हरारे ZIM vs AFG 2nd T20I Live Streaming : झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा T20 सामना आज 13 डिसेंबर रोजी होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब इथं होणार आहे.
Zimbabwe clinch last-ball thriller against Afghanistan
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) December 12, 2024
Details 🔽https://t.co/DekrMC7snj pic.twitter.com/VqKcTqKGdu
यजमान संघाची 1-0 अशी आघाडी : पहिल्या T20 मध्ये झिम्बाब्वेनं अफगाणिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. यासह यजमान संघानं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा टी-२० सामना जिंकून झिम्बाब्वे मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करेल. विशेष म्हणजे झिम्बाब्वेनं आतापर्यंत अफगाणिस्तानविरुद्ध T20 मालिका जिंकलेली नाही. दुसरीकडे, अफगाणिस्तान संघ दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करु इच्छितो. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत झिम्बाब्वेचं नेतृत्व सिकंदर रझा करत आहे. तर अफगाणिस्तानची कमान राशिद खानच्या हाती आहे.
PLAYER OF THE MATCH 👏
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) December 11, 2024
Brian Bennett
49 (49) & 0/12 (1)#ZIMvAFG #VisitZimbabwe 📝 https://t.co/EjMJE3p3g3 pic.twitter.com/XnZOxUaog8
T20 विश्वचषकानंतर पहिलीच T20 मालिका : ऑक्टोबरमध्ये झालेल्या ACC पुरुष T20 इमर्जिंग आशिया कप 2024 च्या विजेतेपदासाठी अफगाणिस्तानचं नेतृत्व केल्यानंतर युवा फलंदाज अष्टपैलू झुबैद अकबरीचा प्रथमच T20 संघात समावेश करण्यात आला आहे. तर फिरकीपटू मुजीब उर रहमानचा उजव्या पायाच्या दुखण्यातून बरा झाल्यानंतर T20 संघात समावेश करण्यात आला आहे. जुनमध्ये T20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर अफगाणिस्तान पहिलीच T20 मालिका खेळत आहे.
Zimbabwe win a last-ball thriller to take a 1-0 lead in the series ⚡#ZIMvAFG #VisitZimbabwe 📝 https://t.co/EjMJE3pB5B pic.twitter.com/DyCYkTNKPb
— Zimbabwe Cricket (@ZimCricketv) December 11, 2024
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : T20 मध्ये झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान संघ 16 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात अफगाणिस्तानचा वरचष्मा दिसत आहे. अफगाणिस्ताननं 16 पैकी 14 T20 सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेनं फक्त 2 सामने जिंकले आहेत. यावरुन अफगाणिस्तानचा संघ अधिक मजबूत असल्याचं दिसून येतं.
खेळपट्टी कशी असेल : हरारे स्पोर्ट्स क्लबमधील खेळपट्टी फलंदाजीसाठी आव्हानात्मक असेल आणि फिरकीपटूंसाठी खूप उपयुक्त ठरेल. मात्र, सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना नव्या चेंडूची थोडीफार मदत मिळू शकते. पण जसजसा खेळ पुढं जाईल तसतशी फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील. या मैदानावर दोन्ही संघ प्रथम फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतील.
Karim Janat walks back after scoring an incredible & unbeaten 54-run knock to take Afghanistan to 144/6 in the first T20I against Zimbabwe. 👏#AfghanAtalan | #ZIMvAFG | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/9I71NrXin2
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 11, 2024
हरारे स्पोर्ट्स क्लब येथील T20 सामन्यांची आकडेवारी कशी : मीडिया रिपोर्ट्सनुसार, हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये आतापर्यंत एकूण 47 T20 सामने खेळले गेले आहेत. ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 23 सामने जिंकले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघानं 22 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.
T20 मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला T20 सामना : 11 डिसेंबर, हरारे (झिम्बाब्वे 4 विकेटनं विजयी)
- दुसरा T20 सामना : आज, हरारे
- तिसरा T20 सामना : 14 डिसेंबर, हरारे
RESULT | ZIMBABWE WON BY 4 WICKETS 🚨
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 11, 2024
Naveen Ul Haq (3/33) and the skipper Rashid Khan (2/26) put on a strong bowling effort, but it wasn't meant to be as the hosts, Zimbabwe, took the first T20I home by 4 wickets. 👍#AfghanAtalan | #ZIMvAFG | #GloriousNationVictoriousTeam pic.twitter.com/ZEwxfMCAnP
झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा T20 सामना कधी होणार?
झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा T20 सामना आज शुक्रवार, 12 डिसेंबर रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे इथं भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5:00 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक अर्धा तासआधी होईल.
झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा T20 सामना कुठं आणि कसा पाहायचा?
सध्या भारतातील टीव्ही चॅनेलवर झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेच्या प्रसारणाबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र, या T20 मालिकेचं लाईव्ह स्ट्रीमिंग भारतात फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
मालिकेसाठी दोन्ही संघ :
झिम्बाब्वे T20 संघ : सिकंदर रझा (कर्णधार), फराज अक्रम, ब्रायन बेनेट, रायन बर्ल, ट्रेवर ग्वांडू, क्लाइव्ह मदांडे (यष्टिरक्षक), वेस्ली माधवेरे, टिनोटेंडा माफोसा, तदिवानशे मारुमनी (यष्टिरक्षक), वेलिंग्टन मसाकादझा, ब्रँडन मावुथा, ताव्वा, ब्रँडन मावुता, ता. मुझाराबानी, डायोन मायर्स, रिचर्ड नगारावा
अफगाणिस्तान T20 संघ : राशिद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टिरक्षक), मोहम्मद इशाक (यष्टिरक्षक), सेदीकुल्ला अटल, हजरतुल्ला झाझाई, मोहम्मद नबी, दरविश रसौली, झुबैद अकबरी, गुलबदीन नायब, करीम जनात, अजमातुल्ला उमरझाई, नांग्याल खरोती, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजल हक फारुकी, फरीद अहमद, नवीन उल हक
हेही वाचा :