ETV Bharat / state

बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती; शाळेच्या कँटिंनमध्ये काम करणाऱ्याकडून 7 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार - sexualy assulted 7 year girl - SEXUALY ASSULTED 7 YEAR GIRL

sexualy assulted 7 year girl : बदलापूरमधील शाळेत चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. ही घटना ताजी असतानाच आता नायगावमधल्या एका 7 वर्षीय चिमुकलीवर दुसऱ्या एका अल्पवयीनानंच पाच वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Minor Girls Molestation
7 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2024, 8:23 PM IST

नायगाव sexualy assulted 7 year girl : बदलापूरमध्ये दोन 4 वर्षांच्या चिमुकलींवर शाळेच्या सफाई कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. ही घटना ताजी असतानाच आता वसईतील नायगाव येथून लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. नायगावमधल्या एका नामांकित शाळेच्या कँटिनमध्ये काम करणाऱ्या 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलानं 7 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणातील पीडित मुलगी दुसर्‍या इयत्तेत शिकते. कँटिंनमध्ये काम करणारा अंकल मला त्रास देत असल्याची तक्रार पीडित मुलीनं शिक्षिकेला केली. त्यानंतर शिक्षिकेनं मुख्याध्यापकांना या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. प्रकरणाचं गांभीर्य ओळखत मुख्याध्यापिकेनं हे प्रकरण दडवून न ठेवता त्यांनी थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे या मुलीनं आपल्या घरी देखील याची माहिती दिली होती, पण घरच्यांनी तिचं म्हणणं गांभिर्यानं घेतलं नाही.

15 दिवसांत चार ते पाच वेळा मुलीवर अत्याचार : धक्कादायक म्हणजे संबधीत आरोपीनं गेल्या 15 दिवसांत चार ते पाच वेळा मुलीवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे असून पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. तसंच या अगोदर इतर मुलींवर अत्याचार झाला का? याचा तपास देखील नायगाव पोलीस करत आहे. या शाळेत तिवारी नावाचा व्यक्ती कॅंटीन चालवतो. आरोपी असलेला अल्पवयीन दोनच महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातून येथे काम करण्यासाठी आला होता.

शाळेत 65 ते 70 सीसीटीव्ही कॅमेरे : "आमच्या शाळेत मुलांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली जाते. या शाळेत 65 ते 70 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. घडलेला प्रकार दुर्देवी आहे. त्यामुळे आम्ही स्वत:हून पोलिसांकडे तक्रार दिली," असं मुख्याध्यापिकेनं सांगितलं.

पुढील तपास सुरू : या प्रकरणाची माहिती मिळाताच आम्ही आरोपी बालकाला पोक्सोच्या गुन्ह्याखाली ताब्यात घेतलं असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली.

हेही वाचा

  1. नाशिकमध्ये खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकाकडून पाचवीत शिकणाऱ्या मुलीचा विनयभंग - Nashik Girl Molestation
  2. धक्कादायक! निगडी येथील शाळेत शिक्षकानं केला विद्यार्थिनीचा विनयभंग; शिक्षकासह सात जणांना अटक - Teacher Molested School Girl
  3. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरात प्लास्टिक बॅगमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; हत्येचा संशय, परिसरात दहशत - Found Woman Dead Body

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.