नवी दिल्ली WTC Points Table Update : पाकिस्तान क्रिकेट सध्या अत्यंत खराब परिस्थितीतून जात आहे. पाकिस्तानी संघ इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हरला आहे. पाकिस्ताननं पहिल्या डावात फलंदाजी करताना 550 हून अधिक धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतरही संघाला डावानं पराभवाला सामोरं जावं लागलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतर्गत ही मालिका खेळवली जात आहे. मोठी गोष्ट म्हणजे हा सामना हरल्यानंतर पाकिस्तानी संघ आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या विजयाचा फायदा इंग्लंडला झाला आहे. त्याचा पीसीटी वाढला आहे. पाकिस्तानसाठी लज्जास्पद बाब म्हणजे आता हा संघ गुणतालिकेत तळाला फेकला गेला आहे.
WTC POINTS TABLE...!!! 🇮🇳
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 11, 2024
- Pakistan slips to the last position now! pic.twitter.com/wSUshHYrxT
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत बदल : इंग्लंडनं पाकिस्तानवर मोठा विजय मिळवल्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत बदल झाला आहे. मात्र, याचा भारतीय संघावर कोणताही परिणाम झालेला नाही. भारतीय संघ अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. मात्र इंग्लंडविरुद्ध एक डाव आणि 47 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तान संघ आता WTC मध्ये तळाशी फेकला गेला आहे. संघाला आता नवव्या क्रमांकावर जावं लागलं यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असेल.
पाकिस्तान संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मुलतान कसोटीपूर्वी, पाकिस्तानचा पीसीटी 19.050 होता, जो आता 16.67 झाला आहे. तर विंडीज संघाला न खेळता एका स्थानाचा फायदा झाला आहे. वेस्ट इंडिजचा संघ आता 18.520 च्या पीसीटीसह आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. जर आपण इंग्लंडबद्दल बोललो तर या सामन्यापूर्वी त्यांचं पीसीटी 42.190 होतं, जे आता वाढून 45.59 झाले आहे. मात्र, त्यानंतरही त्यांना चौथ्या स्थानावरच राहावं लागणार आहे.
पहिल्या क्रमांकावर भारतीय संघाची पकड कायम : दरम्यान, जर आपण प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थानावर असलेल्या संघांबद्दल बोललो, तर भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघ अव्वल आहेत. या सामन्याचा त्यांच्या स्थानावर कोणताही परिणाम झालेला नाही. भारतीय संघाचा पीसीटी सध्या 74.240 आहे. ऑस्ट्रेलियाचा पीसीटी 62.500 असून हा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर श्रीलंकेचा संघ 55.560 च्या पीसीटीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा :