ETV Bharat / state

'बडग्या-मारबत' उत्सव; अत्याचाराचा निषेध करणाऱ्या बडग्यांनी वेधलं लक्ष - Nagpur Marbat festival 2024 - NAGPUR MARBAT FESTIVAL 2024

Nagpur Marbat festival 2024 : विदर्भाचं वैभव असलेली आणि पौराणिक, ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व असलेल्या बडग्या-मारबत मिरवणुकीला नागपूरकरांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2024, 8:05 PM IST

नागपूर Nagpur Marbat festival 2024 : भारतात केवळ नागपूर येथे जगप्रसिद्ध बडग्या-मारबत उत्सव साजरा करण्याची ऐतिहासिक परंपरा आहे. या परंपरेला यंदा 144 वर्षे पूर्ण झाली. या उत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बडग्या. वर्षभर घडणाऱ्या घटना ज्यामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटना ज्यांचा संबंध नागरिकांच्या जगण्यावर होतो, अशा विषयांवर मार्मिक टीका करत सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेणारे देखावे आणि प्रतिकात्मक पुतळ्यांची मिरवणुकीत काढली जाते. त्याला बडग्या असं म्हणतात. बडग्यांच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट रूढी परंपरांवर प्रहार केला जातो. त्याचबरोबर राजकीय पुढाऱ्यांचे कान देखील टोचले जातात, त्यामुळे मारबत उत्सवात या बडग्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे.

महिला अत्याचार विरोधी बडग्यांनी वेधलं लक्ष : वर्षभरात जगात, देशात आणि राज्यात अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींसोबत घडलेल्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करणाऱ्या बडग्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याचवेळी नागपुरातील रेड लाईट परिसर म्हणून प्रसिद्ध असलेलं गंगा जामुन हे मुलींवरील अत्याचाराचं केंद्र असल्याची टिप्पणी करणाऱ्या बडग्यानंही अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.

अशी सुरू झाली परंपरा : देशात इंग्रजांची राजवट होती. त्यावेळी आपला राग व्यक्त करण्यासाठी तसंच क्रांतिकारकांच्या समर्थनार्थ बडगे काढण्यास सुरुवात झाली ती अजून सुरू आहे. साधारणपणे टीकात्मक व उपहासात्मक बडगे काढण्याची परंपरा आहे. पण एकदोन बडगे समर्थनात निघू शकतात. ही परंपरा आजही कायम आहे. गेली काही वर्षे नाशाखोरीं, महागाई या विषयावर बडगे निघत आले आहेत.

बडग्या म्हणजे काय : बडग्या म्हणजे काय? हा प्रश्न प्रत्येकाला पडणं स्वाभाविक आहे. तर त्याची माहिती अशी आहे की, भोसले राजघराण्यातील बाकाबाईनं इंग्रजांसोबत हात मिळवणी केली. तिच्या कृत्याचा निषेध म्हणून काळी मारबत काढली जाते. बाकाबाईच्या या कृत्याची माहिती असताना देखील तिच्या नवऱ्यानं तिच्या कृत्याला विरोध केला नाही. म्हणून त्याचाही पुतळा काढला जातो, त्याला बडग्या असं म्हंटलं जातं. गेल्या 144 वर्षांपासून काळ्या मारबती सोबतचं बडग्यांची देखील मिरवणूक काढली जाते. यामध्ये वर्षभरात घडलेल्या विविध राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि इतर विषयांना अनुसरून भाष्य करणारं स्लोगन बडग्यांवर लिहून त्यांची मिरवणूक काढली जाते.

हेही वाचा

  1. हातानं टाळ्या नाही, वाजवितात ढोल ताशा; महाराष्ट्रातील पहिलं तृतीयपंथीयांचे पथक गणेशोत्सवाकरिता सज्ज - Transgenders Dhol Tasha Pathak
  2. मुंबईचा 'MBA पानवाला'! लाख रुपये पगाराची नोकरी सोडून विकतोय पान; आता करोडोची कमाई - The Paan Story Mumbai
  3. 144 वर्ष जुन्या ऐतिहासिक 'मारबत' उत्सवाला सुरुवात, जाणून घ्या काळ्या- पिवळ्या मारबतीचं महत्त्व - Nagpur Marbat Festival 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.