ETV Bharat / state

१९ वर्षीय तरुण झोपेत निघाला चालत..., अन थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला - Mumbai Crime News - MUMBAI CRIME NEWS

Mumbai Crime News : झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरुन पडून एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना भायखळा परिसरात घडली आहे. या घटनेमुळं चुनावाला कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Mumbai Crime News
तरुण ६ व्या मजल्यावरून कोसळला (MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 1, 2024, 10:43 PM IST

मुंबई Mumbai Crime News : नीटच्या परीक्षेत (NEET Exam) ५१७ गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या एका तरुणाचा इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रविवारी सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास भायखळा पोलीस ठाण्यात (Byculla Police Station) अपमृत्युची नोंद करण्यात आलीय. नीट परीक्षेत उत्तीर्ण झालेला १९ वर्षीय तरुण हा झोपेत त्यांच्या घराच्या सहाव्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या पोडियम स्पेसमध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झाल्याची माहिती, भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा परब यांनी दिलीय. मुस्तफा इब्राहिम चुनावाला असं या मृत तरुणाचं नाव आहे.

सहाव्या मजल्यावरून पडला : रविवारी पहाटे ५ वाजून ५ वाजता ही घटना घडली असून तरुणाला चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात दाखल केलं होतं. भायखळा पोलिसांना सैफी रुग्णालयातील डॉ. महेंद्र यांनी फोन करून माहिती दिली. मुस्तफा इब्राहिम चुनावाला हा त्याच्या माझगाव येथील ऐकवा जेम टॉवरमधील राहत्या घराच्या सहाव्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर असलेल्या पोडियम स्पेसमध्ये पडला आहे. नंतर भायखळा पोलिसांनी सैफी रुग्णालयात जाऊन मृत मुलाचे वडील इब्राहिम चुनावाला आणि आई यांचा जबाब नोंदवला आहे. जबाबात मृत तरूणाच्या आई वडिलांनी कोणाविषयी संशय तसेच तक्रार नाही असं सांगितलं. तर पुढील चौकशी सुरु आहे.

मुस्तफाला नीटची परीक्षेत मिळाले ५१७ गुण : मुस्तफा चुनावाला याला आणखी एक मोठा भाऊ असून मुस्तफाने नुकतीच नीटची परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्याला ५१७ गुण मिळाले होते. तसेच त्याच्या आई वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मुस्तफाला झोपेत चालण्याचा त्रास गेल्या दोन-तीन वेळा झाला होता. तसाच झोपेत चालण्याचा त्रास रविवारी पहाटे झाला. त्यामुळं तो सहाव्या मजल्यावरुन खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा -

  1. लातूरच्या 'नीट' घोटाळ्याचा तपास सीबीआयकडं वर्ग, दोन आरोपी अजूनही फरार, कसून शोध सुरू - NEET Exam Scam
  2. NEET पेपर लिक प्रकरण: महाराष्ट्रात कमी मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परराज्यात जास्त मार्क; लातूरच्या 'नीट' तज्ज्ञांचा 'हा' मोठा दावा
  3. NEET प्रकरणी लातूरातून एप्रिलमध्ये NTA ला पत्र, लातूरच्या दिलीप देशमुखांची माहिती - NEET Paper leak Case

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.