विमानाने आलेल्या दोन प्रवाशांकडून २०० ग्रॅम सोन्याच्या बिस्किटांसह २० मोबाईल जप्त - Gold Smuggling Case Nagpur

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 10, 2024, 8:26 PM IST

Gold Smuggling Case Nagpur : सोन्याच्या बिस्किटांसह अनेक महागड्या मोबाईलची तस्करी करणाऱ्या दोघांना नागपूर विमानतळावर अटक करण्यात आली आहे. दोघांकडे प्रत्येकी १०० ग्रॅम सोन्याचे दोन गोल्ड बिस्कीट आणि मोबाईल आढळून आले आहे. वाचा सविस्तर बातमी

Gold Smuggling Case Nagpur
सोन्याची तस्करी (ETV Bharat Reporter)

नागपूर Gold Smuggling Case Nagpur : नागपूरच्या विमानतळावर दोन प्रवाश्यांना सोने तस्करीच्या प्रकरणात आज अटक करण्यात आलेली आहे. जे एअर अरेबिया फ्लाइट क्र. G9-415 ने शारजावरून नागपूरला येत असलेल्या दोघांनी सोन्याच्या बिस्किटांसह अनेक महागडे मोबाईल लपवून आणले आहेत. या गोपनीय माहितीच्या आधारे दोघांची झडती घेण्यात आली. त्यावेळी दोघांकडे प्रत्येकी १०० ग्रॅम सोन्याचे दोन गोल्ड बिस्कीट आणि मोबाईल आढळून आले आहे. मोहम्मद तारिक शेख आणि सनी भोला यादव असे या तस्करांचे नावं असून ते दोघेही मुंबईचे रहिवासी आहेत. कारवाई नागपूर सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिट आणि एअर कस्टम्स युनिटने केली आहे.

'या' कारणाने सुरक्षा यंत्रणांना आला संशय : जे एअर अरेबिया फ्लाइट क्रमांक G9-415 ने शारजावरून नागपूर निघालेल्या विमानात दोन प्रवाशांची वागणूक ही संशयास्पद असल्याची गोपनीय माहिती एअर इंटेलिजेंस युनिट आणि एअर कस्टम्स युनिटला समजल्यानंतर नागपूर विमानतळावर शारजावरून आलेल्या दोघांवर पाळत ठेवण्यात आली. दोघांच्या हालचालीवर पथकाला संशय आला असता त्याची चौकशी केली गेली. यावेळी त्यांच्याजवळ २०० ग्राम सोन्याचे बिस्कीट आणि काही आयफोनसह विदेशी मूळच्या सिगारेट पाकीट जप्त करण्यात आले आहे. सीमाशुल्क आयुक्त संजय कुमार, सीमाशुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त पीयूष भाटी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण कारवाई करण्यात आली.

३७ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त : या कारवाईत २४ कॅरेट २०० ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या सोन्याच्या बिस्किटांची किंमत ही १४ लाख २० हजार रुपये इतकी आहे. याशिवाय १८ लाख ६१ हजार ९३० रुपये किमतीचे २० आयफोन जप्त करण्यात आले आहे. तर सुमारे दोन लाख किमतीच्या विदेशी मूळच्या सिगारेटही जप्त करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

  1. केंद्रातलं खातेवाटप जाहीर; अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरींसह इतरांची प्रमुख खाती कायम - Maharashtra Breaking News
  2. मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर; देशाला मिळाले नवे कृषिमंत्री, वाचा संपूर्ण लिस्ट - Cabinet Portfolio
  3. वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना विशेष आवाहन, म्हणाले... - Raj Thackeray

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.