कोल्हापूर Kalamba Jail Murder Case : कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात गेल्या काही दिवसांपासून मोबाईल तसेच अंमली पदार्थ मिळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. यामुळे कळंबा कारागृहातील कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अशातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली असून कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी म्हणून गेल्या बारा ते तेरा वर्षांपासून शिक्षा भोगत असलेला मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता आणि दुसऱ्या गटातील अन्य पाच जणांमध्ये झालेल्या मारहाणीत मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान या कैद्याच्या डोक्यात ड्रेनेजवरील लोखंडी झाकण घालत खून केल्याची घटना घडली आहे.
कारागृहाचा कारभार चव्हाट्यावर : मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता हा मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटामधील आरोपी असल्याने तो कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कारागृहातील हौदावर आंघोळ करण्यासाठी गेला होता. यावेळी येथील न्यायालयीन बंदी आरोपी असलेले प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार, सौरभ विकास सिद्ध या पाच आरोपींनी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता याला जबर मारहाण केली. यावेळी यातील एका आरोपीने ड्रेनेजवरील लोखंडी झाकण डोक्यात घालून त्याचा खून केला. या घटनेनंतर कळंबा कारागृहात एकच खळबळ उडाली असून या घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस कळंबा कारागृहात दाखल होत खुनाच्या घटनेचा पंचनामा सुरू केला आहे. मात्र या घटनेमुळे कळंबा कारागृहातील कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
हेही वाचा :
- मान्सूनपूर्वी मुंबई मेट्रो सज्ज, प्रवाशांच्या सुरक्षेकरिता आपत्कालीन नियंत्रण कक्षाची सुरुवात - Mumbai Mansoon
- "ध्यान-तपस्या करून धमक्या देऊन निवडणुका",... एक्झिट पोलच्या आकडेवारीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut
- संशयातून आणखी एक 'श्रद्धा'कांड उघड! पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले 14 तुकडे - husband kills wife bhopal