ETV Bharat / sports

अलविदा कुस्ती! "मी हरले, कुस्ती जिंकली"; भावनिक पोस्ट शेयर करत विनेश फोगटनं कुस्तीला ठोकला 'रामराम' - Vinesh Phogat Goodbye To Wrestling - VINESH PHOGAT GOODBYE TO WRESTLING

Vinesh Phogat Goodbye To Wrestling : भारताची धडाकेबाज कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat Retirement) हिनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली. मात्र कुस्तीच्या अंतिम फेरीत खेळण्यासाठी विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आल्यानं जगभरात खळबळ उडाली. मात्र यानंतर विनेश फोगाटनं आपली निवृत्ती घोषित केली.

Vinesh Phogat Goodbye To Wrestling
कुस्तीपटू विनेश फोगट (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 8, 2024, 6:30 AM IST

Updated : Aug 8, 2024, 12:15 PM IST

नवी दिल्ली Vinesh Phogat Goodbye To Wrestling : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या कुस्ती स्पर्धेतून विनेश फोगट अपात्र ठरवल्यानंतर जगभरात खळबळ उडाली. त्यानंतर अतिशय भावनिक पोस्ट करत विनेश फोगटनं कुस्तीला रामराम ठोकला. मॉ कुस्ती माझ्याशी जिंकली, मी हारले. माफ करा, तुमचं स्वप्न आणि माझी हिंमत सगळं तुटलं आहे. आता काहीच त्राण शिल्लक राहिलं नाही. अलविदा कुस्ती 2001-2024, आपल्या सगळ्यांची कायम ऋणी राहील, अशी पोस्ट विनेश फोगट हिनं सोशल माध्यमात केली (Vinesh Phogat Retirement) आहे. विनेश फोगट हिनं अशी निवृत्ती जाहीर केल्यानं देशभरातून नाराजी व्यक्त करण्यात येत नाही.

आता मी हारले, कुस्ती जिंकली : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये धडाकेबाज कामगिरी करणारी कुस्तीपटू विनेश फोगट हिला अंतिम कुस्ती स्पर्धेत अपात्र ठरवण्यात आलं. त्यामुळे विनेश फोगटला मोठा धक्का बसला. या धक्क्यातून सावरणं विनेश फोगाटला शक्य झालं नाही. विनेश फोगट ऑलिम्पिकमधील अंतिम कुस्ती सामन्यात पदक मिळवेल, अशी अपेक्षा भारतीयांना होती. मात्र या आशेवर पाणी फिरलं, त्या पाठोपाठ विनेश फोगटनं आपली निवृत्ती जाहीर केली. विनेश फोगटनं सोशल माध्यमात एक भावनिक पोस्ट शेयर केली. यात तिनं. "मॉ कुस्ती जिंकली, मी हारले. माफ करा, तुमचं स्वप्न आणि माझी हिंमत सगळं तुटलं आहे. आता काहीच त्राण शिल्लक राहिलं नाही. अलविदा कुस्ती 2001-2024, आपल्या सगळ्यांची कायम ऋणी राहील," अशी भावनिक पोस्ट केली. विनेश पोगट हिनं कुस्तीला रामराम ठोकल्यानं हा करोडा भारतीयांसाठी आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.

आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडं अपील : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अतिरिक्त वजन असल्यानं अपात्र ठरवल्याच्या विरोधात कुस्तीपटू विनेश फोगटनं आंतरराष्ट्रीय क्रीडा लवाद (CAS) कडं अपील केलं आहे. अंतिम सामन्यादिवशी विनेशचे वजन फक्त १०० ग्रॅम जास्त असल्यानं तिला महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये सहभाग घेण्याची परवानगी मिळाली नाही. उपांत्य फेरीत ५-० अशा फरकानं विजय मिळवणारी विनेश ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू होती.

काय आहे विनेश फोगट अपात्र प्रकरण : भारताची धडाकेबाज कुस्तीपटू विनेश फोगट हिनं क्युबाच्या युस्नेलिस गुझमनचा पराभव करत कुस्तीची अंतिम फेरी गाठून जबरदस्त कामगिरी केली. अंतिम सामन्यात विनेश फोगट हिची लढत अमेरिकेच्या सारा हिल्डब्रँड विरुद्ध बुधवारी सायंकाळी खेळवण्यात येत होती. मात्र 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यानं विनेश फोगटला ऑलिम्पिक समितीनं अपात्र ठरवलं. त्यामुळे हा करोडो भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. विनेश फोगटला बसलेला हा सगळ्यात मोठा धक्का होता.

हेही वाचा :

  1. विनेश फोगटच्या अपात्रतेबद्दल झालेलं दुःख शब्दात न सांगता येणारं- महाराष्ट्रातील माजी कुस्तीपटूंची प्रतिक्रिया - Vinesh Phogat Disqualified
  2. विनेश फोगटचं 52 किलो होते वजन, रात्रभर प्रयत्न केले, केसंही कापले, पण...; वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितली 'इनसाईड स्टोरी' - Vinesh Phogat Disqualified

Last Updated : Aug 8, 2024, 12:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.