ETV Bharat / sports

'ते एक खरे नेते होते...' बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनं क्रिकेटपटू युवराज सिंगला धक्का; मध्यरात्री 2 वाजता केलं 'हे' काम

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री उशिरा मुंबईत हत्या करण्यात आली. त्यांच्या निधनानं माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला धक्का बसला आहे.

Baba Siddique Shot Dead
बाबा सिद्दीकी आणि युवराज सिंग (ETV Bharat and ANI)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Oct 13, 2024, 10:02 AM IST

मुंबई Baba Siddique Shot Dead : राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री उशिरा मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात नेलं असता त्यांचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी ते त्यांचा मुलगा आणि आमदार जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर दसरा साजरा करत होते. महाराष्ट्रातील बड्या नेत्यांमध्ये बाबा सिद्दीकीच्या नावाचा समावेश असून त्यांचं राजकारणी तसंच सेलिब्रिटींशी चांगले संबंध होते. त्यामुळं त्यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच बॉलिवूडमधील अनेक कलाकार लीलावती रुग्णालयात पोहोचले. तर भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगही त्यांच्या हत्येनं हादरला आहे. या घटनेबद्दल त्यानं निषेध व्यक्त करत त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली.

काय म्हणाला युवराज सिंग? : बाबा सिद्दीकी यांच्या निधनाची माहिती युवराज सिंगला समजताच त्यानं रात्री 2 वाजता सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त केला. युवराज सिंगनं लिहिलं की, 'बाबा सिद्दीकी यांच्या अकाली निधनानं मला धक्का बसला आहे. जनतेसाठी कष्ट करणारे ते खरे नेते होते, त्यांचा प्रामाणिकपणा आणि लोकांवरील प्रेम सदैव स्मरणात राहील. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबियांप्रती माझी संवेदना आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.'

कोण होते बाबा सिद्दीकी? : बाबा सिद्दीकी दरवर्षी ईदच्या दिवशी इफ्तार पार्टी देत ​​असत. त्यांच्या या पार्टीची खूप चर्चा होत असे कारण त्यात अनेक बडे स्टार्स सहभागी झाले होते. राजकारणात सक्रिय असण्यासोबतच त्यांनी बांधकाम व्यावसायिक म्हणूनही काम केलं. बाबा सिद्दीकी यांनी मुंबईतील विद्यार्थी नेता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर त्यांनी दोनदा नगरसेवक म्हणून काम पाहिलं. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 1999, 2004 आणि 2009 मध्ये तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले. मुंबई काँग्रेसमध्ये अल्पसंख्याक समाजाचा मोठा चेहरा होता. तब्बल 48 वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

हेही वाचा :

  1. बाबा सिद्दीकींच्या हत्येचे राजस्थानसह उत्तर प्रदेश कनेक्शन; दोघांना अटक, तिसरा फरार
  2. बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर बडा कब्रस्तानमधील स्मशानभूमीत होणार दफन विधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.