ETV Bharat / sports

न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर दिग्गज खेळाडूचा क्रिकेटला रामराम, मुंबईत खेळला अंतिम सामना; म्हणाला 'क्रिकेटमधील एका सुंदर...'

भारतीय संघाचा न्यूझीलंडकडून मानहानिकारक पराभव झाला आणि काही तासांनंतर भारताच्या यष्टिरक्षक फलंदाजानं क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याची क्रिकेट कारकीर्द एकूण 17 वर्षे चालली.

Wriddhiman Saha Retired
ऋद्धिमान साहा (AFP Photo)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 4, 2024, 12:34 PM IST

मुंबई Wriddhiman Saha Retired : न्यूझीलंडकडून कसोटी मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचा क्लीन स्वीप झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋद्धिमान साहा याच्या निवृत्तीची. 40 वर्षीय दिग्गज क्रिकेटपटूनं आपल्या 17 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामानंतर क्रिकेटला अलविदा करणार असल्याचे त्यानं जाहीर केलं आहे. 17 वर्षांच्या कारकिर्दीत साहानं बंगालकडून 15 वर्षे आणि त्रिपुरासाठी 2 वर्षे देशांतर्गत क्रिकेट खेळलं आहे.

रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामानंतर घेणार निवृत्ती : साहानं आपल्या क्रिकेट प्रवासाचं वर्णन केलं आहे. गेल्या दोन रणजी हंगामात त्रिपुराकडून खेळलेला साहा यावर्षी ऑगस्टमध्ये पुन्हा बंगालमध्ये परतला. निवृत्तीची घोषणा करताना साहानं जे सांगितलं त्यानुसार तो सध्याच्या रणजी हंगामातच शेवटचा सामना खेळणार आहे.

ऋद्धिमान साहानं सोशल मीडियावर केली पोस्ट : बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या ऋद्धिमान साहानं सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. त्यानं लिहिलं, 'क्रिकेटमधील एका सुंदर प्रवासानंतर, हा हंगाम माझा शेवटचा असेल. बंगालचं प्रतिनिधित्व करण्याचा मान मला मिळाला आहे, मी निवृत्त होण्यापूर्वी फक्त रणजी ट्रॉफी खेळणार आहे. या अविश्वसनीय प्रवासात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार' असं ऋद्धिमान साहानं पोस्टद्वारे म्हटलं आहे.

मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध खेळला शेवटचा कसोटी सामना : 17 वर्षांच्या एकूण क्रिकेट कारकिर्दीत साहानं 2010 मध्ये भारतासाठी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं 40 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. तसंच 9 वनडे सामनेही खेळले. साहानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला तर मुंबईतील वानखेडे मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला. साहाचं वनडे पदार्पणही न्यूझीलंडविरुद्ध झालं होतं. साहा 2021 पासून भारतीय संघाबाहेर होता.

IPL मध्ये खेळले 170 सामने : ऋद्धिमान साहानं IPL मध्ये 5 संघांचं प्रतिनिधित्व केलं. ज्यात तो शेवटच्या वेळी गुजरात टायटन्सकडून खेळला. 5 संघांकडून खेळताना त्यानं 170 आयपीएल सामने खेळले, ज्यात त्यानं एका शतकासह 2934 धावा केल्या. IPL 2025 साठी गुजरात टायटन्सनं साहाला कायम ठेवलं नाही.

ऋद्धिमान साहाची क्रिकेट कारकीर्द : ऋद्धिमान साहानं भारतासाठी 40 कसोटी सामने खेळले आहेत. त्यानं आपल्या कारकिर्दीत 1353 धावा केल्या. यामध्ये तीन शतकांचाही समावेश आहे. याशिवाय 8 वनडे सामन्यांमध्ये 41 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर वृद्धिमान साहाने लिस्ट ए मध्ये 138 सामन्यांमध्ये 7013 धावा आणि 116 सामन्यांमध्ये 3072 धावा केल्या. त्यानं 2011 आणि 2022 मध्ये IPL जिंकलं आहे. IPL फायनलमध्ये शतक झळकावणारा ऋद्धिमान साहा हा पहिला फलंदाज ठरला आहे. ऋद्धिमान साहानं 170 IPL सामन्यात 2934 धावा केल्या आहेत.

हेही वाचा :

  1. पाकिस्तान बोर्डाप्रमाणेच BCCI चार वरिष्ठ खेळाडूंवर कारवाई करण्याच्या तयारीत... गौतम गंभीरही 'गॅस'वर
  2. साहेबांचा पराभव केल्यानंतर पाकिस्तान कांगारुंनाही हरवणार? पहिला वनडे 'इथं' पाहा लाईव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.