Women's Asia Cup 2024 Updated Schedule : क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना हा क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असतो. या दोन्ही देशांमधील सामन्याची जगभरातील प्रेक्षक वाट पाहात असतात. अलीकडेच टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगला होता. ज्यात भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवला. आता या दोन्ही देशांचे महिला क्रिकेट संघ आमने-सामने येणार आहेत. महिला आशिया चषक स्पर्धेत हे संघ एकमेकांशी भिडणार आहेत. या दोन्ही संघांच्या सामन्याच्या तारखेत मोठा बदल करण्यात आला आहे.
🚨 News 🚨
— BCCI Women (@BCCIWomen) June 25, 2024
Schedule for the upcoming Women’s T20 Asia Cup held in Sri Lanka are out 🙌
Presenting #TeamIndia’s fixtures 💪 #AsiaCup pic.twitter.com/fN2coot72p
आशिया चषक स्पर्धा 19 जुलै ते 28 जुलै दरम्यान श्रीलंकेच्या डंबुला येथे खेळवली जाईल, ज्यामध्ये एकूण 8 संघ सहभागी होतील. महिला आशिया चषक स्पर्धेत प्रथमच आठ संघ ट्रॉफीसाठी आपलं नशीब आजमावतील. गतविजेत्या भारताला पाकिस्तान, नेपाळ आणि यूएईसह अ गटात स्थान देण्यात आलं आहे. ब गटात बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका आणि थायलंड यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीचा सामना 26 जुलै रोजी होणार आहे.
Here is the updated schedule for the ACC Women’s Asia Cup 2024. Brace yourselves for an action-packed tournament featuring the top 8 women's cricket teams in Asia. Mark your calendars, as it is going to kick off on July 19th, 2024, in Dambulla, Sri Lanka!#WomensAsiaCup2024 #ACC pic.twitter.com/GGBITRFCIv
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) June 25, 2024
भारत-पाकिस्तान सामना कधी? : भारतीय संघ आता कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. 19 जुलै रोजी संध्याकाळी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. दोन्ही संघ सुरुवातीला 21 जुलैला भिडणार होते. जुन्या वेळापत्रकानुसार पहिल्या सामन्यात भारताचा सामना यूएईशी होणार होता. तर पाकिस्तान नेपाळविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार होता. भारत आणि पाकिस्तानचा सामना वगळता उर्वरित वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Cause a Series Win & a Jemimah selfie 🤳 are best friends! 😎 🤝#TeamIndia | #INDvSA | @JemiRodrigues | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/5LpDZDTCI0
— BCCI Women (@BCCIWomen) June 23, 2024
महिला आशिया चषक 2024 चे वेळापत्रक
- 19 जुलै: यूएई विरुद्ध नेपाळ (दुपारी 2:00 )
- 19 जुलै: भारत विरुद्ध पाकिस्तान (संध्याकाळी 7:00)
- 20 जुलै: मलेशिया विरुद्ध थायलंड (दुपारी 2:00)
- 20 जुलै: श्रीलंका विरुद्ध बांगलादेश (संध्याकाळी7:00)
- 21 जुलै: भारत वि यूएई (दुपारी 2:00)
- 21 जुलै: पाकिस्तान विरुद्ध नेपाळ (संध्याकाळी 7:00)
- 22 जुलै: श्रीलंका विरुद्ध मलेशिया (दुपारी 2:00)
- 22 जुलै: बांगलादेश विरुद्ध थायलंड (संध्याकाळी 7:00)
- 23 जुलै: पाकिस्तान वि यूएई (दुपारी 2:00)
- 23 जुलै: भारत विरुद्ध नेपाळ (संध्याकाळी 7:00)
- 24 जुलै: बांगलादेश विरुद्ध मलेशिया (दुपारी 2:00 PM)
- 24 जुलै: श्रीलंका विरुद्ध थायलंड (संध्याकाळी 7:00)
- 26 जुलै: उपांत्य फेरी (संध्याकाळी7:00)
- 28 जुलै: अंतिम सामना (संध्याकाळी 7:00 )
𝙒. 𝙄. 𝙉. 𝙉. 𝙀. 𝙍. 𝙎! 🏆
— BCCI Women (@BCCIWomen) June 23, 2024
Smiles galore after the ODI series triumph! 😊 😊#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/EUDqUp0XZM
महिला आशिया चषकात भारताचा दबदबा : महिला आशिया चषक या स्पर्धेत भारतीय संघानं वर्चस्व राखलं आहे. आतापर्यंत या स्पर्धेचे 8 हंगाम खेळले गेले आहेत, ज्यापैकी भारतानं 7 जिंकले आहेत. 2018 साली बांगलादेशनं आशिया कप जिंकला. बांगलादेशनं फायनलमध्ये टीम इंडियाचा 3 गडी राखून पराभव केला. 2022 मध्ये झालेल्या आशिया कपमध्ये टीम इंडियानं पुन्हा जेतेपदावर कब्जा केला. भारतानं अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव केला होता. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. भारतानं अलीकडेच दक्षिण आफ्रिकेचा तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पराभव केला. भारत आणि दक्षिण आफ्रिका 28 जूनपासून एकमेव कसोटीत आमनेसामने येणार आहेत. त्यानंतर दोन्ही संघ तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत आमनेसामने येतील. दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा 9 जुलै रोजी संपेल.
हेही वाचा
- गुलबदिन नायबच्या ‘ॲक्टिंग’वर खेळाडू संतापले; अशा प्रकारे उडवली खिल्ली - Gulbadin Naib Fake Injury
- ऑस्ट्रेलियाच्या टी 20 विश्वचषकातील प्रवास संपताच डेव्हिड वॉर्नरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम - David Warner retired
- ऑस्ट्रेलियाचं स्वप्न भंगलं, अफगाणिस्ताननं बांगलादेशचा केला 8 धावांनी पराभव - T20 World Cup 2024