पुणे First Indian to Smashed 30 Sixes in year : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालनं इतिहास रचला आहे. भारताच्या दुसऱ्या डावात त्यानं न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीच्या गोलंदाजीवर जबरदस्त षटकार ठोकला. या षटकारासह यशस्वी कसोटीत एका कॅलेंडर वर्षात 30 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. हा असा विक्रम आहे, जो सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारखे दिग्गज फलंदाजही करु शकले नाहीत.
YASHASVI JAISWAL BECOMES THE FIRST INDIAN TO SMASH 30 SIXES IN A CALENDAR YEAR IN TESTS. 🇮🇳 pic.twitter.com/mSG2RPriEh
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 26, 2024
मॅक्क्युलमनंतर अशी कामगिरी करणारा दुसराच फलंदाज : न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज ब्रेंडन मॅक्क्युलमनंतर हा विक्रम करणारा यशस्वी हा जगातील फक्त दुसरा फलंदाज ठरला आहे. यशस्वीचा हा विक्रम गाठण्याचा प्रवास केवळ पॉवर हिटिंगपुरता मर्यादित नव्हता. गरज असेल तेव्हा त्यानं संघासाठी संथ खेळीही खेळली आणि क्रीजवर टिकून राहण्याचं धाडस दाखवलं. भारताच्या दुसऱ्या डावात लंच ब्रेकपर्यंत यशस्वी 46 धावांवर नाबाद आहे. भारतीय संघाला 2012 नंतर घरच्या मैदानावर पहिली कसोटी मालिका गमावण्याचा पेच टाळायचा असेल, तर जैस्वालला या कसोटीत मोठी खेळी खेळावी लागेल.
इंग्लंडविरुद्ध यशस्वी चमकला : या वर्षाच्या सुरुवातीला जैस्वालनं इंग्लंडविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली होती. जिथं त्यानं 700 हून अधिक धावा केल्या होत्या. मात्र, या मालिकेनंतर त्याचा असा फॉर्म दिसला नाही. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यानं तीन अर्धशतकं झळकावली, पण चांगल्या सुरुवातीचं मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात तो अपयशी ठरला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्यानं 35 धावा केल्या आणि नंतर विकेट गमावली. जैस्वालनं क्रीजवर स्थिरावल्यानंतर तो मोठी खेळी खेळेण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे.
Yashasvi Jaiswal becomes first Indian to have Hit 30 Sixes in a Calendar Year.
— Tanuj Singh (@ImTanujSingh) October 26, 2024
- YASHASVI MADE HISTORY..!!! 🌟 pic.twitter.com/2JCSoad5GQ
भारताला मिळालं 359 धावांचं लक्ष्य : न्यूझीलंडनं दुसऱ्या डावात 255 धावा केल्या आणि भारताला विजयासाठी 359 धावांचं लक्ष्य दिले. भारतानं आतापर्यंत केवळ एकदाच 300 हून अधिक लक्ष्य पूर्ण केलं आहे. संघानं डिसेंबर 2008 मध्ये चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध ही कामगिरी केली होती.
हेही वाचा :