ॲडलेड WTC Point Table : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघानं दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा 10 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात भारताचे फलंदाज खराब फ्लॉप ठरले. भारताच्या फलंदाजीत रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल सारखे फलंदाज आहेत. भारतीय संघानं पहिल्या डावात 180 धावा तर दुसऱ्या डावात केवळ 175 धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 337 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. भारतानं ऑस्ट्रेलियाला केवळ 19 धावांचं लक्ष्य दिलं, जे ऑस्ट्रेलियानं सहज गाठलं.
🚨 MASSIVE CHANGE IN WTC...!!! 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 8, 2024
- Australia takes the No.1 position in the WTC Points Table.
- India slips to No.3. pic.twitter.com/UOLKwOrIjN
ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या क्रमांकावर : भारताविरुद्धचा दुसरा सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला असून दोन स्थानांचा फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलियानं एकूण 14 सामने खेळले आहेत, त्यापैकी 9 जिंकले आहेत आणि त्यांचं पीसीटी 60.71 आहे. दुसरीकडे, भारतीय संघाला पराभवाचा फटका सहन करावा लागला आहे. भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय संघानं आतापर्यंत 16 सामने खेळले आहेत, त्यापैकी 9 जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. त्यांची पीसीटी 57.29 आहे.
Massive win in Adelaide for Australia as they level the series 1-1 💪#WTC25 | #AUSvIND 📝: https://t.co/D4QfJY2DY1 pic.twitter.com/RXZusN98wU
— ICC (@ICC) December 8, 2024
अंतिम फेरी गाठण्याची आशा कायम : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील वर्षी जूनमध्ये लॉर्ड्सवर खेळवला जाईल. गुणतालिकेत अव्वल 2 मध्ये स्थान मिळवणारे दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. भारतीय संघाला अजूनही अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. भारतीय संघाकडे अजून तीन कसोटी सामने बाकी आहेत, जे फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे आहेत.
THE WTC POINTS TABLE...!!! 🏆 pic.twitter.com/wMp6wsk6yM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 8, 2024
नितीश रेड्डी सर्वात यशस्वी भारतीय फलंदाज : पिंक बॉलच्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत आणि ते फ्लॉप झाले. नितीश रेड्डीनं दोन्ही डावात भारताकडून सर्वाधिक 42-42 धावा केल्या. पण बाकीचे खेळाडू त्याला साथ देण्यात अपयशी ठरले. याच कारणामुळं टीम इंडियाला दोन्ही डावात 200 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. तिसऱ्या दिवशी भारत ऑस्ट्रेलियाला टक्कर देईल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. पण हे होऊ शकलं नाही.
हेही वाचा :